मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /अजित पवारांचा एक निर्णय आणि ठाकरे सरकारला घेरण्याच्या प्रयत्नात असलेले विरोधक जागीच थांबले!

अजित पवारांचा एक निर्णय आणि ठाकरे सरकारला घेरण्याच्या प्रयत्नात असलेले विरोधक जागीच थांबले!

State Budget Session : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी अचानकपणे एक निर्णय जाहीर केला आणि सगळं चित्र पालटलं.

State Budget Session : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी अचानकपणे एक निर्णय जाहीर केला आणि सगळं चित्र पालटलं.

State Budget Session : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी अचानकपणे एक निर्णय जाहीर केला आणि सगळं चित्र पालटलं.

मुंबई, 2 मार्च : अधिवेशनाचा (State Budget Session) दुसरा दिवस विरोधी पक्षाच्या आमदारांच्या गदरोळाने सुरू झाला. अगदी विधान भवनाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून ते विधान भवनाच्या पायऱ्या आणि शेवटी दोन्ही सभागृह दणाणून सोडण्यासाठी विरोधी पक्षाने जोरदार तयारी केली होती. हातातले फलक ते कृषी पंप आणि वीज कनेक्शन तोडलेले वीज मीटर घेऊन विरोधी पक्षाचे आमदार तयारीनेच आले होते. आज दिवसभर अधिवेशनात वीजबील दरवाढीवर गदारोळ होणार हे चित्र एव्हाना स्पष्ट झालं होतं. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अचानकपणे एक निर्णय (Ajit Pawar Decision On Electricity Bills) जाहीर केला आणि सगळं चित्र पालटलं.

विधान भवन मुख्य प्रवेशद्वार आणि विधान भवनाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने भाजपच्या आमदारांनी केली. आता दोन्ही सभागृहात वीजबील दरवाढ आणि कट केलेले वीज मीटर कनेक्शन यावरच आक्रमकपणे गोंधळ घालण्यासाठी सर्व भाजप आमदार सभागृहात आले. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील वीज दरवाढ आणि तोडलेले वीज मीटर कनेक्शन यावर सरकारवर हल्ला चढवायला सुरुवात केली. समोर सत्ताधारी बाकांवर बसलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांचं म्हणणं शांतपणे ऐकलं.

हेही वाचा - 'शब्दांचं यमक यशाचं गमक होऊ शकत नाही' फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना टोला

देवेंद्र फडणवीस यांना उर्जामंत्री नितीन राऊत उत्तर देतील असं सर्वांना वाटत होतं. पण थेट उपमुख्यमंत्रीच उत्तर देण्यासाठी उभे राहीले आणि अवघ्या काही सेकंदातच त्यांनी "विधीमंडळात चर्चा होऊन निर्णय होईपर्यंत कृषीपंप व ग्राहकांची वीजजोडणी तोडणार नाही", असा निर्णय जाहीर केला.

विरोधी पक्ष ज्या मुद्द्यावर सरकारला घेरणार होते...ज्यासाठी त्यांनी आठवडाभर आधीपासूनच जोरदार तयारी केली होती... त्या सर्व आरोपांची... आणि विरोधी पक्षांच्या तयारीची हवा अजित पवार यांच्या या निर्णयामुळे निघाली. त्यामुळे दिवसभर गदारोळ घालण्याच्या तयारीत आलेल्या विरोधी पक्षाच्या आमदारांना आता पुढे काय करायचं हा प्रश्न पडला. कारण सरकारला अडचणीत  आणण्यासाठी विरोधी पक्ष ज्या तयारीने आला होता त्याच मुद्द्यावर अजित पवार यांनी ताबोडतोब निर्णय घेतला होता.

त्यामुळे विधान भवनात आज उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या या खेळीची चर्चा चांगलीच रंगली होती. अजित पवार हे आपल्या सडेतोड स्वभावासाठी नेहमीच चर्चेत असतात. आज विरोधकांनाही त्याचा चांगलाच अनुभव आल्याचं त्यांनी आधी निदर्शनासाठी आणलेल्या आणि काही वेळातच परत पाठवायला लागलेल्या फलकांवरून दिसून आलं.

First published:

Tags: Ajit pawar, BJP, NCP, State budget session