पिंपरी-चिंचवड, 04 नोव्हेंबर: पतीनं विवाहितेच्या प्रियकराची (Boyfriend) हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना पिंपरी-चिंचवडमध्ये (Pimpri chinchwad) उघडकीस आली आहे. पत्नीसोबत (Wife) असलेल्या अनैतिक संबंधातून पतीनं टोकाचं पाऊल उचललं आहे. त्यानंतर आरोपी पतीनं पत्नीच्या प्रियकराचा मृतदेह हातभट्टीमध्ये टाळून जाळला असल्याचं समजतंय. तसंच आरोपीनं पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी दृश्यम सिनेमाच्या स्टाईलनुसार परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न देखील केला. पुणे जिल्ह्यातल्या पिंपरी चिंचवडमधील हिंजवडी पोलीस ठाणे हद्दीत येणाऱ्या बावधानमध्ये ही हत्या झाली आहे.
कशी केली हत्या
आरोपी पतीनं पत्नीच्या प्रियकराची हत्या केली. त्यानंतर त्यानं प्रियकराचा मृतदेह दारुच्या हातभट्टीमध्ये जाळून टाकला. मृतदेह संपूर्ण जळल्यानंतर त्या मृतदेहाची हाडं आणि त्यासोबत एक शेळी मारुन तिचा मृतदेह पोत्यात भरला. त्यानंतर हे पोतं आरोपीं जवळच्या नाल्यात फेकलं. जेणेकरुन पोलिसांची दिशाभूल होईल. मात्र हिंजवडी पोलिसांनी या हत्येचा उलगडा केला असून तिघांना अटक केली आहे. यात पोलिसांनी एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेतलं आहे.
हेही वाचा- दिवाळीच्या पहिल्या दिवशी वाईट बातमी, Pop-Up फटाका खाल्ल्यानं 3 वर्षांच्या मुलाचा मृत्यू
पोलिसांनी पती लंकेश राजपूत उर्फ लंक्या, गोल्या उर्फ अरुण राजपूत, सचिन तानाजी राजपूत यांनी अटक केली आहे. तर एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आलं आहे.
पत्नीसोबत होते अनैतिक संबंध
बावधन येथे राहणारा भरत चोरगे याचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. 21 ऑक्टोबर भरतनं महिलेला तिच्या मोबाईलवर दोन मिस कॉल दिले. त्यावेळी जवळ असलेला पती चिडला आणि त्यानं आपल्या पत्नी विचारणा केली. त्यानंतर आरोपी पतीनं महिलेला मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाण करताना महिलेनं घरातून पळ काढला.
हेही वाचा- सुपरस्टार रजनीकांत यांचा Annaatthe रिलीज, फर्स्ट डे फर्स्ट शोसाठी उसळली चाहत्यांची गर्दी
त्याचदरम्यान महिलेशी संपर्क न होत असल्यानं तिचा प्रियकर असलेला भरत चोरगे या महिलेला भेटण्यासाठी तिच्या घराजवळ आला. मात्र भरत तिथे आल्याचं समजताच आरोपीनं आपल्या दोन साथीदारांच्या मदतीनं त्याची धारदार शस्त्रानं वार करत हत्या केली.
हत्या करुन भरतचा मृतदेह गाडीतून उरवडे गावात असलेल्या दारुच्या हातभट्टीमध्ये दिवस जाळला. त्यानंतर मृतदेह जाळल्यानंतर त्याची राख आणि इतर अवशेष हे घोटावडे परिसरातल्या नाला आणि नदीत टाकून पुरावे नष्ट केले. त्यानंतर आरोपी पती मध्य प्रदेशमध्ये पळून गेला.
मृत तरुणाच्या आईनं दिली मिसिंग तक्रार
भरत चोरगेच्या कुटुंबियांनी हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये तो बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. त्याच दिवशी भरतची चप्पल त्याच्या आईला लंकेशच्या घराजवळ दिसली. त्यानंतर हिंजवडी पोलिसांनी तपास सुरु करुन लंकेशची चौकशी केली. चौकशीदरम्यान ही घटना समोर आली.
हेही वाचा- दिवाळीच्या पहिल्या दिवशी Good News, 'या' सिंगल लसीचा डोस करतोय Coronaचा धोबीपछाड
सर्व आरोपींनी हत्येचा घटनाक्रम सांगितला असून मृत भरतला दुरुच्या भट्टीमध्ये जाळलं. त्यावेळी त्याची हाडं आणि भरतच्या पायामध्ये काही वर्षांपूर्वी डॉक्टरांनी बसवलेला लोखंडी रॉड टाकून दिलेल्या ठिकाण देखील सांगितलं. पोलिसांनी तो लोखंडी रॉड हस्तगत केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.