जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / नारायण राणेंनी अमित शहांना लिहिलं पत्र, 'राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा'

नारायण राणेंनी अमित शहांना लिहिलं पत्र, 'राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा'

नारायण राणेंनी अमित शहांना लिहिलं पत्र, 'राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा'

‘सचिन वाझेंची चौकशी मनसुख हिरेन केस बाबतच नाही तर याआधीच्या त्यांनी हाताळलेल्या केस बाबतही पुन्हा चौकशी व्हावी’

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 14 मार्च : मुंबई स्फोटकांनी सापडलेल्या कार प्रकरणी पोलीस अधिकारी (Mumbai Police) सचिन वाझे (Sachin Vaze Arrest) यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणावरून भाजपने (BJP) आक्रमक भूमिका घेत महाविकास आघाडी सरकारला (MVA Goverment) कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.  तर दुसरीकडे, राज्यात राष्ट्रपती राजवट ( Presidential rule) लागू करा, अशी मागणी भाजपचे नेते नारायण राणे (Narayann Rane) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्याकडे केली आहे. नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केली आहे. ‘अमित शहा यांना मी पत्रपाठवून मी राज्यातील कायदा-सुव्यवस्थेबाबत माहिती दिली. ठाकरे सरकार राज्यातील परिस्थितीत हाताळण्यास अपयशी ठरत असल्याचं निदर्शनास आणून दिले असून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्यासंदर्भात मी मागणी केली आहे, ३ दिवसांपूर्वी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याबाबत मी अमित शहांना पत्र लिहिले आहे’, असंही नारायण राणेंनी सांगितले. 10 वर्षाच्या मुलीने गळफास लावून केली आत्महत्या; कारण ऐकून बसेल धक्का ‘दिशा सालियन, सुशांत सिंह राजपूत या केसेस सचिन वाझेंनी हाताळल्या. सचिन वाझेंना या केसेसवर कुणाला तरी वाचवण्यासाठी पाठवण्यात आलं होतं. आता सचिन वाझेंना अटक केली आहे. सचिन वाझेंची चौकशी मनसुख हिरेन केस बाबतच नाही तर याआधीच्या त्यांनी हाताळलेल्या केस बाबतही पुन्हा चौकशी व्हावी, अशी मागणी राणेंनी केली. गँगस्टर रवी पुजारी आणि सचिन वाझे यांचा काय संबंध मला माहित नाही. पण, पुजारीनं स्वत:हून मला स्टेटमेंट द्यायचंय असं म्हटलं आहे. त्यामुळे जेल मधल्या रवी पुजारींच्या स्टेटमेंटवरुन चौकशी झाली आहे. अजून कुणाच्या हत्या झाल्या आहेत  का? याची चौकशी व्हावी, असंही राणे म्हणाले. ममता दीदींचं व्हील चेअरवर शक्तीप्रदर्शन; ‘त्या’ घटनेबाबत निवडणूक आयोग म्हणालं… ‘शिवसेनेचा आसरा सचिन वाझेंना आहे. सचिन वाझेंच्या जीवावरच तर शिवसेनेवेकडून धमक्या दिल्या जातात. वाझेंची ज्याअर्थी मुंबईत पोस्टिंग होत होती. ते बघता वाझेंचे पोलीस खात्यातील गॉडफादरही आता बाहेर येत आहे’, अशी टीकाही राणेंनी शिवसेनेवर केली. ‘सध्या मातोश्रीची बाजू घ्यायलाच बघतात काहीतरी मिळेल, पदरात पडेल. म्हणून संजय राऊत यांना गांभिर्याने घेण्याची गरज नाही. राष्ट्रवादी, काँग्रेसचीही वाझे प्रकरणात नैतीक जबाबदारी आहे’, अशी टीकाही राणेंनी केली. मिताली राजने इतिहास घडवला, हा विश्वविक्रम करणारी पहिलीच क्रिकेटपटू ‘कसला आला आहे सामना. रमेश किणी प्रकरण आणि मनसुख हिरेन प्रकरण काय संबंध आहे. काहीही उकरुन काढतात. तो काय पेपर आहे. थापा मारणारा पेपर आहे’, असा टोलाही राणेंनी सामनाच्या अग्रलेखवरून शिवसेनेला लगावला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात