Home /News /mumbai /

pune kabaddi player murder case : 'हे कृत्य राक्षसी वृत्तीचे, वेळीच ठेचून काढले पाहिजेत', अजित पवारांची संतप्त प्रतिक्रिया

pune kabaddi player murder case : 'हे कृत्य राक्षसी वृत्तीचे, वेळीच ठेचून काढले पाहिजेत', अजित पवारांची संतप्त प्रतिक्रिया

'हे सामाजिक अध:पतनाचं गंभीर लक्षण असून ही समाजविघातक मानसिकता संपवण्यासाठी गांभीर्यानं विचार करण्याची वेळ आली आहे'

'हे सामाजिक अध:पतनाचं गंभीर लक्षण असून ही समाजविघातक मानसिकता संपवण्यासाठी गांभीर्यानं विचार करण्याची वेळ आली आहे'

'हे सामाजिक अध:पतनाचं गंभीर लक्षण असून ही समाजविघातक मानसिकता संपवण्यासाठी गांभीर्यानं विचार करण्याची वेळ आली आहे'

    मुंबई, 12 ऑक्टोबर : पुण्याच्या बिबवेवाडी (pune bibwewadi ) परिसरात एका अल्पवयीन विद्यार्थीनीची कबड्डी खेळत असताना तिच्यावर कोयत्याने वार करुन हत्या (pune kabaddi player murder case ) करण्यात आल्याच्या घटनेमुळे महाराष्ट्र सुन्न झाला आहे. ही घटना अत्यंत निंदनीय आणि माणुसकीला काळीमा फासणारी आहे. हे सामाजिक अध:पतनाचं गंभीर लक्षण असून ही समाजविघातक मानसिकता संपवण्यासाठी गांभीर्यानं विचार करण्याची वेळ आली आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी दिली. आज संध्याकाळी पुण्यातील बिबेवाडी परिसरात एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीची एकतर्फी प्रेमातून तीन तरुणांनी कोयत्याने गळा चिरून हत्या केल्याची घटना घडली. या घटनेबद्दल अजित पवार यांनी संताप आणि दु:ख व्यक्त केलं. 'ही घटना अत्यंत निंदनीय व माणुसकीला काळीमा फासणारी आहे. पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात अल्पवयीन मुलीची मैदानात खेळताना अशी निर्घृण हत्या होणं हे सामाजिक अध:पतनाचं गंभीर लक्षण असून ही समाजविघातक मानसिकता संपवण्यासाठी गांभीर्यानं विचार करण्याची वेळ आली आहे. शाळेत शिकणाऱ्या, कबड्डीपटू होण्याची स्वप्न पाहणाऱ्या छोट्या मुलीच्या हत्येने सर्वांची मान शरमेनं खाली गेली असून मी तीला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो', असं अजित पवार म्हणाले. आदेश बांदेकरांनंतर आयुष्मानच्या बायकोसाठीही जीवघेणा ठरणारा दुधी कसा ओळखायचा ? तसंच, 'तिच्या मारेकऱ्यांचा शोध घेऊन त्यांना लवकरात लवकर आणि कठोरात कठोर शासन करण्यात येईल. यापुढे कुठल्याही मुलीवर अशी वेळ येऊ न देणं हीच आपल्या दिवंगत मुलीला खरी श्रद्धांजली ठरेल, अशा शब्दांत अजित पवार यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. लग्नानंतर फळफळलं कपलचं नशीब! हनीमूनऐवजी केलं फक्त एक काम आणि 7 कोटींचे मालक बनले पुण्याचे पालकमंत्री तथा राज्य कबड्डी संघटना तसंच महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार, दिवंगत मुलीला श्रद्धांजली वाहताना म्हणाले की, अल्पवयीन मुलीवर इतक्या अमानुषपणे वार करणाऱ्या व्यक्ती माणूस असूच शकत नाही. त्यांचं कृत्य हे राक्षसी असून अशा वृत्ती वेळीच ठेचून काढल्या पाहिजेत. या हत्येमागच्या आरोपींचा शोध घेऊन त्यांना तात्काळ अटक करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत, अशी माहितीही अजित पवारांनी दिली.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या