• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • Exclusive: भारतानं अरुणाचल प्रदेशमध्ये चिनी घुसखोरी उधळली, चिनी सैनिकांना घेतलं ताब्यात

Exclusive: भारतानं अरुणाचल प्रदेशमध्ये चिनी घुसखोरी उधळली, चिनी सैनिकांना घेतलं ताब्यात

चीनच्या (China) सैनिकांनी पुन्हा एकदा भारताच्या (India) हद्दीत घुसण्याचं धाडस केलं आहे. मात्र भारतीय सैन्यानं चीनच्या सैनिकांचा प्लान उधळून लावला.

 • Share this:
  नवी दिल्ली, 08 ऑक्टोबर: चीनच्या (China) सैनिकांनी पुन्हा एकदा भारताच्या (India) हद्दीत घुसण्याचं धाडस केलं आहे. मात्र भारतीय सैन्यानं चीनच्या सैनिकांचा प्लान उधळून लावून त्यांच्या काही सैनिकांना ताब्यात घेतलं आहे. News18 ला मिळालेल्या माहितीनुसार, चिनी सैनिकांनी (Chinese Soldiers) अरुणाचल प्रदेशातील (Arunachal Pradesh) तवांगमध्ये घुसून भारतीय सीमेवरील रिकाम्या बंकरांचे नुकसान करण्याचा प्रयत्न केला. अशी माहिती समोर येत आहे की, चीनच्या सुमारे 200 सैनिकांनी भारतीय सीमेच्या आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र भारतीय सैनिकांनी चीन सैनिकांचा हा प्लान उधळून लावत त्यांना हाकलून लावलं आहे. ही घटना गेल्या आठवड्यात बुम ला आणि यांग्त्से बॉर्डर जवळच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ (LAC) घडली असल्याची माहिती मिळाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील चिनी सैनिकांनी सीमेमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. ज्याला भारतीय सैनिकांनी तीव्र विरोध करत काही चीनी सैनिकांना तात्पुरते ताब्यात घेतलं. हेही वाचा-  महाराष्ट्रात पुढचे चार दिवस धो-धो पाऊस,  या 6 राज्यात IMD चा इशारा सरकारी सूत्रांनी News18.comला दिलेल्या माहितीनुसार, चिनी सैनिकांच्या अटकेची बातमी समोर आल्यानंतर स्थानिक लष्करी कमांडर स्तरावर चर्चा झाली आणि नंतर चीनी सैनिकांची सुटका करण्यात आली. या संपूर्ण घटनेवर लष्कराकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मात्र संरक्षण आणि सुरक्षा सूत्रांनी News18.comला सांगितलं की भारतीय सुरक्षा दलांचे कोणतंही नुकसान झालेलं नाही. हेही वाचा- IPL 2021: आयपीएल स्पर्धेनंतर टीम इंडियाचा दिग्गज खेळाडू होणार निवृत्त!  भारत-चीन सीमा अद्याप औपचारिकपणे विभागण्यात आलेली नाही. याच कारणानं सीमेबाबत दोन्ही देशांमध्ये वाद आहे. मात्र, दोन्ही देशांच्या सीमेवर शांतता राखण्यासाठी अनेक करार करण्यात आले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही देश आपल्या सीमा लक्षात घेऊन गस्त घालत राहतात. बऱ्याचदा असं घडतं की जेव्हा दोन्ही देशांचे सैनिक एकाच वेळी एकाच ठिकाणी पोहोचतात तेव्हा दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये तणाव वाढतो.
  Published by:Pooja Vichare
  First published: