Home /News /mumbai /

मतदारसंघ सॅनिटाईज करण्यासाठी शिवसेनेच्या आमदारांनी आणलं पिक्चरच्या शुटींगचं फायर मशिन आणि चढले गाडीवर

मतदारसंघ सॅनिटाईज करण्यासाठी शिवसेनेच्या आमदारांनी आणलं पिक्चरच्या शुटींगचं फायर मशिन आणि चढले गाडीवर

चित्रपटाच्या सेटवर आगीचे दृश्य दाखवल्यानंतर ती आग विझवण्यासाठी जे इंजिन वापरलं जातं तेच इंजिन आमदारांनी आणलं.

मुंबई 03 एप्रिल :कोरोना विषाणूमुळे मुंबई महाराष्ट्रात नव्हे तर भारतच ठप्प झाला आहे अत्यावश्यक सेवा सोडली तर सगळं काही बंद झालेल् पाहायला मिळते आहे याचा फटका चित्रपट सृष्टीला सुद्धा बसला आहे चित्रपटाचे विविध ठिकाणी काम सुरू असतात आणि त्यासाठी लागणारे साहित्य पुरवणारे असतात पण सगळं काम ठप्प झाल्यामुळे सध्या तेथे काम ही मिळत नाही. परंतु चित्रपटाच्या शुटींसाठी वापरली जाणारी काही उपकरणे मात्र आता अत्यावश्यक सेवेसाठी सध्या कामाला येत आहेत. चित्रपटाच्या सेटवर आगीचे दृश्य दाखवल्यानंतर ती आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाचे इंजिन  त्याठिकाणी असते त्याच अग्निशामक दलाच्या इंजिनचा उपयोग सध्या मुंबईतील काही रस्त्यावर पाहायला मिळत आहे. चांदिवली विधानसभा मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार दिलीप लांडे यांनी याचं शुटींगमध्ये वापरल्या जाणाऱ्या फायर ब्रिगेडच्या इंजिनचा वापर करून आपल्या विधानसभा मतदारसंघात निर्जंतुकीकरण केलं. मुंबईतल्या उंच इमारतीमध्ये इमारतींवर अशा प्रकारचं फायर इंजिन आणून आमदारांनी स्वतः निर्जंतुकीकरणाच्या कामात सहभाग घेतला. यामध्ये पवई सारखी उच्चभ्रू वस्ती, रहेजा, त्याचबरोबर नहार भवन या ठिकाणी जवळपास सात ते आठ मजल्यावरील इमारतीवर निर्जंतुकीकरण केलं. मुंबई विमानतळावर कर्तव्य बजावणाऱ्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) आणखी 6 जणांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. यापूर्वी 5 जणांना कोरोना विषाणूची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले होते. एकूण 11 जवानांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. मुंबईतली ही 9 ठिकाणं आहेत ‘कोरोना’चे ‘हॉटस्पॉट’, आता ड्रोन नजर ठेवणार काही दिवसांपूर्वी मुंबई एअरपोर्टवर कार्यरत असलेल्या सीआयएसएफच्या एका जवानाचा कोरोनाची लागण झाली होती. त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. नंतर तो नवी मुंबईतील कळंबोली येथील कॉलनीत गेला. नंतर इतर 10 जवानांना कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान, पूर्ण पनवेलमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 15 झाली आहे. हेही वाचा..लाईट बंद करून दिवे लावा... नरेंद्र मोदींच्या आवाहनवर माजी मुख्यमंत्र्यांची टीका सीआयएसएफच्या 151 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना विलगीकरण कक्षात ठेवून त्यांची कोरोनाची चाचणी करण्यात आली होती. या चाचणीत सहा जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. आतापर्यंत सीआयएसएफच्या 11 जवानांना कोरोनाची लागण झाली आहे. या सर्वांना पनवेल येथील एमजीएम रुग्णालयातील स्वतंत्र विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहेस अशी माहिती पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी दिली आहे.
Published by:Priyanka Gawde
First published:

Tags: Shivsena

पुढील बातम्या