जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Navratri 2021: यावर्षी आठ दिवस साजरा होणार नवरात्रौत्सव, तज्ज्ञांनी सांगितलं कारण

Navratri 2021: यावर्षी आठ दिवस साजरा होणार नवरात्रौत्सव, तज्ज्ञांनी सांगितलं कारण

Navratri 2021: यावर्षी आठ दिवस साजरा होणार नवरात्रौत्सव, तज्ज्ञांनी सांगितलं कारण

यंदा शारदीय नवरात्रौत्सव नऊ ऐवजी 8 दिवसांचा (this year will be 8 days of Autumn Navratra) आहे.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    नवी दिल्ली, 1 ऑक्टोबर : गणेशोत्सव संपताच सर्वांनाच नवरात्रौत्सवाचे (Shardiya Navratri) वेध लागतात. यंदा शारदीय नवरात्रौत्सव नऊ ऐवजी 8 दिवसांचा (this year will be 8 days of Autumn Navratri) आहे. तृतीया आणि चतुर्थी या दोन्ही तिथी एकत्र आल्याने नवरात्रौत्सव 8 दिवसांचा असेल. आश्विन शुद्ध प्रतिपदा यंदा 7 ऑक्टोबर रोजी आहे. या दिवशी शारदीय नवरात्रौत्सवाची सुरुवात (Festival start) होते. यंदा विजयादशमी म्हणजेच दसरा (Dussehra) 15 ऑक्टोबर या दिवशी आहे. ज्योतिषी डॉ. श्रीराम द्विवेदी (Shriram Dwivedi) यांनी सांगितलं, की ‘या वर्षी गुरुवारी (7 ऑक्टोबर) शारदीय नवरात्रौत्सवाला सुरुवात होत आहे. नवरात्रीमधील सर्व नऊ दिवस शुभ समजले जातात. या वर्षी दुर्गा माता ही पालखीमध्ये स्वार होऊन येत आहे.’ यंदा नवरात्रौत्सव 8 दिवस चालणार आहे. तृतीया आणि चतुर्थी या तिथी एकत्र येत आहेत. हिंदू पंचांगानुसार, तृतीया शनिवार, 9 ऑक्टोबर रोजी सकाळी 7:48 पर्यंत राहील. यानंतर चतुर्थी तिथीला सुरुवात होईल. ही तिथी 10 ऑक्टोबरला पहाटे 5 पर्यंत राहील. चित्रा नक्षत्रात शारदीय नवरात्र सुरू होत आहे.

    Navratri 2021: नवरात्रोत्सवाच्या दिवसांत घ्या ‘या’ गोष्टींची काळजी; वाचा….

    शारदीय नवरात्रीच्या तारखा (Shardiya Navratri Date) - पहिला दिवस, 7 ऑक्टोबर : माता शैलपुत्रीची पूजा दुसरा दिवस, 8 ऑक्टोबर : ब्रह्मचारिणी आईची पूजा तिसरा दिवस, 9 ऑक्टोबर : माता चंद्रघंटा आणि माता कूष्मांडाची पूजा चौथा दिवस, 10 ऑक्टोबर : माता स्कंदमातेची पूजा पाचवा दिवस, 11 ऑक्टोबर : माता कात्यायनीची पूजा सहावा दिवस, 12 ऑक्टोबर : माता कालरात्रीची पूजा सातवा दिवस, 13 ऑक्टोबर : माता महागौरीची पूजा आठवा दिवस, 14 ऑक्टोबर : माता सिद्धिदात्रीची पूजा 15 ऑक्टोबर : विजयादशमी (दसरा)

    तुम्हाला माहीत आहे नवरात्र उत्सव 9 दिवसच का असतो? जाणून घ्या नवरात्राविषयी सर्व

    घटस्थापनेसाठी शुभमुहूर्त - 6 ऑक्टोबर रोजी सर्वपित्री अमावस्येला श्राद्ध संपणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 7 ऑक्टोबर, गुरुवारपासून नवरात्री सुरू होईल. पहिल्या दिवशी 7 ऑक्टोबर रोजी घटस्थापनेची शुभ वेळ सकाळी 6.17 ते सकाळी 7.07 वाजेपर्यंत असणार आहे. पंचांगानुसार यंदा चतुर्थीला क्षय आहे. तृतीया 9 ऑक्टोबर रोजी सकाळी 7.48 पर्यंत, तर 10 ऑक्टोबरला पहाटे 5 वाजेपर्यंत चतुर्थी असणार आहे. सूर्योदयाच्या वेळी चतुर्थी नसल्याने ही तिथी क्षयाची समजली जाणार आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात