Corona Vaccine मध्ये डुकराची चरबी? मुस्लिम संघटनांनी घेतला मोठा निर्णय

चीनमध्ये तयार होणाऱ्या कोरोना व्हॅक्सिनचा वापर न करण्याचा निर्णय मुस्लिम संघटनांनी घेतला आहे.

चीनमध्ये तयार होणाऱ्या कोरोना व्हॅक्सिनचा वापर न करण्याचा निर्णय मुस्लिम संघटनांनी घेतला आहे.

  • Share this:
    मुंबई, 24 डिसेंबर: कोरोना लस (Corona Vaccine) अंतिम टप्प्यात असून पुढील दोन-तीन महिन्यात लसीकरणास सुरुवात होईल, असा कयास लावला जात असताना नव्या वादाला तोंड फुटलं आहे. चीनमध्ये तयार होणाऱ्या कोरोना व्हॅक्सिनचा वापर न करण्याचा निर्णय मुस्लिम संघटनांनी घेतला आहे. मुंबईत झालेल्या 9 मुख्य मुस्लिम संघटनांच्या बैठकीत हा महत्त्वापूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. मुस्लिम संघटनांचं म्हणणं आहे की, चीनमध्ये तयार झालेल्या कोरोना लशीत डुकराच्या चरबीचा वापर करण्यात आला आहे. डुक्कर हे मुसलमानासाठी अशुभ (हराम) आहे. यामुळे चायना व्हॅक्सिनचा वापर योग्य नसल्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. हेही वाचा...कोरोनामुळे डायबेटिजचा धोका? रुग्णांच्या शरीरातील वाढत्या ब्लड शुगरमुळे चिंता रझा अकदमीचे सचिव मौलाना सय्यद नूरी म्हणाले, मुंबईत बुधवारी एक महत्त्वाची बैठक घेण्यात आली. बैठकीत 9 मुस्लिम संघटना सहभागी झाल्या. चीनने देखील कोरोना लस तयार केली आहे, याची आम्हाला कल्पना आहे. या लसमध्ये डुकराचे केस, चरबी आणि मांसचा वापर करण्यात आला आहे. जर डुकराचे एक केस विहिरीत पडले असेल तर त्या विहिरीचे पाणी सेवन केलं जात नाही. त्यामुळे चीनमधील कोरोना व्हॅक्सिनचा वापर मुस्लिम समुदाय करणार नाही, असा निर्णय घेण्यात आल्याचं मोहम्मद सय्यद नूरी यांनी माहिती दिली आहे. कोरोना लसमध्ये डुकराची चरबी, मांस आहे की नाही आधी ते पाहिलं जाईल, त्यानंतर इस्लामिक परिषदेकडून मंजुरी मिळाल्यानंतरच मुस्लिमांनी कोरोना लस घ्यावी, असं मौलाना सईद नूरी यांनी सांगितले आहे. मुस्लिम संयुक्त अरब अमीराततर्फे (USE) इस्लामिक परिषदेकडून आलेल्या फतव्यानुसार मुंबईतील मुस्लिम संघटनांनी हा निर्णय घेतला आहे. इस्लामिक परिषदेचे अध्यक्ष शेख अब्दुल्ला बिन बय्या यांनी सांगितलं की, मावनी जीवाला वाचवणे, ही आपली प्राथमिकता आहे, जर पर्याय नसेल तर इस्लामी बंधनापासून मुक्त ठेवण्यात येईल, असंही ते म्हणाले. कोरोनालशीत डुकराच्या जिलेटीनचा वापर.. चीनमध्ये तयार करण्यात येत असलेल्या कोरोना लशीत पोर्क जिलेटिन औषधाचा वापर करण्यात येत आहे. मुस्लिम समाजात डुक्कर हे हराम मानलं जातं. त्यामुळेमुस्लिम संयुक्त अरब अमीराततर्फे (USE) इस्लामिक परिषदेकडून आलेल्या फतवा जारी करण्यात आला आहे. हेही वाचा...कोरोनाविरोधातील प्रतिकारक शक्तीबाबत नवी माहिती समोर; लशीच्या प्रभावाला मिळालं बळ दरम्यान,दक्षिण आफ्रिकेत कोविड 19 विषाणूशी संबंधित असलेल्या विषाणूचा आणखी एक प्रकार ब्रिटनमध्ये सापडला असल्याचे आरोग्यमंत्री मॅट हँकॉक यांनी जाहीर केलं आहे. याआधी कोरोना विषाणूचा एक नवीन प्रकार सापडलेला असतानाच आता हा प्रकार सापडल्याने खळबळ उडाली आहे.
    Published by:Sandip Parolekar
    First published: