Home /News /mumbai /

Navratri 2021 Guidelines: 'राज्यभरात गरबा-दांडिया नाही, रावण दहन करा पण प्रेक्षक नाही' नवरात्रौत्सवासाठी राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचना

Navratri 2021 Guidelines: 'राज्यभरात गरबा-दांडिया नाही, रावण दहन करा पण प्रेक्षक नाही' नवरात्रौत्सवासाठी राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचना

 Navratri 2021 Guidelines: 'राज्यभरात गरबा-दांडिया नाही, रावण दहन करा पण प्रेक्षक नाही' नवरात्रौत्सवासाठी राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचना (प्रातिनिधिक फोटो)

Navratri 2021 Guidelines: 'राज्यभरात गरबा-दांडिया नाही, रावण दहन करा पण प्रेक्षक नाही' नवरात्रौत्सवासाठी राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचना (प्रातिनिधिक फोटो)

Maharashtra navratri guidelines: नवरात्रौत्सवासाठी राज्य सरकारकडून मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत.

    मुंबई, 5 ऑक्टोबर : सार्वजनिक नवरात्रौत्सव 2021 (Navratri 2021) बाबत राज्य सरकारच्या गृह विभागाकडून मार्गदर्शक सूचना जाहीर कऱण्यात आल्या आहेत. यंदा 7 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर 2021 या काळात नवरात्रौत्सव साजरा करण्यात येणार आहे. कोरोनाची (Coronavirus) दुसरी लाट ओसरली असतली तरी अजूनही कोरोनाचा धोका कायम आहे. त्यामुळे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन गर्दी करुन उत्सव साजरा करणे उचित होणर नाही. नवरात्रौत्सव साजरा करताना सर्व नागरिकांनी आरोग्यच्या दृष्टीकोनातून योग्य ती घरबदारी घेणे अत्यावश्यक असल्याचंही मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटलं आहे. (Maharashtra Government guidelines for Navratri 2021) अशा आहेत मार्गदर्शक सूचना सार्वजनिक नवरात्रौत्सवासाठी मंडळांनी महानगरपालिका / स्थानिक प्रशासन यांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील. कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता आणि महानगरपालिका तसेच संबंधित स्थानिक प्रशासनाचे मंडपांबाबतचे धोरण यांचेशी सुसंगत असे मर्यादित स्वरुपाचे मंडप उभारण्यात यावेत. यावर्षीचा नवरात्रौत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याच्या अनुषंगाने घरगुती तसेच सार्वजनिक देवीच्या मूर्तीची सजावट त्या अनुषंगाने करण्यात यावी. देवीच्या मूर्तीची उंची सार्वजनिक मंडळांकरिता 4 फूट आणि घरगुती देवीच्या मूर्तीची उंची 2 फुटांच्या मर्यादेत असावी. मागीलवर्षीप्रमाणे शक्यतो देवीच्या मूर्तीऐवजी घरातील धातू / संगमरवर आदी मूर्तीचे पूजन करावे. मूर्ती शाडूची / पर्यावरणपूरक असल्यास तिचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे. विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास कृत्रिम विसर्जन करण्याच्या संदर्भात स्थानिक प्रशासनाशी समन्वय ठेवावा. Navratri 2021: यावर्षी आठ दिवस साजरा होणार नवरात्रौत्सव, तज्ज्ञांनी सांगितलं कारण नवरात्रौत्सवासाठी वर्गणी, देणगी स्वेच्छेने दिल्यास त्यांचा स्वीकार करावा, जाहिरातीच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही असे पहावे. तसेच आरोग्य विषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंती देण्यात यावी. यासोबतच माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमेबाबत देखील जनजागृती करण्यात यावी. गरबा, दांडिया आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करु नयेत. त्याऐवजी आरोग्य विषयक उपक्रमे, शिबिर (रक्तदान) आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे. याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इत्यादी आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी. देवीच्या दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट आणि फेसबूक इत्यादीद्वारे उपलब्ध करुन देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करण्यात यावी. आरती, भजन, किर्तन तसेच इतर धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही. तसेच ध्वनी प्रदुषणासंदर्भातील नियमांचे, तरतूदींचे पालन करण्यात यावे. मंडपात एकावेळी 5 पेक्षा जास्त कार्यकर्त्यांची उपस्थिती नसावी. तसेच मंडपांमध्ये खाद्यपदार्थ अथवा पेयपानाची व्यवस्था करण्यास सक्त मनाई. Big News : यंदा गरब्याचा आनंद घेता येईल का? BMC कडून नवरात्रौत्सवाची नियमावली जारी देवीच्या आगमन आणि विसर्जन मिरवणुका काढण्यात येऊ नये. विसर्जनाच्या पारंपारिक पद्धतीने विसर्जनस्थळी होणारी आरती घरीच करुन विसर्जनस्थळी कमीत कमी वेळ थांबावे. लहान मुले आणि वरिष्ठ नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जनस्थळी जाणे टालावे. संपूर्ण चाळीतील / इमारतीतील सर्व घरगुती देवीच्या मूर्तींच्या विसर्जनाची मिरवणूक एकत्रितरित्या काढण्यात येऊ नये. महापालिका, विविध मंडळे, गृहनिर्माण संस्था, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था इत्यादींच्या मदतीने कृत्रीम तलावांची निर्मिती करण्यात यावी. तसेच नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी स्थानिक प्रशासनाने प्रभाग समितीनिहाय मूर्ती स्वीकृती केंद्रांची व्यवस्था करावी. याबाबत जास्तीत जास्त प्रसिद्धी देण्यात यावी. दसऱ्याच्या दिवशी करण्यात येणारा रावण दहनाचा कार्यक्रम हा सर्व नियम पाळून करावा. रावण दहनाकरिता आवश्यक तेवढ्या किमान व्यक्तीच कार्यक्रमस्थळी हजर राहतील. प्रेक्षक बोलावू नयेत. त्यांना फेसबूक इत्यादी समाजमाध्यमातून थेट प्रक्षेपणाद्वारे बघण्याची व्यवस्था करावी.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Maharashtra, Navratri

    पुढील बातम्या