जाहिरात
मराठी बातम्या / देश / ममता दीदींचं व्हील चेअरवर शक्तीप्रदर्शन; 'त्या' घटनेबाबत निवडणूक आयोगाने दिला महत्त्वपूर्ण निर्णय

ममता दीदींचं व्हील चेअरवर शक्तीप्रदर्शन; 'त्या' घटनेबाबत निवडणूक आयोगाने दिला महत्त्वपूर्ण निर्णय

ममता दीदींचं व्हील चेअरवर शक्तीप्रदर्शन; 'त्या' घटनेबाबत निवडणूक आयोगाने दिला महत्त्वपूर्ण निर्णय

West Bengal Election: : मुख्यमंत्री म्हणाल्या की, आम्ही निर्भीडपणे लढत राहू, मला अजूनही खूप वेदना होत आहेत, मात्र मला आपल्या जनतेचं दु:ख, वेदना अधिक जाणवतात.

  • -MIN READ
  • Last Updated :

कोलकाता, 14 मार्च : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर नंदीग्राममध्ये निवडणूक प्रचारादरम्यान हल्ला झाल्याचं वृत्त समोर आले होतं. यानंतर दीदींना तातडीने रुग्णालयातही दाखल करण्यात आलं होतं. या हल्ल्यामागे ममता दीदींनी भाजप असल्याचा आरोपही केला होता. दरम्यान आज ममता बॅनर्जी यांच्यावर नंदीग्राम येथे झालेल्या हल्ल्याचे कोणतेही पुरावे (No Evidence Of Attack On Mamata Banerjee) मिळाले नाहीत. (Didi joins the road show in a wheelchair) निवडणूक आयोगाने विविध रिपोर्टच्या आधारावर याबद्दल विधान केलं आहे. निवडणूक आयोगाने (Election Commission) ममता बॅनर्जी यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पुरावे नसल्याचा निर्णय बंगालचे मुख्य सचिव आणि दोन विशेष निवडणूक निरीक्षकांकडून जाहीर केलेल्या रिपोर्टच्या आधारावर सांगण्यात आलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विशेष निरीक्षकांनी आपल्या रिपोर्टमध्ये दिल्यानुसार, दीदींवर हल्ल्यामुळे जखमी झालेल्या नाहीत. रिपोर्टनंतर निवडणूक आयोगाने सांगितलं की, दीदींवर नंदीग्राममध्ये कोणताही हल्ला झाला नाही. (No Attack On Mamata In Nandigram) त्यांना अपघातातून जखम झाली आहे. निवडणूक आयोगाने विशेष निरीक्षक अजय नायक यांचा रिपोर्ट पाहून हा निर्णय घेतला. शनिवारी हा रिपोर्ट निवडणूक आयोगाकडे सोपवण्यात आला होता. मात्र या रिपोर्टमध्ये ममता बॅनर्जी यांना झालेली जखम कशामुळे झाली याचा उल्लेख नसल्याने निवडणूक आयोग समाधानकारी नव्हते.

जाहिरात

दरम्यान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banearjee) म्हणाल्या की, त्यांची लढाई जारी राहिल. ममता बॅनर्जी जखमी झाल्यानंतर पहिल्यांदा सार्वजनिक स्वरुपात कार्यक्रमात सामील झाल्या. त्या मेयो रोड येथील गांधी मूर्ती ते हाजरा रोड शोमध्ये सामील झाल्या. यापूर्वी ट्वीट करीत मुख्यमंत्री म्हणाल्या की, आम्ही निर्भीडपणे लढत राहू, मला अजूनही खूप वेदना होत आहेत, मात्र मला आपल्या जनतेचं दु:ख, वेदना अधिक जाणवतात. आपल्या भूमीचं रक्षण करण्यासाठी या लढाईत आम्हाला खूप नुकसान झालं. मात्र आम्ही माघार घेणाऱ्यातला नाही. हे ही वाचा- ‘कंदहार विमान अपहरण प्रकरणात ममता बॅनर्जी बंधक होण्यास तयार होत्या’ आपल्या रिपोर्टमध्ये राज्याचे मुख्य सचिव अलपन बंडोपाध्याय यांनी निवडणूक आयोगाला सांगितलं की, नंदीग्राममध्ये त्या दिवशी खूप जास्त गर्दी होती. त्यामुळे घटनेचा व्हिडिओ स्पष्ट दिसत नाही. निवडणूक आयोगाने आज सांगितलं की, ममता बॅनर्जी यांच्यावर कोणत्याही षडयंत्रांअंतर्गत हल्ला करण्यात आला नाही, तो एक अपघात होता.  

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात