मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021: पराभवानंतरही CSK कॅम्पमध्ये जल्लोष! धोनी, रैनानं चहरला घातली केकची आंघोळ VIDEO

IPL 2021: पराभवानंतरही CSK कॅम्पमध्ये जल्लोष! धोनी, रैनानं चहरला घातली केकची आंघोळ VIDEO

आयपीएलमध्ये गुरुवारी झालेल्या मॅचमध्ये चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) पंजाब किंग्जनं (PBKS) 6 विकेट्सनं पराभव केला. या पराभवानंतरही चेन्नईच्या कॅम्पमध्ये जल्लोषाचं वातावरण होतं. त्याचं कारणही तितकंच खास आहे.

  • Published by:  News18 Desk
दुबई, 8 ऑक्टोबर: आयपीएलमध्ये गुरुवारी झालेल्या मॅचमध्ये चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) पंजाब किंग्जनं (PBKS) 6 विकेट्सनं पराभव केला. पंजाबचा कॅप्टन केएल राहुलनं (KL Rahul) 98 रनची आक्रमक खेळी केली. या पराभवानंतरही चेन्नईच्या कॅम्पमध्ये जल्लोषाचं वातावरण होतं. त्याचं कारणही तितकंच खास आहे. पंजाबविरुद्धच्या पराभवानंतरही चेन्नईचे सर्व सदस्य फास्ट बॉलर दीपक चहरसाठी (Deepak Chahar) खूश होते. दीपकनं पंजाब विरुद्धच्या मॅचच्या दरम्यान सर्वांसमोर त्याची गर्लफ्रेंड जया भारद्वाजला (Jaya Bhardwaj) प्रपोज केले. यावेळी सीएसकेचे खेळाडू तसंच त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. त्या सर्वांनी दीपक आणि जयाचा हा आनंद सेलिब्रेट केला. चेन्नईची टीम मॅचनंतर हॉटेलमध्ये परतली त्यावेळी नव्या कपलचं सर्वांनी जोरदार स्वागत केले. हॉटेलच्या लॉबीमध्ये दीपक आणि जयासाठी केक तयार होता. त्यांनी एकत्र हा केक कापला आणि एकमेकांना भरवला. त्यानंतर सुरेश रैनानं जयाला बाजूला होण्याचा इशारा केला. धोनीनं दीपकला पकडले. सुरेश रैना, रविंद्र जडेजा आणि टीमच्या अन्य सदस्यांनी  दीपकला केकची आंघोळ घातली. साक्षी धोनीनं जयाची गळाभेट घेतली. तसंच रैनाची मुलगी ग्रेसियानंही जया आणि दीपकचं अभिनंदन केलं. चेन्नई सुपर किंग्सनं हा व्हिडीओ शेअर केला आहे.
कोण आहे जया भारद्वाज? दीपक चहरची गर्लफ्रेंड जया भारद्वाज  दिल्लीतल्या एका कॉर्पोरेट कंपनीमध्ये  काम करते. प्रसिद्धीपासून फार लांब असल्यामुळे जयाबद्दल कोणालाच फारशी माहिती नाही. सोशल मीडियावरही ती फारशी ऍक्टिव्ह नसते. एमटीव्ही स्पिल्ट्स व्हिला सिझन 2 चा विजेता असलेल्या सिद्धार्थ भारद्वाजची ती लहान बहिण आहे. सिद्धार्थ भारद्वाज फक्त VJ नाही तर मॉडेलही आहे. IPL 2021 : मॅच संपल्यावर Deepak Chahar ने मैदानातच केलं गर्लफ्रेंडला Propose, Romantic Video दीपक चहर चेन्नई सुपर किंग्स टीमचा महत्त्वाचा खेळाडू आहे. पंजाबविरुद्धच्या सामन्यात दीपक चहरला चमकदार कामगिरी करता आली नाही. 4 ओव्हरमध्ये त्याने 48 रन दिल्या, तसंच त्याला एकही विकेट मिळाली नाही. टी-20 वर्ल्ड कपमध्ये दीपक चहर टीम इंडियाच्या स्टॅण्डबाय खेळाडूंमध्ये आहे.
First published:

Tags: Csk, IPL 2021, Video viral

पुढील बातम्या