मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

शाहरुख खानचा मुलगा आर्यनच्या जामिनावर अर्जावर आज सुनावणी, मुक्काम वाढणार?

शाहरुख खानचा मुलगा आर्यनच्या जामिनावर अर्जावर आज सुनावणी, मुक्काम वाढणार?

Aryan Khan Case: सध्या आर्यन खान तुरुंगात असून आज त्याच्या जामीन अर्जावर (bail plea) सुनावणी होणार आहे.

Aryan Khan Case: सध्या आर्यन खान तुरुंगात असून आज त्याच्या जामीन अर्जावर (bail plea) सुनावणी होणार आहे.

Aryan Khan Case: सध्या आर्यन खान तुरुंगात असून आज त्याच्या जामीन अर्जावर (bail plea) सुनावणी होणार आहे.

  • Published by:  Pooja Vichare

मुंबई, 08 ऑक्टोबर: मुंबईत क्रूझवर (Cruise ship Drugs Case)ड्रग्स पार्टी दरम्यान एनसीबीनं छापेमारी केली. या कारवाईमध्ये बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा (Shahrukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan)या अटक करण्यात आली. सध्या आर्यन खान तुरुंगात असून आज त्याच्या जामीन अर्जावर (bail plea) सुनावणी होणार आहे. त्यात आज शाहरुख खानची पत्नी गौरी खानचा (Gauri Khan) वाढदिवस (Birthday)देखील आहे. त्यामुळे आईच्या वाढदिवशी तरी आर्यन तुरुंगाबाहेर येईल की त्याचा तुरुंगातील आणखी मुक्काम वाढेल हे पाहावं लागणार आहे. सकाळी 11 वाजता आर्यनच्या जामीन अर्जावर सुनावणीस सुरुवात होईल.

याआधी गुरुवारी न्यायालयानं आर्यन खान आणि इतर सात आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. गुरुवारी आर्यनच्या खटल्याच्या सुनावणीदरम्यान, न्यायमूर्ती आर एम नेर्लीकर यांनी कोठडी वाढवण्याची एनसीबीची याचिका फेटाळून लावली. अस्पष्ट कारणास्तव कोठडी मंजूर केली जाऊ शकत नाही असं म्हणत न्यायालयाने सांगितलं की, जामीन अर्जावर शुक्रवारी सुनावणी होईल.

हेही वाचा- IPL 2021: आयपीएल स्पर्धेनंतर टीम इंडियाचा दिग्गज खेळाडू होणार निवृत्त! 

आर्यन खान, मुनमुन धामेचा आणि अरबाज मर्जेंट यांना एनसीबीने 3 ऑक्टोबर रोजी गोव्याच्या क्रूझवर छापेमारीदरम्यान अटक केली होती. तर उर्वरित पाच जणांना दुसऱ्या दिवशी अटक करण्यात आली होती. गुरुवारी कोठडीची मुदत संपल्यानंतर आरोपींना अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी आर एम नेर्लीकर यांच्यासमोर हजर करण्यात आलं. तेथून त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

हेही वाचा- घुसखोरी करण्याचं धाडस करणाऱ्या चिनी सैनिकांना भारताचा दणका, उधळला कट

एनसीबीला आरोपींना 11 ऑक्टोबरपर्यंत कोठडीत ठेवायचं होतं. एजन्सीने न्यायालयाला सांगितलं की त्याने आर्यन आणि मर्चंटच्या वक्तव्याच्या आधारे अचित कुमारला अटक केली आहे. एनसीबीने म्हटलं की, या षड्यंत्राचा पर्दाफाश करण्यासाठी आरोपींना कुमारच्या समोर भेट घडवून आणणं गरजेचं आहे. कुमारला बुधवारी संध्याकाळी अटक करण्यात आली. त्याला गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर त्याला 9 ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी सुनावण्यात आली.

First published:

Tags: Aryan khan, NCB, Shah Rukh Khan