मुंबई, 25 ऑगस्ट : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackery) यांच्याबद्दल अपशब्द वापरल्यामुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या वक्तव्याला भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांनी पाठिंबा दिला नव्हता. 'फडणवीस हे आमचे मार्गदर्शक आहे, ते जे सांगतील ते मी स्वीकारतो, असं म्हणत राणेंनी आपली बाजू मांडली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कानाखाली मारण्याची भाषा केल्यामुळे राणे यांना अटकेत जावे लागले. त्यांच्या या विधानाला देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही राणेंच्या वक्तव्याशी सहमत नाही, पण आम्ही राणेंच्या पाठीशी आहोत, असं स्पष्ट करत भाजपने या प्रकरणातून दोन हात लांब राहण्याचं दिसून आलं. त्यानंतर आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत असताना राणे यांनी शिवसेनेवर तर निशाणा साधलाच पण पत्रकारांवरही खापर फोडले.
IND vs ENG : अंडरसन-बटलरने 50 मिनिटांमध्ये खल्लास केला टीम इंडियाचा खेळ!
महाड कोर्टाने मला काल जामीन दिला. आता हायकोर्टानेही 17 तारखेला सुनावणी होणार आहे. तोपर्यंत राज्य सरकारने कायदेशीर कारवाई करणार नाही. मी देशासाठी योग्य तेच बोललो. देवेंद्र फडणवीस हे आमचे मोठे नेते आहे. ते नेहमी आम्हाला मार्गदर्शन करत असतात, ते जे सांगितलं ते मी स्वीकारेल, असंही राणे म्हणाले.
तसंच, ''आमच्या यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळत असल्यामुळे त्यांनी आमचा विरोध केला. पण, पक्ष माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आहे.. मला सार्थ अभिमान आहे, माझ्या देशाचा, मला सहन झाले नाही. ते म्हणाले होते की सेनाभवनाकडे कुणी पाहिले तर पाय तोडा. ते मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल म्हणाले होते की, चपलाने मारावे वाटते. तर अमित शहांबद्दल ते असंसदीय शब्द वापरला होता, त्यांचं सर्व चालतं, मग मी देशासाठी बोललो, असं राणे म्हणाले.
पुढील 5 दिवस 5 जिल्ह्यांना झोडपणार पाऊस; मराठवाड्यातही होणार विजांचा कडकडाट
'अनिल परब यांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ते पोलिसांवर दबाव टाकत आहे. दिशा सालीयान प्रकरणात कोणता मंत्री उपस्थितीत होता, पूजा चव्हाण प्रकरणाचं काय झालं. आम्ही लोकशाही आणि कायदेशीर लढाई लढणार, आणि ज्याने कृत्य केले, ते ते आत जाईपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही, असा इशाराही राणेंनी दिला.
यापुढे भाजप नेते, मंत्र्यांविरोधात कुणी काही बोलणार असेल तर मी सहन करणार नाही. आपण काही बोललो तर वाद होतोय, त्यामुळे आता जपून पावलं टाकावी लागणार आहे, असंही राणे म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.