Home /News /maharashtra /

लाईट बंद करून दिवे लावा... नरेंद्र मोदींच्या आवाहनवर माजी मुख्यमंत्र्यांची जोरदार टीका

लाईट बंद करून दिवे लावा... नरेंद्र मोदींच्या आवाहनवर माजी मुख्यमंत्र्यांची जोरदार टीका

'रविवारी रात्री 9 वाजता दिवे लावा, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन हास्यास्पद आहे'

    सातारा, 3 एप्रिल: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घरातील लाईट बंद करून दिवा, मेणबत्ती लावाव्यात, अशा प्रकारचे आवाहन देशातील जनतेला केले आहे. त्यावर राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जोरदार टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'ताली, थाली आणि दिवाली' या कार्यक्रमामध्ये लोकांना न अडकवता लोकांना शास्त्रीय माहिती द्यावी, तसेच पत्रकार परिषद घेऊन लोकांचे प्रश्न समजून घ्यावे. ताली आणि थाळी कार्यक्रमात लोकांनी जलूस काढून दुरूपयोग केला होता, अशा प्रकारचा टोलाही यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी लगावला आहे. त्याचबरोबर टीव्हीवर चालू झालेल्या रामायण मालिकेसोबत 'भारत एक खोज आणि संविधान' असा मालिका लोकांना दाखवाव्या, असं मत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलं आहे. हेही वाचा..पुण्यात 'सिम्बॉयसिस'च्या मास कम्युनिकेशनच्या विद्यार्थिनीची वसतीगृहातच आत्महत्या पंतप्रधानांच आवाहन हास्यास्पद.... रविवारी रात्री 9 वाजता दिवे लावा, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन हास्यास्पद आहे, असे दिवे लावल्यानं कोरोनावर आपण विजय मिळविणार आहोत का, अशी टीका राज्याचे बहुजन विकास मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. आज देशात लॉकडाऊनमुळे स्थलांतर होत आहे. लोकांना धान्य मिळत नाही. अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा लोकांना मदतीसंदर्भात पंतप्रधान काहीतरी घोषणा करतील अशी अपेक्षा होती. मात्र, तसं न करता पंतप्रधान असा प्रकार करून अंधश्रद्धा पसरवीत आहे, असा आरोपही विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. हेही वाचा..हातावर होमक्वॉरंटाईनचा शिक्का मारलेले तबलिगी जमातचे 10 जण पुणे जिल्ह्यातून फरार दुसरीकडे,नरेंद्र मोदींच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीत दोन वेगवेगळ्या भूमिका उमटल्या आहेत. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे तर आमदार रोहित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. काय म्हणाले जितेंद्र आव्हाड? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना केलेल्या आवाहनानंतर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली. 'भारताने कोरोनाविरुद्धची लस शोधली,एकालाही मास्क कमी पडू देणार नाही. डॉक्टरांच्या मागे आम्ही उभे आहोत. कुठलाही गरीब उपाशी झोपणार नाही. असे भाषण मोदींकडून अपेक्षित होते. तर त्यांनी या संकटाचाही इव्हेंट करायचं ठरवलं. म्हणे... अंधार करा आणि बॅटरी पेटवा. देशाला इतकेही मुर्खात काढू नका,' अशा शब्दांत जितेंद्र आव्हाड यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. हेही वाचा...'...आता आग लावली नाही म्हणजे झालं', PM मोदींच्या आवाहनानंतर शिवसेनेचा घणाघात एकीकडे जितेंद्र आव्हाड यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला असताना राष्ट्रवादीचे युवा नेते आणि आमदार रोहित पवार यांनी मात्र मोदींच्या भूमिकेचं स्वागत केलं आहे. दिव्याच्या माध्यमातून देशाला कोरोनाविरोधात एकत्र आणण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा हेतू असावा. तसं असेल तर त्याचं स्वागतच करायला हवं,' असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. त्यामुळे या मुद्द्यावरून राष्ट्रवादीच्या दोन मोठ्या नेत्यांनी वेगवेगळी भूमिका घेतल्याचं दिसत आहे.
    Published by:Sandip Parolekar
    First published:

    Tags: Corona, PM narendra modi

    पुढील बातम्या