'साहेब घाटावर जास्त लक्ष देता...', कोकणात शरद पवारांसमोरच तरुणाने व्यक्त केल्या संतप्त भावना

'साहेब घाटावर जास्त लक्ष देता...', कोकणात शरद पवारांसमोरच तरुणाने व्यक्त केल्या संतप्त भावना

शरद पवार यांच्या कोकण दौऱ्यात जनतेनं आपलं दुःख व्यक्त केलं. पण म्हळासा गावात एका तरुणाने संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत.

  • Share this:

रायगड, 9 जून : निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार दोन दिवसांच्या कोकण दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी रायगड जिल्ह्यातील माणगाव, दिवे आगार आणि श्रीवर्धन येथे नुकसान पाहणी केली. व्यापारी, शेतकरी यांच्यासोबत चर्चा केली. आता श्रीवर्धन येथे अधिकारी यांच्यासोबत चर्चा करत आहेत. यावेळी पालकमंत्री अदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे आणि इतर आमदार उपस्थित आहेत.

शरद पवार यांच्या कोकण दौऱ्यात जनतेनं आपलं दुःख व्यक्त केलं. पण म्हळासा गावात एका तरुणाने संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत. 'साहेब आपण घाटावर जास्त लक्ष देतो, जरा कोकणाकडे देखील लक्ष द्या,' अशा शब्दात एका तरुणाने आपल्या भावना व्यक्त केल्या.

दरम्यान, शरद पवार यांनी माणगाव येथे भेट दिल्यानंतर त्यांनी म्हसळा येथे चक्रीवादळाने उध्वस्त झालेल्या मदरसाला भेट दिली. मदरसाची पाहणी करून त्याबाबत माहिती संबंधिताकडून घेतली. त्यानंतर त्याचा लवाजमा दिवेआगर कडे रवाना झाला. दिवेआगर येथे नुकसानग्रस्त बागायतदार यांची भेट घेऊन पाहणी केली.

निसर्ग चक्रीवादळ आणि कोकण

निसर्ग चक्रीवादळ कोकणात धडकल्यानंतर अनेक जिल्ह्यांमध्ये मोठं नुकसान झालं आहे. अनेकांच्या घरावरील पत्र उडाले आहेत. तसंच काही ठिकाणी वीजप्रवाह खंडीत झाला आहे. यामुळे कोकणातील लोकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार पाहणी करून परिस्थितीची माहिती घेत आहेत.

संपादन - अक्षय शितोळे

First published: June 9, 2020, 5:12 PM IST

ताज्या बातम्या