Home /News /entertainment /

आदेश बांदेकरांनंतर आयुष्मानच्या बायकोसाठीही दुधी ठरला जीवघेणा; कसा ओळखायचा विषारी दुधी भोपळा?

आदेश बांदेकरांनंतर आयुष्मानच्या बायकोसाठीही दुधी ठरला जीवघेणा; कसा ओळखायचा विषारी दुधी भोपळा?

ताहिराप्रमामे दुधीचा रस आदेश बांदेकर यांच्यासाठी तापदायक बनला होता.त्यामुळे दुधी भोपळा जीवघेणा ठरण्याआधीच तो कसा ओळखायचा याविषयी जाणून घेणार आहे.

  मुंबई, 12ऑक्टोबर: अभिनेता आयुष्मान खुरानाची (Ayushyaman Khurana) पत्नी(Wife) ताहिरा कश्यपला(Tahira Kashyap) फूड पॉयझींनीग झाल्यामुळे नुकतंच ICU मध्ये दाखल करण्यात आलं होतं. ताहिराला दुधी भोपळ्यामुळे फूड पॉयझींनिंग झालं होतं. ताहिराने देखील वेळेत उपचार घेतल्याने ती आता ठणठणीत आहे. ताहिराप्रमामे दुधीचा रस (Bottle Gourd Toxicity) महाराष्ट्रातील तमाम वहिन्यांचे ‘भावोजी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मराठमोळा अभिनेता आदेश बांदेकर (adesh bandekar) यांच्यासाठी तापदायक बनला होता. कडू दुधीरस पिऊन आदेश बांदेकर यांची प्रकृती देखील 2015 सालीचिंताजनक बनली होती. मात्र वेळीच उपचार केल्यामुळे ते बचावले. ताहिराने देखील चाहत्यांमध्ये दुधी भोपळ्याबद्दल जागृती करण्यासाठी एक व्हिडिओ शेअर केला आहे. या सर्व प्रकरणानंतर सामान्य नागरिकांच्या मनात देखील अनेक प्रश्न आहेत. त्यामुळे दुधी भोपळा जीवघेणा ( how to identify poisonous bottle gourd )ठरण्याआधीच तो कसा ओळखायचा याविषयी जाणून घेणार आहे. दुधी भोपळ खाण्यायोग्य की आयोग्य कसा ओळखायचा ? दुधी, काकडी, भोपळा अशा Cucurbitaceae प्रकारातील भाज्यांचा आहारात थेट समावेश करण्यापूर्वी त्याचा लहानसा तुकडा चावून बघणे गरजेचे आहे. भाजीचा तुकडा कडवट चवीचा जाणवल्यास त्याचा आहारात समावेश करणं टाळा. वरून भोपळा ओळखणे शक्य नसते त्यावेळी हा उपाय चांगला आहे. तसेच प्रामुख्याने दूधी भोपळ्यासारख्या फळभाज्या नीट शिजवून खाणंच आरोग्याला अधिक फायदेशीर आहेत. यासोबत बाजारात मिळणारा विकतचा रस पिणं टाळा कारण तो कधी बनवला आहे याची माहिती नसते. त्याऐवजी घरच्या घरी ताजा रस बनवून प्यावा. मात्र हे सर्व करण्यापूर्वी चव तपासून पाहायला विसरू नका. विषारी दुधी भोपळ्याची लक्षणे काय आहेत ? विषारी दुधी भोपळ्याचा रस पोटात गेल्यास अवघ्या काही मिनिटात उलटी, डायरीया, खूप प्रमाणात घाम येणे, अस्वस्थ वाटणं अशी लक्षण आढळतात. या लक्षणांनंतर रूग्णाला तात्काळ वैद्यकीय मदत मिळणं गरजेचे आहे. अशाप्रकारच्या विषारी घटकांच्या उतारावर ठोस औषध नसल्याने जगभरात अशाप्रकारे विषारी घटक पोटात जाणं हे काही मिनिटात जीववर बेतण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे रूग्णालयात वेळेत जाणे व डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. वाचा : दुधी भोपळ्याचा रस ठरला घातक; ICU मध्ये पोहोचली अभिनेता आयुष्मान खुरानाची पत्नी
  दुधी भोपळ्याचा रस कधी ठरतो घातक आणि कशामुळे? प्रत्येक दुधी भोपळ्याचा रस हा जीवघेणा नसतो. मात्र दुधी ही फळभाजी Cucurbitaceae प्रकारातील असते. जेव्हा फळभाजीमध्ये cucurbitacin हे विषारी द्रव्य वाढते तेव्हा त्याची चव बदलते. कडवट बीयांमुळेही हे फळ कडू होते. अशाप्रकारची भाजी थेट शरीरात गेल्यास आरोग्याला धोका निर्माण होतो. वाचा :अप्सरेच्या Navratri स्पेशल घागरा चोली लुकवर चाहते फिदा, पाहा VIDEO दुधीप्रमाणेच या वर्गतील इतर फळभांज्याच्या बाबतीत देखील हे घडू शकते. त्यामुळे या फळभाजीपैकी कोणतेही भाजी घेताना त्याची चव घेणे गरजेचे आहे.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Bollywood News, Entertainment, Lifestyle, Marathi entertainment

  पुढील बातम्या