जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / Corona Vaccination आता रोज होणार 1 कोटी नागरिकांचं लसीकरण! सरकार करत आहे नियोजन

Corona Vaccination आता रोज होणार 1 कोटी नागरिकांचं लसीकरण! सरकार करत आहे नियोजन

Corona Vaccination आता रोज होणार 1 कोटी नागरिकांचं लसीकरण! सरकार करत आहे नियोजन

Covid-19 Vaccine: आगामी महिन्यांमध्ये सरकारला कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनचे 25 कोटी डोस मिळू शकतात असं सांगितलं जात आहे. त्याशिवाय सरकार स्पुटनिक व्ही आणि इतर व्हॅक्सिनच्या उत्पादनाकडेही नजरा लावून आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 31 मे: देशभरात सध्या कोरोनाच्या (Covid-19) लसींचा (Vaccine) तुटवडा निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अनेक राज्यांनी हा तुटवडा पाहता 18-44 वयोगटासाठीचं लसीकरण (Vaccination) बंद केलं आहे. दरम्यान, केंद्र सरकार आता रोज एक कोटी नागरिकांचं लसीकरण (daily one crore vaccination) करण्याची योजना आखत आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जुलैच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यापासून ते शक्य होणार आहे. सध्या ही योजना अंमलात आणण्यासाठी सरकार महिन्याला 30 ते 32 कोटी लसींच्या उत्पादनावर लक्ष देत आहे. (वाचा- फक्त 45+ लोकांनाच मोफत कोरोना लस का?; सुप्रीम कोर्टाने मोदी सरकारला झापलं ) आगामी महिन्यांमध्ये सरकारला कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनचे 25 कोटी डोस मिळू शकतात असं सांगितलं जात आहे. त्याशिवाय सरकार स्पुटनिक व्ही आणि इतर व्हॅक्सिनच्या उत्पादनाकडेही नजरा लावून आहे. तसंच सरकार आगामी काळात आणखी काही विदेशी लसींना परवानगी देण्याची शक्यताही व्य्यक्त केली जात आहे. प्रत्येक लसीकरण केंद्रावर रोज किमान 100 ते 150 जणांचं लसीकरण व्हावं अशी योजना आखली जात आहे. सध्या आणखी सहा लसी मंजुरीच्या प्रतिक्षेत आहेत. सीरम इन्स्टिट्यूटचे कोव्हॅक्स, बायोलॉजिकल ई चे कॉर्बेव्हॅक्स, जायडस कॅडिलाची जीकोव्ह-डी, जेनोवाची एमआरएनए व्हॅक्सिन, जॉन्सन अँड जॉन्सन च्या व्हॅक्सिनची बायो ई आणि भारत बायोटेकची इंट्रानसल कोविड -19 व्हॅक्सिन. सरकार यावर्षी देशात mRNA व्हॅक्सीन आणण्यासाठी फायजरशी चर्चा करत आहे. लाने के लिए फाइजर के साथ बातचीत कर रही है. (वाचा- नुकतीच झाली होती कोरोनामुक्त, घरी जात असताना अपहरण करुन केला बलात्कार ) भारतीय शास्त्रज्ञ सध्या दोन वेगवेगळ्या व्हॅक्सिनच्या मिश्रनातून कोरोनाला मात देता येते का याचा अभ्यास करत आहेत. भारतात लवकरच याबाबत चाचणी केली जाणार आहे. या प्रयोगात सध्या भारतात वापरल्या जाणाऱ्या सर्व लसींचा वापर केला जाणार आहे. जर हा प्रयोग यशस्वी ठरला तर लोकांना दोन वेगवेगळ्या कंपन्यांच्या लसी दिल्या जाऊ शकतील. आगामी काळात कोविशिल्ड लस सिंगल शॉट ठेवण्याचा विचार केला जात आहे. सिंगल शॉट लस कोरोना व्हायरसशी लढण्यात प्रभावी आहे का हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. जॉन्सन अँड जॉन्सन, स्पुटनिक लाइट आणि Covishield एकाच पद्धतीनं तयार झालेल्या आहेत. जॉन्सन अँड जॉन्सन आणि स्पुटनिक लाइट सिंगल डोस व्हॅक्सिनच आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात