मराठी बातम्या /बातम्या /देश /वडिलांना हुंड्यात द्यायचे होते 75 लाख, पण मुलीने असा निर्णय घेतला की...होतेय सर्वत्र कौतुक

वडिलांना हुंड्यात द्यायचे होते 75 लाख, पण मुलीने असा निर्णय घेतला की...होतेय सर्वत्र कौतुक

एका मुलीनं असे काही काम केलं आहे की जिचं सर्वजण कौतुक करत आहेत. कारण ऐकल्यावरही तुम्हीही तिचं कौतुक कराल.

एका मुलीनं असे काही काम केलं आहे की जिचं सर्वजण कौतुक करत आहेत. कारण ऐकल्यावरही तुम्हीही तिचं कौतुक कराल.

एका मुलीनं असे काही काम केलं आहे की जिचं सर्वजण कौतुक करत आहेत. कारण ऐकल्यावरही तुम्हीही तिचं कौतुक कराल.

जयपूर, 26 नोव्हेंबर: राजस्थानमधील (Rajasthan) बाडमेर येथील एका मुलीनं असे काही काम केलं आहे की जिचं सर्वजण कौतुक करत आहेत. कारण ऐकल्यावरही तुम्हीही तिचं कौतुक कराल. हुंड्यात मिळालेल्या पैशातून मुलींसाठी हॉस्टेल बांधण्याचा निर्णय या नववधूनं घेतला आहे. बाडमेरच्या अंजलीला तिचे वडील किशोर सिंह कानोड हे हुंडा (dowry) म्हणून 75 लाख रुपये देत होते.त्यानंतर अंजलीनं ते पैसे नाकारत हॉस्टेल बनवण्याचा निर्णय घेतला.

अंजलीनं वडिलांना सांगितलं की, मला हे पैसे नको आहेत. मुलींना सुविधा मिळण्यासाठी शहरात मुलींचं हॉस्टेल बांधावं अशी माझी इच्छा आहे. यावर वडिलांनी अंजलीच्या इच्छेला मान देत हॉस्टेलसाठी हे पैसे दिले.

दैनिक भास्करमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, बाडमेर शहरातील किशोर सिंह कानोड यांची मुलगी अंजली हिचा विवाह प्रवीण सिंहसोबत 21 नोव्हेंबर रोजी झाला. अंजलीला समजले की तिचे वडील हुंडा म्हणून 75 लाखांची मोठी रक्कम देत आहेत आणि त्यासाठी तिने हे पैसे जोडले आहेत.

हेही वाचा-  15 वर्षीय आईकडून 40 दिवसांच्या मुलाची हत्या, दोरीनं आवळला गळा

अंजलीला समजले की तिचे वडील हुंडा म्हणून 75 लाखांची मोठी रक्कम देत आहेत आणि हुंड्यासाठी तिच्या वडिलांनी हे पैसे जमवले आहेत. त्यावर अंजलीने तिच्या वडिलांना हुंड्यासाठी ठेवलेली रक्कम मुलींच्या हॉस्टेलच्या बांधकामासाठी द्यावी, असं सांगितलं.

अंजलीच्या इच्छेवर घरात चर्चा झाली आणि चर्चेनंतर कुटुंबीय सहमत झाले. त्यानंतर किशोर सिंह कानोड यांनी मुलीच्या इच्छेनुसार मुलींच्या हॉस्टेलसाठी 75 लाख रुपये दिले. हे वसतिगृह NH 68 वर बांधले जाईल.

सासरच्या मंडळींनी ही केलं अंजलीच्या निर्णयाचं स्वागत

अंजलीच्या या निर्णयाचं तिच्या सासरच्या मंडळींनीही स्वागत केलं आहे. लग्नाचे विधी पूर्ण झाल्यानंतर अंजलीनं महंत प्रताप पुरी यांच्याशी संपर्क साधला आणि हुंड्याची जी रक्कम आहे त्याबद्दल आपली इच्छा व्यक्त केली. त्यांनी ही माहिती उपस्थित पाहुण्यांना सांगितल्यावर सर्वांनी टाळ्यांच्या कडकडाटात या घोषणेचं स्वागत केलं. यावर अंजलीच्या सासरच्या मंडळींनीही आनंद व्यक्त केला.

हेही वाचा- मुंबई दाखल होताच परमबीर सिंग यांची कोर्टात धाव, केली 'ही' मागणी

अंजलीच्या या निर्णयाचं सोशल मीडियावर कौतुक होत आहे. बाडमेरचे रावत त्रिभुवन सिंह राठोड यांनी वृत्तपत्रातील बातमी ट्विटरवर शेअर केली आहे. ज्याला अनेकांनी रिट्विट करताना अंजलीचं कौतुक केलं आहे. मुलींच्या शिक्षणाबाबत अंजलीचे हे पाऊल कौतुकास्पद आहे, अशा प्रतिक्रिया अनेकांनी लिहिल्या आहेत.

First published:

Tags: Rajsthan