मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /Sangram Jagtap: मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या गाडीला अपघात, BMW कार आणि एसटीमध्ये धडक

Sangram Jagtap: मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या गाडीला अपघात, BMW कार आणि एसटीमध्ये धडक

NCP MLA Sangram Jagtap: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांच्या गाडीला मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर अपघात झाला आहे.

NCP MLA Sangram Jagtap: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांच्या गाडीला मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर अपघात झाला आहे.

NCP MLA Sangram Jagtap: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांच्या गाडीला मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर अपघात झाला आहे.

मुंबई, 17 मे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संग्राम जगताप (NCP MLA Sangram Jagtap) यांच्या गाडीला अपघात झाला आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर (Mumbai Pune Expressway) आमदार संग्राम जगताप यांच्या गाडीला भीषण अपघात झाला असल्याची माहिती समोर आली आहे. एसटी बस आणि आमदार संग्राम जगताप यांच्या बीएमडब्ल्यू कारमध्ये हा अपघात झाला आहे. (NCP MLA Sangram Jagtap car accident on Mumbai Pune Expressway)

सुदैवाने या अपघातात आमदार संग्राम जगताप यांना कुठलीही दुखापत झालेली नाहीये. या अपघातातून आमदार संग्राम जगताप थोडक्यात बचावले आहेत. या अपघातात संग्राम जगताप यांच्या बीएमडब्ल्यू कारचे मोठे नुकसान झाले आहे. सकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास रसायनीजवळ हा अपघात झाला आहे.

मुंबई-आग्रा महामार्गावर तिहेरी अपघातात तिघांचा मृत्यू

मुंबई-आग्रा महामार्गावर धुळे जिल्ह्यात भीषण अपघात झाला आहे. तीन गाड्या एकमेकांना धडकल्याने झालेल्या अपघातात दोन गाड्यांचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की, तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे तर 9 जण जखमी झाले आहेत. धुळे जिल्ह्यात मुंबई-आग्रा महामार्गावर मित्रनगर जवळ हा भीषण अपघात झाला आहे.

धुळे जिल्ह्यात रात्रीच्या सुमारास हा अपघात झाला आहे. ट्रक, अॅपे रिक्षा आणि क्रूझर गाड्या एकमेकांना धडकून विचित्र अपघात झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की, रिक्षा आणि क्रूझर गाडीचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे.

वाचा : पुण्यात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याला मारहाण, भाजपच्या तिघांवर गुन्हा दाखल

तिन्ही गाड्यांमध्ये झालेल्या भीषण अपघातानंतर चक्क क्रेनच्या सहाय्याने या गाड्या वेगळ्या करण्यात आल्या. धुळे तालुका पोलिसांनी रात्री मदतकार्य करत जखमींना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. अपघातातील जखमींवर हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. अपघातामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. अपघात झालेल्या गाड्या महामार्गावरुन हटवण्यात आल्या आणि त्यानंतर महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.

मुंबई-गोवा महामार्गावरही अपघात

मुंबई गोवा महामार्गावर रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील खवटी गावानजीक भीषण अपघात झाला आहे. चालकाचे वाहनवरील नियंत्रण सुटल्याने महामार्गालगत उभ्या असलेल्या आयशर टेम्पोला क्वालिस गाडीने पाठीमागून धडक दिली. या अपघातात क्वालिस गाडी चालकाचा मृत्यू झाला आहे तर गाडीतील सात प्रवाशांना गंभीर दुखापत झाली आहे.

First published:

Tags: Accident, NCP