मुंबई, 04 नोव्हेंबर: ऐन दिवाळीच्या (Diwali) मुहुर्तावर अखेर मोदी सरकारने (modi government) पेट्रोल आणि डिझेलच्या (petrol diesel price)दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. पेट्रोलच्या दरात 5 रुपये आणि डिझेलच्या दरात 10 रुपये उत्पादन शुल्क कर कमी केला आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात होणार आहे. केंद्र सरकारच्या निर्णयानंतर भाजप नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक केलं. तर विरोधकांनीही या निर्णयाचं स्वागत केलं. त्यासोबतच विरोधकांनी टीका देखील केली. कर्जत जामखेडेचे आमदार रोहित पवार यांनी मोदी सरकारचे आभार मानलेत. तसंच गॅस सबसिडीबाबत देखील विचार करण्याचा सल्ला त्यांनी केंद्र सरकारला दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी यासंदर्भात एक फेसबूक पोस्ट शेअर केली आहे.
रोहित पवारांनी काय म्हटलं आपल्या फेसबूक पोस्टमध्ये
केंद्र सरकारने पेट्रोलवर 5 रुपये तर डिझेलवर 10 रुपये कर कमी केल्याने राज्याचेही पेट्रोलवरील एक आणि डिझेलवरील दोन रुपयांनी कमी होतील. कदाचित देशात झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपला मतदारांनी झटका दिल्यानंतर केंद्र सरकारला उशिरा का होईना दिवाळीच्या निमित्ताने जाग आली हे महत्वाचं आहे, याबाबत आभार!
आता इतक्या दिवसांनी जाग आलीच आहे तर महागाईने 'गॅस'वर असलेल्या सामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी गॅस सबसिडीबाबतही विचार करावा. तसंच #GST सह राज्याचा हक्काचा थकीत निधीही वेळच्यावेळी द्यावा, ही विनंती!
हेही वाचा- पिंपरीत दृश्यम स्टाईलनं हत्या, अनैतिक संबंध समजताच पत्नीच्या Boyfriend ला संपवलं
कोरोनाच्या काळात लोकं अडचणीत असताना आणि बेरोजगारी वाढली असतानाच पेट्रोल-डिझेलवर आजवरच्या इतिहासात सर्वाधिक कर केंद्र सरकारने या दोन-तीन वर्षांच्या काळात आकारला. त्यामुळं तो तातडीने कमी करण्याची गरज आहे.
केंद्र सरकारचा निर्णय
मोदी सरकारकडून ऐन दिवाळीच्या तोंडावर अखेरीस जनतेला दिलासा देण्यात आला आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर 100 रुपयांच्या पुढे गेले आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेचं कंबरडं मोडलं होतं. पण, आता उत्पादन शुल्क कर कमी करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला. पेट्रोलच्या दरात 5 रुपये आणि डिझेलच्या दरात 10 रुपये उत्पादन शुल्क कर कमी केला आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात झाली आहे. केंद्राने इंधनावरील केलेली कपात आज गुरुवारपासून लागू झाली आहे.
हेही वाचा- दिवाळीच्या पहिल्या दिवशी वाईट बातमी, Pop-Up फटाका खाल्ल्यानं 3 वर्षांच्या मुलाचा मृत्यू
गेल्या काही महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी वाढ झाली. परिणामी, पेट्रोल आणि डिझेलच्या दरात देशांतर्गत किंमतींमध्ये वाढ झाली. पेट्रोलच्या दराने 110 चा आकडा पार केला तर डिझेलचे दरही 100 च्या पुढे गेले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Central government, Petrol and diesel price, Rohit pawar, शरद पवार