मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

26/11 Attack: मुंबईसाठी काळा दिवस! हादरली होती गजबजलेली मुंबापुरी, 13 वर्षांपूर्वी नेमकं काय घडलं?

26/11 Attack: मुंबईसाठी काळा दिवस! हादरली होती गजबजलेली मुंबापुरी, 13 वर्षांपूर्वी नेमकं काय घडलं?

सुरुवातीला छोटा वाटत असलेला हा हल्ला किती व्यापक आहे, हे थोड्याच वेळात स्पष्ट झालं आणि सुरू झाले ते थरारक तास.

सुरुवातीला छोटा वाटत असलेला हा हल्ला किती व्यापक आहे, हे थोड्याच वेळात स्पष्ट झालं आणि सुरू झाले ते थरारक तास.

सुरुवातीला छोटा वाटत असलेला हा हल्ला किती व्यापक आहे, हे थोड्याच वेळात स्पष्ट झालं आणि सुरू झाले ते थरारक तास.

मुंबई, 26 नोव्हेंबर: आज 26 नोव्हेंबर आहे. 26/11 म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर फक्त आणि फक्त एकच गोष्ट येते, ती म्हणजे मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ला. (26/11 Mumbai Terror Attack) हा हल्ला मुंबईवर झाला असला, तरी दहशतवाद्यांनी ते संपूर्ण देशाविरुद्धच पुकारलेलं एक प्रकारचं युद्ध होतं. करकरे, साळसकर, कामठे, उन्नीकृष्णन, ओंबाळे यांसारख्या 11 शूरवीरांना या युद्धात वीरगती प्राप्त झाली. त्याव्यतिरिक्त 137 जणांना आपले प्राण गमवावे लागले, तर जवळपास 300 व्यक्ती जखमी झाल्या होत्या. या हल्ल्यात सहभागी असलेल्या कसाब या दहशतवाद्याला जिवंत पकडून त्याच्यावर रीतसर खटला चालवून त्याला फासावरही लटकवण्यात आलं; मात्र तीन दिवस चाललेला हा हल्ला म्हणजे भारताच्या इतिहासात कायम भळभळणारी (Mumbai) जखम आहे. आज या हल्ल्याला 13 वर्षं पूर्ण झाली आहेत. त्या निमित्ताने 26/11 ला नेमकं काय झालं होतं, याचा एक धावता आढावा घेऊ या. 'आज तक'ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे.

2008 सालच्या नोव्हेंबर महिन्यातली 26 तारीख. बुधवारचा दिवस संपत आला होता. प्रचंड वर्दळ असलेलं देशाच्या आर्थिक राजधानीचं मुंबई शहर नेहमीप्रमाणेच धावत होतं. लाखो मुंबईकर आपापल्या कामाच्या ठिकाणाहून घरी परतत असल्यामुळे मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकल्स ओसंडून वाहत होत्या. पुढच्या काही क्षणांत या शहरावर मृत्यूचं वादळ घोंघावत येणार आहे, याची त्यापैकी कोणालाही कल्पना असण्याचं काही कारणच नव्हतं. नि तो क्षण आला. वारसा वास्तू असलेलं मुंबईतलं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि लिओपोल्ड कॅफे या दोन ठिकाणी अचानक अंदाधुंद गोळीबार सुरू झाला. पोलिसांना त्याची खबर मिळते न मिळते तोपर्यंत मुंबईच्या आणखीही अनेक ठिकाणी असाच गोळीबार सुरू झाल्याच्या बातम्या येऊ लागल्या. सुरुवातीला छोटा वाटत असलेला हा हल्ला किती व्यापक आहे, हे थोड्याच वेळात स्पष्ट झालं आणि सुरू झाले ते थरारक तास.

हेही वाचा- वडील देते होते 75 लाख हुंडा, पण मुलीनं घेतलेल्या निर्णयाचं सर्वच करतायेत कौतुक 

मुंबईतल्या सर्वांत जास्त वर्दळ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्टेशनवरून (CST) याची सुरुवात झाली. दोन दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला आणि हँड ग्रेनेड्सही फेकले. त्यात 58 निष्पाप नागरिकांचा बळी गेला. कित्येक जण जखमी झाले. भयाचं वातावरण निर्माण झालं. अजमल आमीर कसाब (Ajmal Kasab) आणि इस्माइल खान या दहशतवाद्यांनी हा हल्ला केला होता.

त्याशिवाय ताज हॉटेल (Taj Hotel), हॉटेल ओबेरॉय, लिओपोल्ड कॅफे, कामा हॉस्पिटल यांसह दक्षिण मुंबईतल्या कित्येक ठिकाणी दहशतवाद्यांनी हल्ले सुरू केले. एकाच वेळी इतक्या ठिकाणी हल्ले सुरू झाल्याने सगळी सुरक्षा यंत्रणाही चक्रावली होती. दहशतवादी नेमके किती आहेत, याचा अंदाज लावणंही मुश्कील झालं होतं. पोलिसांसह निमलष्करी दलाचे जवानही संरक्षणासाठी रस्त्यावर उतरले होते. चार ठिकाणी चकमक सुरू होती.

26 नोव्हेंबरच्या रात्रीपर्यंत दहशतवाद्यांनी ताज हॉटेलवर कब्जा मिळवला. तिथे अनेकांना त्यांनी ओलीस ठेवलं होतं आणि त्यात सात परदेशी नागरिकांचाही समावेश होता. ताज हॉटेलच्या हेरिटेज विंगमध्ये त्यांनी आग लावली. 27 नोव्हेंबरच्या सकाळी एनएसजीचे कमांडो या दहशतवाद्यांशी दोन हात करण्यासाठी दाखल झाले. सर्वांत आधी ओबेरॉय हॉटेलमधल्या ओलिस ठेवलेल्या नागरिकांची सुटका करण्यात यश आलं. ते ऑपरेशन 28 नोव्हेंबरच्या दुपारी संपलं. त्याच दिवशी सायंकाळपर्यंत नरीमन हाउसमधल्या दहशतवाद्यांनाही कंठस्नान घालण्यात आलं. ताज हॉटेलमधलं ऑपरेशन संपवण्यासाठी मात्र 29 नोव्हेंबर रोजीची सकाळ उजाडावी लागली होती.

हेही वाचा- 15 वर्षीय आईकडून 40 दिवसांच्या मुलाची हत्या, दोरीनं आवळला गळा

तुकाराम ओंबाळे (Tukaram Ombale) यांच्या शौर्यामुळे अजमल कसाबला ताडदेव परिसरातून जिवंत पकडण्यात यश आलं. ते हुतात्मा झाले; मात्र कसाब हाती लागल्यामुळे त्याच्या चौकशीतून पाकिस्तानचा कुटील डाव समजला. त्यानेच आपल्या बाकीच्या साथीदारांची नावंही सांगितली. त्याच्यावर खटला चालवून त्याला फाशी देण्यात आली.

दहा दहशतवाद्यांनी हा हल्ला घडवून आणला होता. त्यांना पाकिस्तानात प्रशिक्षण देण्यात आलं होतं. 26 नोव्हेंबरला एका होडीने समुद्रमार्गे ते भारतात आले होते. जळालेली होडी पोलिसांना नंतर मिळाली होती.

दहशतवाद्यांनी एक पोलिस व्हॅन पळवली होती. ते त्या व्हॅनमधून फिरत रस्त्यावर गोळीबार करत होते. त्याच वेळी एका टीव्ही कॅमेरामनच्या हाताला गोळी लागली होती. ती व्हॅन घेऊन ते दहशतवादी कामा हॉस्पिटलमध्ये घुसले होते. तिथल्या चकमकीवेळी एटीएसचे प्रमुख (Hemant Karkare) हेमंत करकरे, एसआय अशोक कामटे (Ashok Kamte) आणि एन्काउंटर स्पेशालिस्ट विजय साळस्कर (Vijay Salaskar) हुतात्मा झाले.

हेही वाचा- सुट्टीच्या दिवशी चुकून क्लासला गेली अन्...; शिक्षकानं अल्पवयीन मुलीला दिली आयुष्यभराची जखम

दोनशे एनएसजी कमांडो, सैन्याचे 50 कमांडो आणि सैन्याच्या पाच तुकड्या यासाठी तैनात करण्यात आल्या होत्या. नौदलालाही अॅलर्ट ठेवण्यात आलं होतं.

एनएसजी कमांडो मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्यासह इन्स्पेक्टर सुशांत शिंदे, एसआय प्रकाश मोरे, एसआय नानासाहेब भोसले, एसआय दुदुगडे, काँस्टेबल विजय खांडेकर, काँस्टेबल जयवंत पाटील, योगेश पाटील, अंबादास पवार, एम. सी. चौधरी अशा 11 जणांना यात प्राण गमवावे लागले. मुंबईतल्या 11 ठिकाणी पोलिसांनी दहशतवाद्यांशी दोन हात केले होते.

First published:

Tags: 26/11 mumbai attack, Mumbai, Terror attack