जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / 'स्वामिनी' फेम अभिनेत्रीच्या घरी चिमुकलीचं आगमन ; फोटो शेअर करत दिली GOOD NEWS

'स्वामिनी' फेम अभिनेत्रीच्या घरी चिमुकलीचं आगमन ; फोटो शेअर करत दिली GOOD NEWS

'स्वामिनी' फेम अभिनेत्रीच्या घरी चिमुकलीचं आगमन ; फोटो शेअर करत दिली GOOD NEWS

मराठमोळी अभिनेत्री सुरभी भावे (surabhi bhave ) हिने नुकतीच चाहत्यांसोबत एक गुडन्यूज (GOOD NEWS) शेअर केली आहे. तिला कन्यारत्न प्राप्ती झाली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 3 जानेवारी- मराठमोळी अभिनेत्री सुरभी भावे (surabhi bhave ) हिने नुकतीच चाहत्यांसोबत एक गुड न्यूज (GOOD NEWS) शेअर केली आहे. तिला कन्यारत्न प्राप्ती झाली आहे. 17 नोव्हेंबर 2021 रोजी सुरभिला**( surabhi bhave blessed with baby girl)** मुलगी झाली आहे.मात्र आता तिनं सोशल मीडियावर लाडक्या लेकीसोबत फोटो शेअर करत ही माहिती दिली आहे. तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. नवीन वर्षाचे निमित्त साधत सुरभीने तिच्या मुली व पतीसोबत एक छानसा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिनं मुलगी झाल्याची गोड बातमी चाहत्यांना दिली आहे. अनेक सेलेब्ससहीत चाहत्यांकडून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. वाचा- ‘‘पिंकीचा विजय असो’ मालिकेतील पिंकी कोण माहीत आहे का? सुरभी भावेने आजपर्यंत मालिकेत नकारात्मक भूमिका साकारल्या आहे. सुरभी गेल्या 9 ते 10 वर्षांपासून अभिवय क्षेत्रात कार्यरत आहे. सुरभीने आतापर्यंत असावा सुंदर स्वप्नांचा बंगला, तुला पाहते रे, सख्या रे, गोठ, स्वामिनी, डॉ बाबासाहेब आंबेडकर, अस्मिता, माझे पती सौभाग्यवती, चित्रगथी, क्राईम डायरी, चंद्र आहे साक्षीला या मालिकेत भूमिका साकारल्या आहेत. 21 जानेवारी 2022 रोजी पावनखिंड हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात सुरभी भावे मातोश्री सोनाई देशपांडे ही व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. सुरभीला मोठ्या पडद्यावर पाहण्याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.

जाहिरात

सुरभी भावे सैनिकी शाळेत काही वर्षे शिक्षण घेतले आङे. त्यामुळे सुरुवातीपासूनच शिस्त तिच्या अंगवळणी पडली आहे . सुरभीने घोडेस्वारी, कराटे याचेही प्रशिक्षण घेतले आहे. यासोबतच तिनं मास मीडियाचे शिक्षण घेतले आहे. वाचा- Video : स्टार प्रवाहवर रिमेकची चलती ; नवीन वर्षात भेटीला येणार लग्नाची बेडी स्वामिनी मालिकेतील सुरभीच्या नकारात्मक भूमिकेचे प्रेक्षकांकडून खूपच कौतुक झाले. या मालिकेने सुरभीला एक वेगळी ओळख दिली. आता मुलीच्या जन्मानंतर सुरभी कोणत्या नव्या मालिकेत दिसणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात