मुंबई, 30 सप्टेंबर : मुंबई महानगरपालिकेने (BMC) नवरात्रौत्सवासंदर्भातील नियमावली जाहीर (BMC announces rules regarding Navratri festival) केली असून कोरोनाच्या परिस्थितीत (CoronaVirus) या नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे. मुंबईत गणेशोत्सवाबरोबरच नवरात्रौत्सवही मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. गेल्या दोन वर्षांपासून राज्यावर कोरोनाचं सावट असल्याने सर्व सण-उत्सव अगदी साध्या पद्धतीत साजरे केले जात आहे.
यंदाही राज्यात तिसऱ्या लाटेची भीती असल्यामुळे गणेशोत्सव देखील साध्या पद्धतीने साजरा करण्याचं आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आलं होतं.
बृहन्मुंबई महानगरपालिकेने जारी केली नियमावली
-सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळाने पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे. यासाठी ऑनलाइन परवानगी यंत्रणा तयार करण्यात आली असून ती 23 सप्टेंबरपासून कार्यन्वित करण्यात आली आहे.
-देवीचे मंडप फार मोठे नसावेत. मर्यादित आकारमानानेच मंडळ उभारले जावेत. सजावटीतही भपकेबाज पणे नसावा.
-देवीची मूर्ती सार्वजनिक मंडळाकरिता 4 फूट आणि घरगुती मूर्तीकरिता 2फूटांपेक्षा जास्त उंचीची नसावी.
-नवरात्रौत्सवात गरब्याचे आयोजन केले जाऊ नये. तसेच आरती, भजन, कीर्तन, अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी.
भारतात जास्तीत जास्त लोकांना कोरोना लस देण्यासाठी धडपड सुरू आहेत. आपल्या राज्यात जास्त लोकांना कोरोना लस मिळावी यासाठी राज्य सरकारही प्रयत्न करत आहे. देशातील सर्वात जास्त लसीकरण झालं आहे ते उत्तर प्रदेशात. सरकारच्या आकडेवारीनुसार यूपीमध्ये सर्वाधिक 10,39,43,392 कोरोना लशीचे डोस देण्यात आले आहेत. त्यापाठोपाठ महाराष्ट्रात 7,93,79,380 कोरोना डोस देण्यात आले आहेत. एकूण लसीकरणात उत्तर प्रदेश देशात पहिल्या क्रमांकावर असला तरी महाराष्ट्राच्या पिछाडीवरच आहे. कोरोना लशीचे दोन्ही डोस देण्यात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. उत्तर प्रदेशात 8,42,71,713 नागरिकांनी कोरोना लशीचा पहिला डोस घेतला आहे. तर फक्त 1,96,71,679 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. महाराष्ट्रात 5,61,69,564 नागरिकांनी पहिला तर 2,32,09,816 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mumbai, Ranga nava