जाहिरात
मराठी बातम्या / देश / 15 वर्षीय आईकडून 40 दिवसांच्या मुलाची दोरीनं गळा आवळून हत्या, बलात्कारानंतर राहिली होती गरोदर

15 वर्षीय आईकडून 40 दिवसांच्या मुलाची दोरीनं गळा आवळून हत्या, बलात्कारानंतर राहिली होती गरोदर

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

एका आईनं आपल्या 40 दिवसांच्या चिमुरड्याची दोरीनं गळा आवळून हत्या केली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मध्य प्रदेश, 26 नोव्हेंबर: मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh)दमोह येथील तेंदुखेडा येथून एक हृदय हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. येथे एका आईनं आपल्या 40 दिवसांच्या चिमुरड्याची दोरीनं गळा आवळून हत्या केली आहे. बाळाची आई ही अल्पवयीन आहे. आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे मुलाची हत्या केल्यानंतर आईनंच त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं. जेणेकरून कोणाला संशय येऊ नये. पण पोलिसांना मुलाच्या मृत्यूचा संशय आला. त्यानंतर बाळाचं पोस्टमॉर्टम करण्यात आले. मात्र चिमुरड्याचा मृत्यू गळा दाबल्यानं झाल्याचं अहवालात समोर आलं. त्यानंतर पोलिसांनी आईची कसून चौकशी केली असता आईनं मुलाच्या हत्येची कबुली दिली. हेही वाचा-  मुंबई दाखल होताच परमबीर सिंग यांची कोर्टात धाव, केली ‘ही’ मागणी त्यानंतर आरोपी अल्पवयीन आईला बुधवारी बालसुधारगृहात पाठवण्यात आलं आहे. अल्पवयीन मुलीचं वय 15 वर्षे आहे. अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला होता. त्यानंतर तिनं एका मुलाला जन्म दिला होता. बलात्कारातला आरोपीही अल्पवयीन मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलीवर 17 वर्षीय तरुणाने बलात्कार केला होता. दोघंही एकाच गावचे रहिवासी आहेत. काही वर्षांपूर्वी दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले होते. यानंतर दोघांमधील संवाद वाढू लागला. काही दिवसात त्याची भेट होऊ लागली. यादरम्यान तरुणानं मुलीवर बलात्कार केला होती. मुलगी गरोदर राहिल्यानंतर ही बाब उघडकीस आली. नातेवाईकांनी आरोपीविरुद्ध पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. जानेवारीमध्ये मुलीवर झाला होता बलात्कार तेंदुखेडा एसडीओपी अशोक चौरसिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी 2021 रोजी एका 15 वर्षांच्या मुलीवर एका किशोरवयीन मुलानं बलात्कार केला होता. ऑगस्टमध्ये मुलगी गरोदर असल्याचं तिच्या कुटुंबीयांना समजलं. यानंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. आरोपीला अटक करून बालसुधारगृहात पाठवण्यात आलं. त्यानंतर 16 ऑक्टोबर रोजी जिल्हा रुग्णालयात अल्पवयीन मुलीनं एका मुलाला जन्म दिला. हेही वाचा-  ‘पोपट शोधा आणि मिळवा 15 हजार’,  इंजिनिअरची जाहिरात; घरोघरी वाटली पत्रकं मुलीचं वय कमी असल्यानं मुलाला जन्म दिल्यानंतर तिची प्रकृती ठीक नव्हती. त्यामुळे बाळ आणि आई 22 दिवस रुग्णालयात होते. बरी झाल्यानंतर ती तिच्या गावी गेली. अल्पवयीन आईला महिला सुधारगृहात पाठवलं 10 नोव्हेंबरच्या रात्री अल्पवयीन आई आपल्या बाळाला घेऊन तेंदुखेडा रुग्णालयात पोहोचली. मुलाची तपासणी केली असता बालकाचा मृत्यू झाल्याचं निष्पन्न झाले. पोलिसांना संशय आल्यानं पोलिसांनी बाळाचे पोस्टमॉर्टम केलं. त्यानंतर बाळाचा मृत्यू दोरीनं गळा दाबल्याने झाल्याचे समोर आलं. हेही वाचा-  अनोखं लग्न! 6 सख्खा बहिणींनी एकाच मंडपात घेतले सात फेरे; 3 गावातून आल्या वराती पोलिसांनी अल्पवयीन मुलीची चौकशी केली असता आईनं आपल्याच मुलाची हत्या केल्याची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी तिच्याविरुद्ध कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करून त्याला बाल न्यायालयात हजर केलं, तेथून तिची रवानगी महिला सुधारगृहात करण्यात आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात