• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • उद्धव ठाकरेंना आरक्षण द्यायचेच नव्हते, मराठ्यांनी सरकार चालवणं कठीण होईल असं आंदोलन करावं, राणेंचा घणाघात

उद्धव ठाकरेंना आरक्षण द्यायचेच नव्हते, मराठ्यांनी सरकार चालवणं कठीण होईल असं आंदोलन करावं, राणेंचा घणाघात

Narayan Rane press conference पंतप्रधानांनी 7 वर्षांत जगभरात नाव कमावलं. पण यांनी साधा फोन केला नाही. पण लस मिळाली नाही की फोन करतात अशी टीका राणेंनी केली.

  • Share this:
मुंबई, 31 मे : राज्यात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या काळात मराठा आरक्षण (Maratha Reservation) मिळालं ते मान्यही झालं आणि टिकलंही. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना मराठा समाजाला आरक्षण द्यायचंच नव्हतं. त्यामुळं योग्य पद्धतीनं बाजू मांडली नाही, असा आरोप खासदार नारायण राणे (Narayan Rane ) केला आहे. तसंच मराठ्यांनी आता राज्य सरकारला कारभार करता येणार नाही, असं तीव्र आंदोलन करावं असं आपलं मत असल्याचंही नारायण राणे म्हणाले. (वाचा-Corona Vaccination आता रोज होणार 1 कोटी नागरिकांचं लसीकरण! सरकार करत आहे नियोजन) मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये नारायण राणे यांनी मराठा आरक्षणासह विविध मुद्द्यांवरून शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर हल्ला चढवला. सर्वोच्च न्यायालयानं मागितलेलं स्पष्टीकरण का दिलं नाही? सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण सिद्ध होईल यासाठी काळजडी का घेतली नाही? प्रख्यात वकील का उभे केले नाही? असे सवाल नारायण राणे यांनी केले. या मुख्यमंत्र्यांना मराठा समाजाला आरक्षण द्यायचंच नव्हतं असा आरोप त्यांनी केला. लवकर मराठा आरक्षण दिलं नाही तर उपस्थित होणाऱ्या स्थितीला सरकार जबाबदार असेल. राज्यात सरकारला सरकार चालवणं कठीण व्हावं अस आंदोलन मराठ्यांनी करावं अशा मताचा मी आहे, असंही राणे म्हणाले. (वाचा-Weather Update: जाणून घ्या पुढच्या 4 तासांत कोणकोणत्या जिल्ह्यात कोसळणार सरी) उठ सूट सगळं मोदींनी करा म्हणतात. मग तुम्ही काय करता असा सवाल राणेंनी केला. मुख्यमंत्री मराठा आरक्षण देण्याच्या बाजूनं नव्हतेच. सगळे मुद्दे विरोधी पक्ष नेते नेऊन देत होते. हे फक्त सकाळी उठतात आणि हात धुवा सांगून त्यांच्या पिंजऱ्यात म्हणजे मातोश्रीत जाऊन बसतात अशी टीकाही राणेंनी केली. सारखे लॉकडाऊन लावतात. सगळं बंद आणि फक्त मातोश्री चालू अशी स्थिती आहे. महाराष्ट्रात 94 हजार लोक कोरोनानं मेले. देशात 3 लाखांत महाराष्ट्रातील सर्वात जास्त आहेत. पण यांना फरक पडत नाही, अशा आरोप त्यांनी केला. राज्यात अनेक विषय आहेत पण मुख्यमंत्री बोलताच नाही. अभ्यास नसल्यानं सरकार कसं चालतं हेच यांना माहिती नाही. सूडबुद्धीनं लोकांना डावलतात असे आरोप राणेंनी केले. सरकार मला कायम अस्थिर वाटते. रात्री आपण झोपलो तर सरकार असेल आणि सकाळी उठल्यावर नसेल, या चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याचा राणेंनीही पुनरुच्चार केला. पंतप्रधानांनी 7 वर्षांत जगभरात नाव कमावलं. पण यांनी साधा फोन केला नाही. पण लस मिळाली नाही की फोन करतात अशी टीका राणेंनी केली.
Published by:sachin Salve
First published: