मराठी बातम्या /बातम्या /देश /37 हजार मोफत सर्जरी करणारा माणसातला देवमाणूस! फी आहे फक्त या चिमुरड्यांची Cute Smile

37 हजार मोफत सर्जरी करणारा माणसातला देवमाणूस! फी आहे फक्त या चिमुरड्यांची Cute Smile

वाराणसीतले डॉक्टर सुबोधकुमार सिंह (Dr Subodhkumar Singh) यांनी एक अनोखा संकल्प केला असून, त्याअंतर्गत त्यांनी 37 हजारांहून अधिक बालकांवर प्लास्टिक सर्जरी (Plastic Surgery) केली आहे आणि तीही एक पैसाही न घेता.

वाराणसीतले डॉक्टर सुबोधकुमार सिंह (Dr Subodhkumar Singh) यांनी एक अनोखा संकल्प केला असून, त्याअंतर्गत त्यांनी 37 हजारांहून अधिक बालकांवर प्लास्टिक सर्जरी (Plastic Surgery) केली आहे आणि तीही एक पैसाही न घेता.

वाराणसीतले डॉक्टर सुबोधकुमार सिंह (Dr Subodhkumar Singh) यांनी एक अनोखा संकल्प केला असून, त्याअंतर्गत त्यांनी 37 हजारांहून अधिक बालकांवर प्लास्टिक सर्जरी (Plastic Surgery) केली आहे आणि तीही एक पैसाही न घेता.

  नवी दिल्ली, 14 डिसेंबर: सध्याच्या काळात जीवनाच्या मूलभूत गरजांमध्ये आरोग्य सुविधांचाही (Health Services) समावेश होतो. आरोग्य सुविधा ही आपली गरज असली, तरी या सुविधा दिवसेंदिवस प्रचंड महाग होत चालल्या आहेत. त्यामुळे ती एक मोठीच समस्या बनली आहे. या पार्श्वभूमीवर वाराणसीतले डॉक्टर सुबोधकुमार सिंह (Dr Subodhkumar Singh) यांनी एक अनोखा संकल्प केला असून, त्याअंतर्गत त्यांनी 37 हजारांहून अधिक बालकांवर प्लास्टिक सर्जरी (Plastic Surgery) केली आहे आणि तीही एक पैसाही न घेता. डॉक्टरांच्या या उपक्रमामुळे या सगळ्या मुलांच्या चेहऱ्यावर हसू खुललं आहे.

  क्लेफ्ट लिप्स (Cleft Lips) आणि क्लेफ्ट पॅलेट (Cleft Pallete) असं नाव असलेल्या दोन विकृती आहेत. या विकृती असलेल्या मुलांचे ओठ आणि तोंडाच्या आतला भाग विकृत झालेला असतो. त्यावर सर्जरी हाच एकमेव पर्याय असतो. त्यासाठी बरेच पैसे खर्च करावे लागतात. गरीब कुटुंबांना आपल्या मुलांसाठी एवढा खर्च करणं शक्य नसतं आणि नेमकं त्याच कुटुंबांतल्या मुलांना या विकृती होण्याचं प्रमाण जास्त असतं.

  हे वाचा-बाळा, रात्री झोपत नाहीस का? चिमुकल्याला पंतप्रधान मोदींनी गोंजारलं, पाहा VIDEO

  ही विकृती असलेल्या मुलांना लहानपणी दूध प्यायला अडचणी येतात. तसंच, मोठं झाल्यावर चेहरा विचित्र दिसत असल्यामुळे त्या मुलांना भेदभावाची वागणूक मिळते. थट्टा केली जाते. त्यातून त्यांचा आत्मसन्मान दुखावतो. ही विकृती जन्मजात असते. त्यावर सर्जरी हाच एकमेव उपाय असतो. म्हणूनच गरीब मुलांसाठी अशा सर्जरीज मोफत करायच्या, असा निर्णय उत्तर प्रदेशातल्या (UP) वाराणसीमधल्या (Varanasi) डॉ. सुबोधकुमार सिंह यांनी घेतला.

  डॉ. सुबोधकुमार यांनी जनरल सर्जरी या विषयात स्पेशलायझेशन केलेलं आहे. आपल्या कौशल्याचा उपयोग गरिबांना होण्यासाठी ते झटत आहेत. ते शिबिरं भरवून अशा गरीब मुलांवर सर्जरी करतात. आतापर्यंत त्यांनी सुमारे 37 हजार मुलांवर सर्जरीज केल्या आहेत. डॉक्टर सुबोध यांचं स्वतःचं बालपण कठीण परिस्थितीत गेलेलं असल्यामुळे त्यांना गरिबीची जाणीव आहे. आई-वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांनी पैसे मिळवण्यासाठी आपल्या भावांसह मेणबत्त्या, साबण, चष्मे वगैरे विकण्याचे उद्योग केले होते. नातेवाईकांची मदत आणि स्वतःची जिद्द यांमुळे त्यांनी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस या संस्थेतून आपलं वैद्यकीय शिक्षणाचं स्वप्न यशस्वीरीत्या पूर्ण केलं.

  हे वाचा-'पाकिस्तानी फूड फेस्टिव्हल' आयोजित करणाऱ्या हॉटेलवर बजरंग दलाचा हल्ला

  डॉ. सुबोध म्हणतात, की अशा विकृतीसह जन्मणारी मुलं कुपोषणामुळे मरण पावण्याचं प्रमाण अधिक असतं. कारण ती पुरेसं दूध पिऊ शकत नाहीत. म्हणूनच त्यांनी 2004मध्ये त्यांनी आपलं वैद्यकीय करिअर अशा मुलांसाठी समर्पित करायचं ठरवलं. मुलांना परत मिळालेलं त्यांचं हसू हीच आपली फी असल्याचं डॉ. सुबोध म्हणतात. आजच्या काळात असे डॉक्टर्स असणं हे मोठं आश्चर्य आणि भाग्य आहे.

  First published:

  Tags: Varanasi