Home /News /mumbai /

शिवसेना भडकली, नवनीत राणांच्या उपचारावर शिवसेनेचा आक्षेप; थेट गाठलं लीलावती रुग्णालय

शिवसेना भडकली, नवनीत राणांच्या उपचारावर शिवसेनेचा आक्षेप; थेट गाठलं लीलावती रुग्णालय

नवनीत राणा यांचा लीलावती रुग्णालयातील एमआरआय करतानाचा फोटो व्हायरल झाला होता. यावरुन शिवसेनेनं आक्षेप घेतला आहे.

    मुंबई, 09 मे: काल अमरावतीच्या (Amravati) खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांना लीलावती रुग्णालयातून (Lilavati Hospital) डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी नवनीत राणा यांचा लीलावती रुग्णालयातील एमआरआय करतानाचा फोटो व्हायरल झाला होता. यावरुन शिवसेनेनं आक्षेप घेतला आहे. MRIचे यंत्र अत्यंत संवेदनशील असल्यानं त्या खोलीमध्ये कुणालाही कॅमेरे किंवा मोबाईलचा वापर करता येत नाही. असं असतानाही राणांच्या उपचारांची शुटिंग कशी काय झाली, असा सवाल शिवसेनेनं लिलावती रुग्णालय प्रशासनाला केला आहे. शिवसेनेनं व्हायरल झालेल्या फोटोंवरून आक्षेप घेतला आहे. नवनीत राणांच्या उपचारांबाबत जाब विचारण्यासाठी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar), शिवसेनेच्या आमदार मनीषा कायंदे (Manisha Kayande) , शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते लीलावती रुग्णालयात गेले. नवनीत राणांचा रिपोर्ट मिळाल्याशिवाय इथून हलणार नाही, असा आक्रमक पवित्रा शिवसेनेकडून घेण्यात आला. नवनीत राणा यांना सातत्याने जोरदार प्रत्युत्तर देणाऱ्या किशोरी पेडणेकर यांनी लिलावतींमधील राणांच्या व्हायरल फोटोवरून रुग्णालय प्रशासनाला चांगलंच धारेवर धरलं. मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर गॅस टँकर पलटून भीषण अपघात, तीन जण जागीच ठार नवनीत राणांविरोधात शिवसेना आक्रमक झाली आहे. शिवसेनेने रुग्णालय प्रशासनास धारेवर धरलं आहे. त्यांच्या उपचारांविषयी रुग्णालय प्रशासनाला प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत. नवनीत राणा यांचा एमआरआय करतानाचा फोटो यावेळी मनीषा कायंदे यांनी लिलावती रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांना दाखवला. एमआरआय रुममध्ये कॅमेऱ्याला परवानगी नसताना त्यादिवशी रुमपर्यंत कॅमेरा गेलाच कसा, असा सवाल पेडणेकर आणि कायंदे यांनी लिलावतीच्या अधिकाऱ्यांना केला आहे. तो फोटो कुणी काढला, याबाबतही खुलासा करावा, असंही म्हटलं आहे. स्पॉंडिलायटीस असताना नवनीत यांनी उशी कशी वापरली? नवनीत राणा यांनी स्पाँडिलायटीस असल्याचं सांगितलं होतं. हा त्रास असताना रुग्ण उशी वापरू शकत नाही. मात्र, राणांच्या व्हायरल फोटोमध्ये त्या उशी वापरताना दिसत आहेत. राणांना स्पाँडिलायटीस होती तर त्यांना उशी वापरायला कशी दिली, असा सवाल पेडणेकर यांनी उपस्थित केला. किशोरी पेडणेकर यांची टीका स्पाँडिलायटीस असताना उशी वापरणे, एमआरआय रुममध्ये कॅमेऱ्याचा यंत्रांना आणि रुग्णांना धोका असतानाही त्यांचा वापर करणं, या सर्व गोष्टींवरून नवनीत राणा यांनी उपचाराचे नाटक केलं. असंच दिसतंय, अशी टीका ही किशोरी पेडणेकर यांनी केली आहे.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Kishori pedanekar, Navneet Rana, Ravi rana, Shivsena

    पुढील बातम्या