जितेंद्र आव्हाडांनी लिहिलं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र, म्हणाले 'हिच ती वेळ'

जितेंद्र आव्हाडांनी लिहिलं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र, म्हणाले 'हिच ती वेळ'

राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना एक पत्र लिहिलं आहे.

  • Share this:

मुंबई, 21 मे: राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना एक पत्र लिहिलं आहे. सध्या धारावीत कोरोना व्हायरसमुळे जी स्थित्यंतरे पाहायला मिळत आहेत, हे लक्षात घेता धारावी पुर्नविकासाची हीच वेळ असल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा.. शिवसेना माजी जिल्हा प्रमुखाची निर्घृण हत्या, खुलेआम गोळी झाडून मारेकरी पसार

धारावीत योग्य-आरोग्य सुविधा नसल्याने धारावीत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठी आहे. युती सरकारच्या काळात धारावी पुर्नविकासाची प्रक्रिया पूर्ण झाली असून जर आपण हा विकास केला तर आपल्या राजकीय विरोधकांना आणि विरोधी पक्षांना मोठा सोशल इम्पॅक्ट होईल. तसेच महाविकास आघाडीला यामुळे मोठा राजकीय फायदा होऊन बांधकाम व्यवसायाला मोठी चालना मिळेल. सध्या मुंबईची जी आर्थिक आघाडी बिघडली आहे. ती आघाडी पुन्हा पूर्वपदावर येऊ शकत, असं पत्रात गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

मुंबईचा कोविड कॅपिटल म्हणून धारावीची ओळख प्रस्थापित होऊ लागली आहे. कोरोनाबाधित रुग्णांची सर्वाधिक संख्या झोपडपट्टीबहुल भागात आहे. धारावीसारख्या झोपडपट्ट्यांमध्ये कोणत्याही दर्जाच्या आरोग्य व्यवस्था नसल्यामुळे येथील उपचार यंत्रणा कोलमडून पडली आहे. परिणामी, सर्वसामान्यांमध्ये धारावीबद्दल नकारात्मक भावना निर्माण झाली आहे. त्यामुळेच आता धारावीच्या पुनर्विकासाएवढी सुंदर सामाजिक, आर्थिक संधी महाविकास आघाडीला मिळणार आहे.

हेही वाचा.. महाराष्ट्र द्रोह! राज्यात अस्थिरता पसरवण्याचा फडणवीसांचा कट, काँग्रेसचा आरोप

धारावीसारख्या सर्व जाती धर्माच्या वस्तीच्या भागाचा विकास केल्यास तो विकास महाविकास आघाडी सरकारसाठी राजकीयदृष्ट्या हितावह ठरणार आहे. याबाबतची संपूर्ण प्रक्रिया झाली असून आपण आपल्या स्तरावर एक बैठक बोलावून धारावी पुनर्विकास प्रकल्प लवकरात लवक सुरु करण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

First published: May 21, 2020, 11:24 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading