विजय शिवतारेंची 'टिव-टिव' बंदच करून टाकली, अजित पवारांनी सांगितला किस्सा!

विजय शिवतारेंची 'टिव-टिव' बंदच करून टाकली, अजित पवारांनी सांगितला किस्सा!

त्यानंतर अजित पवार यांनी शिवतारे आमदार होतातच कसे हे पाहतो असं म्हटलं होतं. शिवतारे पराभूत झाल्यानंतर अजित पवारांचा तो व्हिडीओ व्हायरल होतोय.

  • Share this:

मुंबई 30 ऑक्टोंबर : भाजपच्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व नवनिर्वाचित आमदारांची आज मुंबईत बैठक झाली. या बैठकीत ज्येष्ठ नेते अजित पवार यांची  पक्षाच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. शरद पवारांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत अजित पवार हे नेते म्हणून निवडले गेले. इतर नेत्यांनी अजित पवारांच्या नावाच्या प्रस्तावास अनुमोदन दिलं. यावेळी अजित पवारांनी आपल्या खास स्टाईलमध्ये भाषण करत निवडणुकीतले किस्से सांगितले. शिवसेनेचे मंत्री विजय शिवतारे यांचा पराभव करणार असं त्यांनी म्हटलं होतं त्याचा किस्साही त्यांनी सांगितला. अजित पवार म्हणाले, विजय शिवतारे जास्तच टिव-टिव करत होते. या निवडणुकीत त्यांचा बंदोबस्तच केला. लोकसभा निवडणुकीच्या वेळी शिवतारे यांनी शरद पवारांसह अनेक नेत्यांवर टीका केली होती.

देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब होत असताना खडसेंची दांडी

त्यानंतर अजित पवार यांनी शिवतारे आमदार होतातच कसे हे पाहतो असं म्हटलं होतं. शिवतारे पराभूत झाल्यानंतर अजित पवारांचा तो व्हिडीओ व्हायरल होतोय. त्या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी हा किस्सा आपल्या भाषणात सांगितला आणि सगळ्या आमदारांनी त्याला दादाही दिली.

पुरंदर मतदारसंघातून दोन वेळा विजयी झालेल्या शिवना जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांचा काँग्रेसच्या संजय जगताप यांनी 31 हजार मतांपेक्षा जास्त मतांनी पराभव केला आहे. त्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिवे ते सासवडपर्यंत जल्लोष पूर्ण मिरवणूक काढली. यावेळी फटाक्यांची आतषबाजी आणि जेसीबीच्या साहाय्याने गुलालाची उधळण करण्यात आली.

पुण्यात 'चंपा'साडी सेंटरचं उद्घाटन

काय म्हणाले होते अजित पवार?

विधानसभा निवडणुकीआधी झालेल्या लोकसभा निवडणुकीत विजय शिवतारे यांनी राष्ट्रवादीवर घणाघाती टीका केली होती. तसंच सुप्रिया सुळे यांना आव्हान दिलं होतं. त्यानंतर अजित पवार यांनी शिवतारेंना थेट आव्हान दिलं.'या निवडणुकीत प्रत्येकजण बारामतीत येवून आमच्यावर टीका करत आहे. आता विजय शिवतारेंनी फक्त आमदारच होवून दाखवावं. अख्या महाराष्ट्राला माहीत आहे की, मी एकदा ठरवलं तर त्या व्यक्तीला पाडतोच,' असं म्हणत अजित पवारांनी शिवसेनेच्या विजय शिवतारेंना एकप्रकारे धमकीच दिली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 30, 2019 07:05 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading