अलवर, 22 मार्च : अनैतिक संबंध, विवाहबाह्य संबंध, प्रेमप्रकरणातून गुन्हे घडण्याचं प्रमाण अलीकडच्या काळात वाढलं आहे. अशा प्रकारच्या नातेसंबंधांमुळे हत्येसारखे गुन्हेदेखील घडत आहेत. राजस्थानातल्या अलवर इथे अशाच प्रकारची एक घटना घडली होती. पती प्रेमसंबंधात अडथळा ठरत असल्याने एका महिलेनं प्रियकराच्या मदतीने पतीसह तीन मुलांची निर्घृण हत्या केली होती. या प्रकरणी न्यायालयाने या महिलेसह तिच्या प्रियकराला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. `आज तक`ने याविषयीचं वृत्त दिलं आहे.
प्रेमसंबंधात कुटुंबातले सदस्य अडसर ठरत असल्याने एका महिलेनं प्रियकराच्या मदतीने त्यांची निर्घृण हत्या केली. 2 ऑक्टोबर 2017 रोजी अलवरमध्ये ही घटना घडली. संतोष ऊर्फ संध्या नावाच्या महिलेनं तिचा प्रियकर हनुमान प्रसाद याच्या मदतीने पती बनवारी, मोठा मुलगा अमनसह दोन मुलांची गळा चिरून निर्घृण हत्या केली होती.
या हत्येप्रकरणी न्यायालयाने संतोष आणि हनुमान प्रसादला दोषी ठरवलं. सरकारने नियुक्त केलेले वकील अशोक शर्मा यांनी सांगितलं, की हे एक भीषण हत्याकांड असून दोषींना मिळालेली जन्मठेपेची शिक्षा पुरेशी नाही. त्यामुळे आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करणारी याचिका जयपूर उच्च न्यायालयाच्या खंडपीठात केली जाणार आहे.
संतोष आणि हनुमान प्रसाद हे एकत्र तायक्वांदोचं प्रशिक्षण घेत होते. त्यादरम्यान या दोघांमध्ये अनैतिक संबंध निर्माण झाले. तीन वर्षांपर्यंत या दोघांचं अफेअर सुरू होतं. संतोष आणि हनुमान प्रसाद यांच्या प्रेमसंबंधाची माहिती पती बनवारीला समजली. त्यावरून अनेकदा त्याची पत्नीसोबत भांडणं झाली. तो तिला मारहाणही करत असे.
रोजची भांडणं आणि मारहाणीला कंटाळून संतोषने हनुमानच्या मदतीने कुटुंबीयांची हत्या करण्याचं प्लॅनिंग केलं. ठरलेल्या प्लॅनिंगनुसार 2 ऑक्टोबर 2017 रोजी संतोषने प्रियकराच्या मदतीनं तिचा पती, तीन मुलं आणि एका भाच्याची निर्घृण हत्या केली. हत्येपूर्वी आरोपी महिला संतोष हिने कुटुंबीयांच्या रात्रीच्या जेवणात झोपेच्या गोळ्या घातल्या. त्यानंतर तिनं घराचा दरवाजा उघडला. त्या वेळी तिचा प्रियकर हनुमान प्रसाद आणि त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांनी घरात प्रवेश केला.
सर्वप्रथम या तिघांनी संतोषचा पती बनवारी आणि तिचा मोठा मुलगा अमन याची चाकूने गळा चिरून हत्या केली. यादरम्यान अन्य दोन मुलं झोपेतून जागी होत असल्याचं दिसताच त्यांनी या दोन्ही मुलांचीदेखील गळा चिरून हत्या केली. या वेळी संतोष पायऱ्यांवर उभी राहून सर्व घटनाक्रम पाहत होती. या हत्येप्रकरणी न्यायालयाने पाच वर्षांनंतर संतोष आणि हनुमान प्रसादला दोषी ठरवलं आणि त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Murder Mystery, Physical Relationship, Rajasthan, Women extramarital affair