Election Result 2019 Live: मतमोजणीदरम्यान नाशिकमध्ये गोंधळ, मशीन बदलल्याचा काँग्रेसचा आरोप

Election Result 2019 Live: मतमोजणीदरम्यान नाशिकमध्ये गोंधळ, मशीन बदलल्याचा काँग्रेसचा आरोप

राज्यातील अनेक दिग्गजांच्या भवितव्याचा आज फैसला होणार आहे.

  • Share this:

प्रशांत बाग,(प्रतिनिधी)

नाशिक,24 ऑक्टोबर: विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणी सुरु आहे. या दरम्यान, नाशिकमध्ये मतमोजणीत गोंधळ झाला आहे. नाशिक पूर्वमध्ये काँग्रेस उमेदवार गणेश उन्हवणे यांनी टेबल क्र.8 वरील मशीन बदलल्याची तक्रार केली आहे. निवडणूक अधिकारी समाधानकारक उत्तर देत नसल्याचेही गणेश उन्हवणे यांनी सांगितले आहे. दरम्यान, राज्यातील अनेक दिग्गजांच्या भवितव्याचा आज फैसला होणार आहे. निकालाकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्रात पुन्हा महाआघाडीला धोबीपछाड देत महायुती सत्तेवर येणार की युतीला धक्का देत आघाडी बाजी मारणार, याची उत्सुकता लागली आहे.

उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यात भाजप आघाडीवर तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी पिछाडीवर दिसत आहे. भाजप 8, शिवसेना 8, काँग्रेस 10, राष्ट्रवादी 7 आणि अपक्ष 1 असे सुरूवातीचे चित्र आहे. येवल्यातून राष्ट्रवादीचे छगन भुजबळ यांनी जोरदार मुसंडी मारली आहे. भाजपचे संकटमोचन मंत्री अर्थात गिरीश महाजन हे जामनेरमधून आघाडीवर आहेत. तर धुळे शहर मतदार संघात अपक्ष उमेदवार राजवर्धन कदमबांडे पोस्टल मतांमध्ये पुढे आहेत. नांदगांव विधानसभा शिवसेनेचे सुहास कांदे 4400 मतांनी आघाडीवर असून राष्ट्रवादीचे पंकज भुजबळ पिछाडीवर आहे. मुक्ताईनगरात भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंची कन्या रोहिणी खेवलकर- खडसे या पिछाडीवर आहे. नाशिक मध्यमधून भाजपच्या देवयानी फरांदे 2584 आघाडीवर आहेत. मालेगाव बाह्यमध्ये शिवसेनेचे दादा भुसे 1937 मतांनी हे आघाडीवर आहेत.

अभूतपूर्व बंडखोरीने निवडणुकीत भरला रंग..

लोकसभा निवडणुकीनंतर भाजपमध्ये मोठ्याप्रमाणात 'इनकमिंग' झाले. परिणामी युतीच्या इच्छुकांनी अभूतपूर्व बंडखोरी केल्यामुळे निवडणुकीत चांगलेच रंग भरले. त्यातील अनेक इच्छुकांनी अखेरच्या टप्प्यात काँग्रेस व राष्ट्रवादीकडे मोर्चा वळवला. मात्र, तिथेही त्यांच्या वाट्याला निराशाच पडली. त्यामुळे बंडखोरीला चांगलाच ऊत आला. जिथे सेनेला जागा आहे तिथे भाजपचे आणि जिथे भाजपला जागा आहे तिथे सेनेचे बंडखोर उभे ठाकले. विशेष म्हणजे आपापल्या पक्षातून या बंडखोरांना मित्रपक्षाविरोधात उघड उघड रसद पुरवठा झाला. त्यातून युतीविरुद्ध युती अशी विचित्र आणि अंतर्गत अस्वस्थता वाढवणारी स्थिती बनली.

मंत्र्यांच्या खडाजंगीने वेधले...

गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील या मंत्रिमहोदयांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेप्रसंगी झालेल्या खडाजंगीने सगळ्याचे लक्ष वेधले. अखेरच्या टप्प्यात शरद पवारांच्या झंझावाती प्रचाराने राष्ट्रवादीत जान फुंकली. पवारांच्या सभांना मिळणारा प्रतिसाद हुरूप वाढवणारा होता खरा, पण प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी 'पोल मॅनेजमेंट'मध्ये आघाडीची मंडळी कमी पडल्याचे जाणवले. अखेर येथे युतीचा वरचष्मा राहील, असा अंदाज जवळपास सर्व खासगी वृत्तवाहिन्या आणि मतदानोत्तर चाचण्या करणाऱ्या संस्थांनी वर्तवले आहे. उत्तर महाराष्ट्रात लक्षवेधी मतदारसंघांत रोहिणी खडसे (मुक्ताईनगर) नव्या वारसदारांसह छगन भुजबळांसारख्या (येवला) दिग्गज नेत्याचाही समावेश आहे. मतदारांनी इथे व्यक्तीला प्राधान्य दिले गेले की पक्षाला हा निकष या मतदार संघातील लढतींत सर्वाधिक महत्त्वाचा ठरेल.

काय आहे एक्झिट पोलचा अंदाज?

महाराष्ट्र विधानसभा मतदारांनी कुणाच्या पारड्यात बहुमत टाकलंय हे 24 ऑक्टोबर म्हणजे गुरुवारी स्पष्ट होईल. News18 Lokmat आणि IPSOS ने केलेल्या मतदानोत्तर चाचणीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळणार, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 288 जागा असलेल्या महाराष्ट्र विधानसभेत बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांचा आकडा गाठावा लागतो. महायुतीला 243 जागा मिळण्याचा अंदाज EXIT POLL मध्ये वर्तवण्यात आला आहे. काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीला 41 जागा मिळतील, असं या Exit Poll चा निकाल सांगतो. News18 Lokmat च्या exit poll मध्ये पश्चिम महाराष्ट्र वगळता अन्य कुठेही आघाडीला जागांचा दुहेरी आकडाही गाठता आलेला नाही.

उत्तर महाराष्ट्रात 36 पैकी 31 जागांवर भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार विजयी पतका फडकावणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. महायुती- 31, (भाजप-18, शिवसेना-13), महाआघाडीला-6 (काँग्रेस-5, राष्ट्रवादी-1) जागांवर यश मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याचा अर्थ असा की, मागील विधानसभा निवडणुकीची पुनरावृत्ती यंदाच्या निवडणुकीत होणार आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससा यंदाही मतदारांनी नाकारल्याचे दिसत आहे. 2014 मधील विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेने स्वतंत्र्य लढवली होती. निकाल पाहिले असता शिवसेना 07, भाजप 15, राष्ट्रवादी 05, काँग्रेस 07 तर अपक्ष 02 उमेदवार निवडून आले होते.

छगन भुजबळांचं मॅजिक चालणार..

या पोलनुसार, येवल्यामध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. तर छगन भुजबळांचं मॅजिक चाललं आहे. छगन भुजबळ आणि येवला मतदारसंघ हे अनेक वर्षांचं समीकरण आहे. पैठणीसाठी ओळखल्या जाणाऱ्या येवला-लासलगाव मतदारसंघातून छगन भुजबळ हे सलग तीन वेळा निवडून आले. यावेळी मात्र त्यांच्याच पक्षातले माणिकराव शिंदे यांनी त्यांना उमेदवारीसाठी आव्हान दिले आहे.

News18 Lokmat आणि IPSOS ने केलेल्या मतदानोत्तर चाचणीनुसार...

2019 विधानसभा निवडणूक

महायुती (भाजप-शिवसेना) - 31

भाजप-18

शिवसेना-13

काँग्रेस-5

राष्ट्रवादी-1

2019 विधानसभा निवडणूक

शिवसेना 07

भाजप 15

एनसीपी 05

काँग्रेस 07

अपक्ष 02

2009 विधानसभा निवडणूक

शिवसेना 07

भाजप 05

एनसीपी 09

काँग्रेस 06

सपा 01

अपक्ष 05

एमएनएस 03

एकूण जागा - 288

कोण किती लढतंय जागा...

भाजप - 164,

शिवसेना - 124,

काँग्रेस - 147,

राष्ट्रवादी - 121,

सपा - 7,

स्वाभिमानी शेतकरी संघटना - 5.

वंचित बहुजन आघाडी - 235,

एम.आय.एम. - 44,

बहुजन विकास आघाडी - 31,

मनस - 105,

बसपा - 262,

आप - 24

कोण कोणाच्या विरोधात...

-मनसे 105 पैकी शिवसेने विरोधात 54 तर भाजप च्या विरोधात 51 जागा लढवत आहे

-भाजप 164 पैकी राष्ट्रवादीच्या विरोधात 60, काँग्रेसच्या विरोधात 94, अन्य विरोधात 10 जागा लढवत आहे

-शिवसेना 126 पैकी राष्ट्रवादीच्या विरोधात 57, काँग्रेसच्या विरोधात 52 तर अन्य विरोधात 15 जागा लढवत आहे,

-शिवसेना-भाजप राज्यात कणकवलीत एकमेकांच्या विरोधात लढत आहेत.

LIVE VIDEO : निकालाचा पहिला कल हाती, कोण आहे आघाडीवर?

First published: October 24, 2019, 10:58 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading