मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

आगामी विधानसभा निवडणुकीबद्दल नाना पटोलेंचं मोठं विधान, म्हणाले...

आगामी विधानसभा निवडणुकीबद्दल नाना पटोलेंचं मोठं विधान, म्हणाले...

अनंत गितेंच्या 'त्या' वक्तव्याचं नाना पटोलेंनी केलं समर्थन

अनंत गितेंच्या 'त्या' वक्तव्याचं नाना पटोलेंनी केलं समर्थन

'कामगार देशोधडीला लावण्याचे काम मोदी सरकारने केले आहे. पण, राज्यात कामगार विरोधी कायदे राज्यात लागू होऊ देणार नाही'

  • Published by:  sachin Salve

मुंबई, 09 मे: शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने एकत्र येऊन महाविकास आघाडी सरकार (MVA Government) स्थापन केलं. स्थानिक पातळीवरही महाविकास आघाडीने एकत्र निवडणूक लढवल्या आहे. पण, आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी पुन्हा एकदा विधानसभा स्वबळावर (Maharashtra assembly elections) लढवण्याचा नारा दिला आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर नाना पटोले यांनी पक्षसंघटनेला मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. आज नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय मजदूर काँग्रेस इंटक महाराष्ट्र शाखेच्या राज्यस्तरीय कार्यकारिणीची ऑनलाईन बैठक पार पडली.

19 वर्षांनंतर मिळाली देशाकडून खेळण्याची संधी, पहिल्याच ओव्हरमध्ये केला रेकॉर्ड

यावेळी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत असताना 'आगामी विधानसभा निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार, असा निर्धार पटोले यांनी बोलून दाखवला, असं वृत्त दिव्य मराठीने दिले आहे.

'मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर कामगार कायदे मोडीत काढले आहे. सर्व कायदे आता मालकाच्या बाजूने गेले असून कामगार देशोधडीला लावण्याचे काम मोदी सरकारने केले आहे. पण, राज्यात कामगार विरोधी कायदे राज्यात लागू होऊ देणार नाही, असंही नाना पटोले यांनी स्पष्ट केलं.

मोठं मन! कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी सासू-सूनेचे प्रयत्न; दागिने अन् पैसे दान

तसंच, कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी काँग्रेस पक्ष लढा देत आला आहे. सत्तेत असताना कामगार हिताचे कायदे बनवले होते. पण, सध्या केंद्रात असलेल्या सरकारने शेतकरी, कामगारांच्या विरोधात कायदे तयार करत आहे. काँग्रेस या विरोधात लढा देत राहिल, असंही पटोले म्हणाले.

दरम्यान मध्यंतरी, मुंबई महानगर पालिकेची निवडणूक (Mumbai municipal election) च्या तोंडावर काँग्रेसचे नेते आणि मुंबई शहर अध्यक्ष भाई जगताप (Bhai Jagatap) यांनी 'माझा आजही वेगळे लढण्याबद्दल विचार आहे आणि 100 दिवसांनंतर सुद्धा तोच  विचार असणार आहे' असं वक्तव्य केले होतं. त्यांच्या या वक्तव्यामुळे काही काळ महाविकास आघाडीत तणाव निर्माण झाला होता. आता पुन्हा एकदा नाना पटोले यांनीच विधानसभा स्वबळावर लढण्याचे बोलून दाखवल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

First published:

Tags: Congress, Mumbai, Nana Patole, काँग्रेस, नाना पटोले