VIDEO: शरद पवारांनी भाजपला दिली ‘विदुषका’ची उपमा, ते काय म्हणाले ऐका!

VIDEO: शरद पवारांनी भाजपला दिली ‘विदुषका’ची उपमा, ते काय म्हणाले ऐका!

  • Share this:

मुंबई 9 जून: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी केलेल्या टीकेलाही त्यांनी जोरदार उत्तर दिलं. महाराष्ट्रातलं महाविकास आघाडीचं ही एक सर्कस आहे अशी टीका राजनाथसिंग यांनी केली होती. महाराष्ट्रातलं सरकार जर सर्कस असेल तर त्यांना आता एका विदुषकाची गरज आहे असा सणसणीत टोला त्यांनी लगावला. राष्ट्रवादीच्या स्थापना दिवसानिमित्त पवारांनी फेसबुक लाईव्ह करून कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्या संवादात त्यांनी ही टीका केली.

शरद पवार म्हणाले, पक्ष दोन दशकं वेगवेगळ्या टप्प्यातून गेला आहे. सत्ता नसताना आणि सत्ता असताना पक्ष कधीही संपलेला नाही. तो कार्यकर्त्यांच्या जीवावर उभा आहे असे पवारांनी म्हटले आहे. 10 जून हा राष्ट्रवादीचा स्थापना दिवस आहे. या 22व्या स्थापनादिना निमित्त पवारांनी हा संवाद साधला.

पक्ष संपून जाईल अशी भाकीत ज्यांनी केली त्यांना देखील पवारांनी या संदेशामध्ये टोला हाणला आहे. काहींनी पक्ष संपेल अशी भाकितं वर्तवली होती पण तसं झालं नाही कार्यकर्त्यांच्या जोरावर आजही पक्ष उभा आहे. सत्ता असताना आणि सत्ता नसतानाही पक्ष जिवंत ठेवलाय त्या कार्यकर्त्यांचे आभार त्यांनी मानले.

शरद पवारांवर टीका करणाऱ्या चंद्रकांत पाटलांवर जितेंद्र आव्हाडांनी साधला निशाणा

पक्षांनी खूप काही दिलेल्या अनेक नेत्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी संस्थांसाठी आणि सत्तेसाठी पक्ष सोडून गेल्याचं दिसून आलं पण नेते गेले तरी कार्यकर्त्यांच्या जीवावर राष्ट्रवादी तगून राहिली आहे असेही पवार यांनी आवर्जून नमूद केले.

'साहेब घाटावर जास्त लक्ष देता...', कोकणात पवारांसमोरच तरुणाने व्यक्त केला संताप

Corona विषाणूचं संकट राज्यात सर्वत्र आहे. मुंबईसह महत्त्वाच्या शहरात मृत्यूचा आकडा देखील वाढताना दिसत आहे अशा परिस्थितीत महाराष्ट्राने या आधीही अनेक संकटं पाहिली आणि त्यातून महाराष्ट्र पुन्हा उभा राहिला. पण हे संकट वेगळं आहे. आता वर्धापन दिवसाच्या दिवशी निमित्त पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रक्तदान करून मोठ्या प्रमाणात सामाजिक उपक्रम राबवावा असं आवाहन देखील पवारांनी केलं.

महिला सक्षमीकरण यासाठी सुप्रिया सुळे आणि रुपाली चाकणकर हे लक्ष देतील असंही पवार म्हणाले. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे तसेच गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सर्व व्यवस्था यंत्रणा योग्य हाताळली. घराघरात जाऊन तिथल्या व्यवस्था पाहण्याचे काम या राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी केले हे कौतुकास्पद आहे असे म्हणत पवारांनी राजेश टोपे, अनिल देशमुख, अजित पवार, छगन भुजबळ  यांचे कौतुक केलं.

संपादन - अजय कौटिकवार

First published: June 9, 2020, 6:13 PM IST

ताज्या बातम्या