मुंबई, 08 ऑक्टोबर: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (NCP Leader) आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत पुन्हा एकदा त्यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. गेल्या शनिवारी मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या Cordelia क्रूझवर एनसीबीने धाड टाकून ड्रग्ज पार्टीचा पर्दाफाश केला. या प्रकरणात आतापर्यंत 18 जणांना अटक करण्यात आली असून त्यात अभिनेता शाहरूख खान (Shah Rukh Khan) याचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याचाही समावेश आहे. दरम्यान एनसीबीच्या (NCB) कारवाईवर नवाब मलिकांनी काही गंभीर आरोप करत प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत. आजही त्यांनी या प्रकरणी एक गौप्यस्फोट केला आहे. या कारवाई दरम्यान भाजप नेत्याच्या एक मेहुण्याला सोडून दिल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला आहे.
क्रूझवरील ड्रग्स पार्टीतून ताब्यात घेतलेल्यांपैकी दोन जणांना सोडण्यातं आलं असं म्हणत त्यात भाजप नेत्याच्या एका मेहुण्याला सोडून देण्यात आल्याचा नवाब मलिकांनी आज केला आहे. भाजप नेत्याचा मेहुणा कारवाईतून कसा सुटला? असा सवाल मलिकांनी उपस्थित केला आहे.
हेही वाचा- IPL 2021: पराभवानंतरही CSK कॅम्पमध्ये जल्लोष! धोनी, रैनानं चहरला घातली केकची आंघोळ VIDEO
तसंच उद्या 12 वाजता पत्रकार परिषद घेणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. उद्याच्या पत्रकार परिषदेत व्हिडिओसह माहिती देणार असल्याचं त्यांनी सांगितलं. उद्या सर्व पुरावे सादर करणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं.
पुढे नवाब मलिक म्हणाले की, समीर वानखेडे यांनी मीडियाला बाईट दिली होती की 8 ते 10 लोकांना पकडलं आहे. त्यावेळी मी प्रश्न विचारले होते एक अधिकारी संपूर्ण कारवाई करतोय तो असे अंदाजे उत्तर कसे काय देऊ शकतो. जर 10 लोकांना पकडले असेल तर कदाचित 2 लोकांना सोडलं असेल. आता हे खरं असल्याचं समोर आलं आहे. जी दोघे सोडण्यात आले त्यामध्ये भाजपचे एका नेत्याचा मेहुणा त्यामध्ये होता. त्याबाबत उद्या मी खुलासा करणार आहे. त्या दोन लोकांना आणण्यात आला होतं आणि काही तासांनी त्यांना सोडण्यात आलं असल्याचा आरोप मलिकांनी केला आहे.
हे जाणीवपूर्वक करण्यात आलं आहे. सगळा प्रकार समोर येईल म्ह्णून त्यांना सोडण्यात आले आहे का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
हेही वाचा- आईच्या वाढदिवशी तरी जेलबाहेर येणार का आर्यन खान की वाढणार मुक्काम?
भाजपचा कोण नेता आहे त्याचं नाव उद्या मी घोषित करणार आहे. आज इतकंच सांगेल की तो हायप्रोफाईल नेता आहे. त्यानंच सगळं गॉसिप केलं आहे. पहिल्यांदा म्हटले की यामध्ये राजकीय व्यक्ती आहे. त्यानंतर मग हा पॉलिटिकल कनेक्शन असणारा माणूस सुटलाच कसा असा माझा सवाल आहे. त्यांना याच उत्तर द्यावंचं लागेल, असंही नवाब मलिक म्हणालेत.
बुधवारच्या पत्रकार परिषदेतही खळबळजनक खुलासा
नवाब मलिक यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत एनसीबीवर गंभीर आरोप केला. त्यानंतर तातडीने एनसीबीने सुद्धा पत्रकार परिषद घेत आरोप फेटाळले. त्यानंतर आता राज्याचे कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक पुन्हा एकदा शनिवारी पत्रकार परिषद घेणार आहेत. या संदर्भात नवाब मलिक यांनी ट्विट करत म्हटलं, "एनसीबीच्या सुरु असलेल्या चुकीच्या कारवाईच्या संदर्भात मला माहिती उघड करायची आहे आणि त्यासाठी माहिती गोळा करायला थोडा वेळ लागणार आहे. यााठी पत्रकार परिषद शुक्रवार ऐवजी शनिवारी आयोजित केली आहे. शनिवारी दुपारी 12 वाजता मुंबईतील राष्ट्रवादी भवनात पत्रकार परिषद होईल." आता नवाब मलिक कुठला नवा गौप्यस्फोट करतात हे पहावं लागेल.
एनसीबीवर गंभीर आरोप
नवाब मलिक यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत एनसीबीच्या कारवाईवर गंभीर आरोप केला. नवाब मलिक यांनी म्हटलं होतं, शनिवारी एनसीबी (NCB) ने CISF कडून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या क्रूझवर (Cruise Ship) छापा टाकला होता. या कारवाईत बॉलिवूडचा स्टार शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानसह काही जणांना अटक केली. एनसीबीनं केलेल्या या कारवाईसंदर्भात मलिक यांनी पत्रकार परिषदेत व्हिडीओ दाखवून गौप्यस्फोट केला आहे. 'आर्यन खानची अटक ही बनावट आहे. गेल्या एक महिन्यापासून याबद्दल पत्रकारांना माहिती प्रसारित केली जात होती की पुढील लक्ष्य अभिनेता शाहरुख खान आहे, असं नवाब मलिक म्हणाले.
हेही वाचा- घुसखोरी करण्याचं धाडस करणाऱ्या चिनी सैनिकांना भारताचा दणका, उधळला कट
कारवाईच्या संदर्भातील जो व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्या व्हिडीओत एक व्यक्ती आर्यन खानला घेऊन जात आहे आणि याच व्यक्तीसोबत आर्यन खानचा एक सेल्फी फोटो आहे. त्यानंतर एनआयएनं दिल्लीतल्या एका अधिकाऱ्याच्या माहितीच्या आधारावर माहिती दिली की, NCB नं सांगितलं की हा व्यक्ती आमचा अधिकारी नाही. अरबाज मर्चंटचा देखील एक व्हिडीओ एनआयएनं रिलीज केला. यात लाल शर्ट घातलेली व्यक्ती दिसत आहे. हे दोन्ही फीड एनआयएनं रिलीज केलेत. या व्हिडीओत पहिला व्यक्ती के. पी. गोसावी आणि दुसरा व्यक्ती मनीष भानुशाली आहे, असंही मलिक यांनी सांगितलं.
तसेच हा व्यक्ती भाजपचा असून पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस, जे. पी. नड्डा आणि आशिष शेलार यांच्यासोबत फोटो आहेत. त्यामुळे मलिकांनी काही सवाल उपस्थित केलेत. एनसीबी आणि भाजपचे काय संबंध आहेत हे एनसीबीनं सिद्ध करावं, असं आव्हानच मलिकांनी दिलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Nawab malik, NCB