नरेंद्र मोदींनीच ठेवला होता युतीचा प्रस्ताव, शरद पवारांनी केला सर्वात मोठा खुलासा

नरेंद्र मोदींनीच ठेवला होता युतीचा प्रस्ताव, शरद पवारांनी केला सर्वात मोठा खुलासा

'राष्ट्रीय प्रश्नांवर विरोधाला विरोध करणार नाही, मात्र एकत्र येणं शक्य नाही असं मी मोदींना नम्रपणे सांगितलं.'

  • Share this:

मुंबई 02 डिसेंबर : महाराष्ट्राच्या राजकारणात कधी स्वप्नातही घडेल असं वाटलं नव्हतं ते झालं. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आले आणि महाराष्ट्रात नवं सरकार आलं. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले. हे सगळं घडविण्याचे शिल्पकार होते शरद पवार. त्यांनी गेल्या महिनाभरात घडलेल्या घटनांचा पहिल्यांदाच खुलासा केलाय. यात सगळ्यात जास्त चर्चा झाली ती शरद पवार आणि पंतप्रधान मोदींच्या भेटीची. या भेटीत नेमकं काय झालं? पंतप्रधान काय म्हणाले? हा पवारांचाच डाव होता का? या सगळ्या प्रश्नांची उत्तर शरद पवारांनी दिलीय. शरद पवार म्हणाले, पंतप्रधानांना भेटण्याची वेळ मी आधीच मागितली होती. मात्र ते जमू शकलं नाही. शेवटी पंतप्रधान कार्यालयाने वेळ दिली. संभ्रम निर्माण व्हावा अशी पंतप्रधान कार्यालयाची इच्छा असावी. मात्र मला त्याची काळजी नव्हती. मी विदर्भातल्या दुष्काळी दौऱ्यावरून आलो होतो. मलाही त्यांना भेटायचं होतं त्यामुळे मी भेटलो.

आमच्या भेटीत शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी बोलणं झालं आणि शेवटी जाताना पंतप्रधान मोदींनीच हा विषय काढला. ते म्हणाले राज्यात तुम्ही आणि आम्ही एकत्र काम केलं तर चांगलं होईल. म्हणजे भाजप आणि राष्ट्रवादीने एकत्र यावं असं पंतप्रधानांना वाटत होतं. त्यांनीच तसा प्रस्ताव मांडल्यावर मी त्यांना स्वच्छ आणि स्पष्टपणे नाही असं सांगितलं. एबीपीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा खुलासा केला.

पंकजा मुंडे शिवसेनेच्या वाटेवर? भाजपने पत्रकार परिषदेत केली भूमिका स्पष्ट

राष्ट्रीय प्रश्नांवर विरोधाला विरोध करणार नाही, मात्र एकत्र येणं शक्य नाही असं मी मोदींना नम्रपणे सांगितलं. भाजपसोबत जाण्याला राष्ट्रवादीचं केडरही तयार नाही. आमची विचारसरणीही वेगळी आहे. त्यामुळे एकत्र येणं शक्य नाही हे मी मोदींना स्पष्टपणे सांगितलं.

 पवारांनी असं वळवलं सोनियांचं मत

आपणच कायम दुय्यम भूमिका घ्यायची का? असा प्रश्न शिवसेनेच्या काही नेत्यांना पडला होता. शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा असं त्या पक्षातल्या नेत्यांना वाटत होतं. त्यामुळे पुढे घटना घडत गेल्या. एबीपीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे गुपीत उघड केलं.

PM मोदी आणि अमित शहा दोन दिवस पुणे मुक्कामी, ठाकरे CM झाल्यानंतरचा पहिलाच दौरा

शिवसेनेने एकत्र येण्यासंबंधी विश्वास दिल्यानंतर मी थेट सोनिया गांधींना जाऊन भेटलो आणि त्यांना विश्वास दिला. माझ्या प्रचारामुळे काँग्रेसच्या काही नेत्यांनाही फायदा झाला. ते नेते माझ्या संपर्कात होते. त्यांना माझ्याबद्दल आस्था होती. त्यामुळे भाजपविरोधात ते एकत्र येण्यास तयार होते.

काँग्रेसचे नवे आमदार हे भाजप विरोधात एकत्र येण्यास तयार होते.  देशात नवा पॅटर्न राबवू शकतो असं त्यांना वाटत होतं. त्यांची तयारी असल्यामुळे आम्ही पुढे गेलो. त्यामुळे प्रश्न होता तो काँग्रेसच्या दिल्लीतल्या नेतृत्वाचा. सोनिया गांधी यांच्याशी मीच बोलावं असं काँग्रेसच्या नेत्यांनाही वाटत होतं.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले अन् तीन वर्षानंतर शिवसैनिकाने केली दाढी

काँग्रेस हा कायम कट्टर विचाराविंरुद्ध लढत  असतो. त्यामुळे शिवसेनेसोबत कसं जायचं असा त्यांना प्रश्न होता. आणीबाणीलाही शिवसेनेने समर्थन दिलं होतं. बाळासाहेब ठाकरेंनी त्या काळात इंदिरा गांधींना समर्थन दिलं होतं. त्यानंतर महाराष्ट्रात जी निवडणूक झाली त्या निवडणुकीत बाळासाहेबांनी उमेदवारच उभे केले नाही ही मोठी गोष्ट होती. प्रतिभाताई पाटील या राष्ट्रपतीपदासाठी उमेदवार असतानाही शिवसेनेनं पाठिंबा दिला होता.  हे सगळं मी सनिया गांधींना सांगितलं होतं. त्यामुळे शेवटी त्या तयार झाल्या असं पवारांनी सांगितलं.

Published by: Ajay Kautikwar
First published: December 2, 2019, 7:59 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading