मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /सुट्टीच्या दिवशी चुकून क्लासला गेली अन्...; शिक्षकानं अल्पवयीन मुलीला दिली आयुष्यभराची जखम

सुट्टीच्या दिवशी चुकून क्लासला गेली अन्...; शिक्षकानं अल्पवयीन मुलीला दिली आयुष्यभराची जखम

Rape in Wardha: वर्ध्यात शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका शिक्षकानं शिकवणीसाठी येणाऱ्या 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला (minor girl raped by teacher) आपल्या वासनेचा शिकार बनवलं आहे.

Rape in Wardha: वर्ध्यात शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका शिक्षकानं शिकवणीसाठी येणाऱ्या 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला (minor girl raped by teacher) आपल्या वासनेचा शिकार बनवलं आहे.

Rape in Wardha: वर्ध्यात शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका शिक्षकानं शिकवणीसाठी येणाऱ्या 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला (minor girl raped by teacher) आपल्या वासनेचा शिकार बनवलं आहे.

वर्धा, 26 नोव्हेंबर: वर्धा जिल्ह्याच्या तळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका शिकवणी चालकानं 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला आपल्या वासनेचा शिकार (minor girl raped by teacher) बनवलं आहे. आरोपी शिक्षकानं पीडित मुलीला जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर अनेकदा अत्याचार केले आहेत. पीडित मुलीच्या पोटात दुखू लागल्यानंतर, तिला रुग्णालयात दाखल केलं असता ती  गर्भवती असल्याचं (Minor girl pregnant) समोर आलं आहे. त्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली आहे.

या प्रकरणी पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी तळेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचाराच्या (POCSO) गुन्ह्यासह अन्य कलमाअंतर्गत नराधम शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल (FIR lodged) केला आहे. या घटनेचा पुढील तपास तळेगाव पोलीस करत आहेत. राहुल भारती असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपी शिक्षकाचं नाव असून तळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्याचं शिकवणी केंद्र आहे. पीडित मुलगी इयत्ता आठवीपासून आरोपी शिक्षकाकडे शिकवणीसाठी जात होती.

हेही वाचा-Cold Drink मध्ये गुंगीचं औषध टाकून पुण्यातील तरुणीवर बलात्कार, गुन्हा दाखल

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर, मार्चपासून आरोपी शिक्षकानं शिकवणी वर्ग पुन्हा ऑफलाइन पद्धतीनं भरवायला सुरुवात केली होती. आरोपी राहुल भारती हा पीडितेचा गृहपाठ तपासताना तिच्याशी नेहमी असभ्य वर्तन करायचा. तसेच तिला मारहाण देखील करायचा. सप्टेंबर महिन्यात पोळा सणानिमित्त शिकवणीला दोन दिवस सुट्टी होती. यावेळी पीडित मुलगी 9 सप्टेंबर रोजी दुपारी चुकून नेहमीप्रमाणे शिकवणीला गेली.

हेही वाचा-आईवर प्रेम आणि मुलीसोबत चाळे; डबल गेम करणाऱ्या BF ला मायलेकीनं दिला भयंकर मृत्यू

यावेळी वर्गात एकही विद्यार्थी नव्हता. याबाबत पीडित मुलीनं राहुल भारती याकडे विचारपूस केली असता, आरोपीनं संधी साधत पीडितेशी बळजबरी करत तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. तसेच घटनेची वाच्यता केल्यास जीवे मारेल, अशी धमकीही दिली. यानंतर राहुल भारती यानं 12 सप्टेंबर आणि 20 नोव्हेंबर रोजीही बळजबरीने तिच्यावर अत्याचार केला. पीडितेची प्रकृती बिघडल्यानं तिच्या कुटुंबीयांनी तिला आर्वी येथील रुग्णालयात नेलं. याठिकाणी तपासणी केली असता ती गर्भवती असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. अखेर या प्रकरणाला वाचा फुटल्यानंतर, पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी नराधम शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास तळेगाव पोलीस करत आहेत.

First published:

Tags: Crime news, Rape on minor, Wardha