मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /NCB ने केला ड्रग्स तस्करांच्या टोळीचा पर्दाफाश, 13 कोटींचे ड्रग्स जप्त

NCB ने केला ड्रग्स तस्करांच्या टोळीचा पर्दाफाश, 13 कोटींचे ड्रग्स जप्त

 31 डिसेंबरच्या म्हणजे थर्टीफर्स्ट पार्टी आधीच केंद्रीय अमली पदार्थ विरोधी पथकाने 13 कोटी रुपयांचे जगभरात तस्करी केले जाणारे अमली पदार्थ जप्त केले.

31 डिसेंबरच्या म्हणजे थर्टीफर्स्ट पार्टी आधीच केंद्रीय अमली पदार्थ विरोधी पथकाने 13 कोटी रुपयांचे जगभरात तस्करी केले जाणारे अमली पदार्थ जप्त केले.

31 डिसेंबरच्या म्हणजे थर्टीफर्स्ट पार्टी आधीच केंद्रीय अमली पदार्थ विरोधी पथकाने 13 कोटी रुपयांचे जगभरात तस्करी केले जाणारे अमली पदार्थ जप्त केले.

मुंबई, 14 डिसेंबर :  केंद्रीय अंमली विरोधी पथकाने (ncb) मुंबईमध्ये (mumbai) एका मोठा तस्कर टोळीचा पर्दाफाश केला आहे.  एअर कुरीअर सर्व्हिसमध्ये काम करणाऱ्यांची ही अंमली पदार्थ तस्कर टोळी आहे. खोटी ओळख बनवून राजरोसपणे अंमली पदार्थांची तस्कारी सुरू होती. NCB ने केलेल्या कारवाईत तब्बल 13 कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे.

एनसीबीचे मुंबई विभागाचे अधिकारी समीर वानखेडे (sameer wankhde) यांनी पत्रकार परिषद घेऊन केलेल्या कारवाईबद्दल सविस्तर खुलासा केला आहे.  ख्रिस्मस आणि न्यू इयर पार्टीसाठी मुंबईत ड्रग्स तस्कर सक्रीय झाले आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून छापे टाकण्यात आले आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्स जप्त झाले आहे

मागील दोन दिवस चाललेल्या या कारवाईमध्ये ८ ठिकाणी छापे टाकण्यात आले. एकूण ६ गुन्हे दाखल करण्यात आले आहे. आता पर्यंत एका परदेशी पर्यटकाला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याची चौकशी सुरू आहे.  जप्त केलेल्या ड्रग्सची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात १३ कोटी  इतकी आहे, अशी माहितीही समीर वानखेडे यांनी दिली.

Electric Car: EV खरेदी करण्याचा विचार करताय? मग ही बातमी वाचाच

तसंच, खोटी ओळख बनवून खोटा पत्त्यांवर अंमली पदार्थ वापरले गेले आहे. ४.९० ग्रॅम मेटाफेटामाईन जप्त करण्यात आले आहे. हे डॉक्टराच्या स्टेटस्कोमध्ये लपवले होते.  तर 4 किलो अफीम जप्त केले असून हे मायक्रोओव्हनमध्ये लपवून मालदीवला पाठवले जाणार होते.

तर २.५ किलो झोपीडियम १० हजार टॅब्लेट जप्त केले आहे. हे ड्रग्स फराळात लपवून अमेरिकेत पाठवले जाणार होते.  ४.९५ ग्रॅम एमफेटमाईन जप्त केले आहे. हे ड्रग्स सायकल हेल्मेटमध्ये आणि ४.५६ ग्रॅम्स बांगड्यांमध्ये अंमली पदार्थ लपवले होते हे ॲास्ट्रेलियाला जाणार होते. ८.४८ ग्रॅम मेटाफेटामाईन जप्त करण्यात आले आहे. पाईमध्ये लपवून दुबईला पाठवले जाणार होते. हे ड्रग्स डोंगरीमधून जप्त केले आहे.

३.९० ग्रॅम एमफेटाईम जप्त केले आहे. हे ड्रग्स टाईम बॉक्समधून जप्त केले. ही कारवाई सीएसटीएममध्ये करण्यात आली होती. तर १७ ग्रॅम एमफेटामाईन स्वित्झर्लंडमध्ये कॉम्प्युटर हार्ड डिस्कमधून पाठवले जाणार होते, हे अंधेरी येथून जप्त केले आहे.

37 हजार मोफत सर्जरी करणारा माणसातला देवमाणूस! फी आहे फक्त या चिमुरड्यांचं हसू

खरंतर 31 डिसेंबरच्या म्हणजे थर्टीफर्स्ट पार्टी आधीच केंद्रीय अमली पदार्थ विरोधी पथकाने 13 कोटी रुपयांचे जगभरात तस्करी केले जाणारे अमली पदार्थ जप्त केल्याने सगळ्यांच्या भुवया उंचावलेल्या आहेत. आणखीही कारवाया सुरू असून जनता थर्टी फर्स्ट पार्टीत अमली पदार्थ वापरले जाणार नाहीत, त्याची पूर्ण खबरदारी आमच्याकडून घेण्यात आली आहे, थर्टी फर्स्ट पार्ट्या  दरम्यान देखील केंद्रीय अमली पदार्थ विरोधी पथकाचे अधिकारी-कर्मचारी साध्या वेशात मुंबईतील अनेक पार्ट्यांमध्ये सामील होणार आहेत. त्यामुळे जर कोणी थर्टी फस्टच्या पार्ट्यांमध्ये अमली पदार्थांचा वापर करून ते सेवन करणार असतील तर त्यांना केंद्रीय अमली पदार्थ विरोधी पथकांच्या कारवायांना सामोरे जावे लागेल हे या मोठ्या कारवाईवरून केंद्रीय अमली पदार्थ विरोधी पथकाने स्पष्ट केले आहे.

First published: