मुंबई, 24 मार्च : मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका व्यक्तीने आपल्या शेजारी राहणाऱ्या लोकांवर चाकूने प्राणघातक हल्ला केला आहे. या हल्ल्यात 2 जणांचा मृत्यू झाला आहे. कौटुंबिक तणावातून हा चाकू हल्ला झाल्याचं बोललं जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील ग्रँड रोड भागातील पार्वती मेन्शन या चाळीत ही घटना घडली आहे. डी बी मार्ग पोलीस स्टेशनच्या अंतर्गत ही घटना घडली आहे. आरोपीचं नाव चेतन गाला असल्याचं सांगितलं जात आहे. कौटुंबिक वादातून या व्यक्तीने चाळीत राहणाऱ्या इतर लोकांवर चाकूने सपासप वार केले. पाच जणांवर चाकूने सपासप वार केले आहे. भरदिवस ही घटना घडली आहे. जखमींना तातडीने नायर रुग्णालयात दाखल केलं आहे. उपचारादरम्यान 2 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 3 जण जखमी आहे. पोलिसांनी या माथेफिरूला अटक केली आहे.
(विवाहित महिलेचं तीन वर्ष चाललं अफेअर, पतीने केला विरोध तर घडला अनर्थ, पती अन् तीन मुलांसोबत...)
अधिक माहिती अशी की, DB मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत पार्वती मेन्शन नावाच्या चाळीत ही घटना घडली आहे. चेतन गाला नावाच्या या माथेफिरूने आपल्या शेजारी राहणाऱ्या दाम्पत्यावर चाकूने वार केले. रागाच्या भरात च्याने 5 जणांवर चाकूनं हल्ला केला.
(एका मुलाच्या बापाचा तरुणीवर आला जीव, कारमध्ये दिसले या स्थितीत, घटनेनं खळबळ)
हल्लेखोर चेतन गाला हा कौटुंबिक मानसिक तणावात असल्याची माहिती समोर आली आहे. आपलं कुटुंब सोडून गेल्याचा त्याला राग होता. याला आपले शेजारी जबाबदार असल्याचा राग हल्लेखोर चेतन गालाला होता. त्यामुळे आज दुपारी त्याने धारदार चाकूने पाच जणांवर सपासप वार केले. अचानक झालेल्या या घटनेमुळे चाळीमध्ये एकच खळबळ उडाली. हल्लेखोर चेतनने भलामोठा चाकू घेऊन शेजारी राहत असलेले जयेंद्र आणि निला मेस्त्री यांच्यावर चाकूने सपासप 15 ते 17 वार केले. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर इतर 3 जण जखमी झाले आहे. जखमींना तातडीने नायर रुग्णालयात दाखल केलं आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहे. या प्रकरणी पोलिसांनी चेतनला अटक केली आहे. DB मार्ग पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.