मुजफ्फरनगर, 24 मार्च : देशात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अनैतिक संबंधांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे सातत्याने समोर येत आहे. त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर जिल्ह्यात दिल्ली-डेहराडून राष्ट्रीय महामार्ग-58 वर बुधवारी एका प्रेमी युगुलाने विष घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. तर याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी प्रेमी युगुलाला रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान प्रियकराचा मृत्यू झाला, तर प्रेयसीची गंभीर स्थिती पाहून तिला मेरठला रेफर करण्यात आले आहे. हे प्रेमी युगल उत्तराखंडची राजधानी डेहराडून येथून 2 दिवसांपासून फरार असल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना नवीन मंडी कोतवाली भागातील राष्ट्रीय महामार्ग-58 चे आहे. पडक्या अवस्थेत उभ्या असलेल्या स्विफ्ट कारमधून दुर्गंधी येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून कार उघडली असता तरुण आणि महिला त्यामध्ये बेशुद्ध अवस्थेत पडलेले त्यांना दिसले. पोलिसांनी कारमधून विषारी पदार्थाची रिकामी बाटली जप्त केली आहे. यादरम्यान पोलिसांनी तरुण व तरुणीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. जिथे तरुणाचा मृत्यू झाला, तर डॉक्टरांनी मुलीला मेरठला रेफर केले. विवाहित महिलेचं तीन वर्ष चाललं अफेअर, पतीने केला विरोध तर घडला अनर्थ, पती अन् तीन मुलांसोबत… मृत तरुणाचे नाव अमनदीप जैस्वाल असून तो डेहराडूनच्या केदारपुरम येथील रहिवासी होता. तर पल्लवी असे तरुणीचे नाव असून ती डेहराडूनच्या इंद्रेश नगर येथील रहिवासी आहे. अमनदीप विवाहित होता. तसेच एका मुलाचा बापही होता. तर पल्लवी अविवाहित आहे. दोघांमध्ये बरेच दिवसांपासून प्रेमसंबंध होते. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी दोघेही घरातून फरार झाले होते. सध्या या संपूर्ण प्रकरणाबाबत अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, या संदर्भात माहिती घेतली असता डेहराडून दालनवाला पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहर पोलीस अधीक्षक सत्यनारायण प्रजापत यांनी सांगितले की, नई मंडी पोलिसांना माहिती मिळाली होती की, रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनात एक तरुणी आणि एक तरुण बेशुद्धावस्थेत पडले आहेत. त्यानंतर घटनास्थळी धाव घेतल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला. सध्या पोलिसांनी या संदर्भात प्रेमी युगुलाच्या नातेवाईकांना माहिती दिली आहे. पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.