मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

Mumbai Vaccination: मुंबईत आजपासून 4 दिवस लसीकरण बंद, सोमवारपासून पुन्हा होणार सुरु

Mumbai Vaccination: मुंबईत आजपासून 4 दिवस लसीकरण बंद, सोमवारपासून पुन्हा होणार सुरु

Mumbai Vaccination:आजपासून मुंबईतील शासकीय आणि महानगरपालिका केंद्रांवर गुरुवार ते रविवार लसीकरण बंद असणार आहे.

Mumbai Vaccination:आजपासून मुंबईतील शासकीय आणि महानगरपालिका केंद्रांवर गुरुवार ते रविवार लसीकरण बंद असणार आहे.

Mumbai Vaccination:आजपासून मुंबईतील शासकीय आणि महानगरपालिका केंद्रांवर गुरुवार ते रविवार लसीकरण बंद असणार आहे.

  • Published by:  Pooja Vichare

मुंबई, 04 नोव्हेंबर: मुंबईतील (Mumbai) लसीकरणासंदर्भात (Corona vaccination)मोठी अपडेट समोर आली आहे. आजपासून म्हणजे गुरुवार 4 नोव्हेंबर ते रविवार 7 नोव्हेंबर 2021 पर्यंत लसीकरण बंद असणार आहे. मुंबईतील (Mumbai Corona vaccination)चार दिवस शासकीय आणि महानगरपालिका (BMC) केंद्रावर कोविड लसीकरण बंद असेल. सोमवारी म्हणजेच 8 नोव्हेंबर 2021 रोजी लसीकरण पूर्ववत सुरु असणार आहे. प्रशासनाकडून यासंदर्भातली माहिती देण्यात आली आहे.

प्रशासनानं आवाहन केलं आहे की, मुंबई महानगरपालिकेकडे कोविड लसींचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे सोमवारपासून लसीकरण मोहीम पूर्ववत सुरु राहणार आहे. मुंबईकर नागरिकांनी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावं.

पुण्यातही तीन दिवस लसीकरण बंद

पुण्यात ही कोरोना लसीकरण (Corona vaccination) तीन दिवस बंद (closed for three days) असणार आहे. पुण्यातल्या सरकारी रुग्णालयामध्ये (government hospital) आजपासून तीन दिवस म्हणजेच गुरुवार, शनिवार आणि रविवारी लसीकरण बंद असेल. दरम्यान शुक्रवारी सकाळच्या सत्रात फक्त लसीकरण करता येणार आहे.

हेही वाचा- आधी रोहित पवारांनी इंधन दर कपातीनंतर मानले आभार, नंतर केंद्र सरकारला दिला सल्ला

पुणे महापालिकेचे लसीकरण अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर यांनी माहिती दिली की, सरकारी रुग्णालयांमधून सुरू असलेले कोरोना प्रतिबंधक लसीकरण दिवाळीमध्ये तीन दिवस बंद राहणार आहे. दिवाळी पाडव्याच्या दिवशी लसीकरण केंद्राचे कामकाज अर्धा दिवस सुरू राहील.

दिवाळी सणात लसीकरणासाठी नागरिकांकडून प्रतिसाद मिळत नसल्यानं लसीकरण बंद ठेवण्याचा निर्णय पालिकेनं घेतला. पुण्यात 18 वर्षांवरील 100 टक्के पुणेकरांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. त्यामुळे आता लसीचा दुसरा डोस नागरिकांनी घ्यावा यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करण्यात येत आहे.

हेही वाचा- पिंपरीत दृश्यम स्टाईलनं हत्या, अनैतिक संबंध समजताच पत्नीच्या Boyfriend ला संपवलं

राज्यात 30 नोव्हेंबरपर्यंत 100 टक्के लसीकरण करा: मुख्यमंत्री

मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्यासोबत कोविड 19 संसर्ग प्रतिबंध लसीकरणा संदर्भात प्रदिर्घ चर्चा केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना येत्या 30 नोव्हेंबर पर्यंत 100 % लसीकरण पूर्ण करण्याचं उद्दिष्ट दिलंय. त्यामुळे राज्यातील लसीकरणाचा वेग वाढवला जाणार आहे. त्यासाठी आता घरोघरी जाऊनही लसीकरण मोहीम राबवण्याची शक्यता आहे.

First published:

Tags: BMC, Corona vaccination, Corona vaccine, Mumbai