Home /News /mumbai /

पंकजा मुंडे, बाळासाहेब थोरात, सुजय विखेंपाठोपाठ अखेर 'त्या'ने रोहित पवारांनाही गाठलं!

पंकजा मुंडे, बाळासाहेब थोरात, सुजय विखेंपाठोपाठ अखेर 'त्या'ने रोहित पवारांनाही गाठलं!


'तुमच्या सोबत त्याच्याशी लढत असताना गेली दोन वर्षे त्याला हुलकावणी देत होतो, पण अखेर त्याने मला गाठलंच'

'तुमच्या सोबत त्याच्याशी लढत असताना गेली दोन वर्षे त्याला हुलकावणी देत होतो, पण अखेर त्याने मला गाठलंच'

'तुमच्या सोबत त्याच्याशी लढत असताना गेली दोन वर्षे त्याला हुलकावणी देत होतो, पण अखेर त्याने मला गाठलंच'

मुंबई, 03 जानेवारी : कोरोनाची (Corona Virus) लाट ओसरल्यामुळे सर्वत्र काही सुरुळीत चाललं होतं. पण अलीकडे काही दिवसांपासून पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढलं आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या (Corona Patients)  संख्येत वाढ होत आहे. अशातच महाविकास आघाडीचे मंत्री, आमदार आणि नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे.  आज सकाळीच भाजपचे खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil corona test positive) यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. तर दुसरीकडे, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (rohit pawar corona test positive)  यांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची भीती वर्तवली जात आहे. मुंबई आणि पुण्यासह संपूर्ण राज्यभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून राजकीय नेत्यांना आणि मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामध्ये आता रोहित पवार यांचाही समावेश झाला आहे. रोहित पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. 'तुमच्या सोबत त्याच्याशी लढत असताना गेली दोन वर्षे त्याला हुलकावणी देत होतो, पण अखेर त्याने मला गाठलंच. माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे,असं रोहित पवार म्हणाले. ('स्वामिनी' फेम अभिनेत्रीनं चिमुकलीचा फोटो शेअर करत दिली GOOD NEWS) तसंच, 'आपला आशीर्वाद असल्याने काळजीचं काही कारण नाही. माझ्या संपर्कात आलेल्यांनी टेस्ट करून घ्यावी आणि काही लक्षणे असल्यास तातडीने उपचार घ्यावेत' असं आवाहनही रोहित पवार यांनी केलं. आज सकाळीच अहमदनगर दक्षिणचे खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांना कोरोनाची लागण झाली आहे. ट्विट करुन त्यांनी याबाबतची माहिती दिली. भाजप आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्यापाठोपाठ सुजय विखे पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. पंकजा मुंडेंना ओमायक्रॉनची लागण भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना कोरोनाच्या ओमायक्रॉन (Omicron) या नव्या व्हेरिएंटची लागण झाली आहे. पंकजा मुंडेंना याआधी एप्रिल 2020 मध्येदेखील कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे पंकजा यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना ओमायक्रॉनची लागण झाल्याची शंका व्यक्त करण्यात येत होती. त्यामुळे त्यांचे स्वॅब जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठविण्यात आले होते. त्याचा रिपोर्ट रविवारी समोर आला असून त्यांना ओमायक्रॉनची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. तरीही पंकजा यांची प्रकृती ठीक असून काळजी करण्यासारखं काही नाही, असं सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे. महाराष्ट्रातील 10 मंत्री आणि 20 पेक्षा जास्त नेते कोरोनाबाधित, अजित पवारांची माहिती राज्यातील 10 मंत्री आणि 20 पेक्षा जास्त नेते कोरोनाबाधित असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली. "काळजी घ्या कोरोनामुळे स्थिती फार वेगाने खराब होतेय. राज्याचे 10 मंत्री आणि 20 पेक्षा जास्त नेते कोरोना बाधित आहेत. सगळ्यांना नियम पाळावे लागतात स्थिती जर आणखी बिघडली तर कठोर निर्णय घ्यावा लागेल", असं अजित पवार म्हणाले. (तिच्यासाठी कायपण! GF साठी BF ने असं काही केलं की पाहणारा प्रत्येक जण थक्क झाला) राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आदिवासी विकास मंत्री के सी पाडवी यांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील यांनाही कोरोनाची लागण झाली आहे
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या