मुंबई, 12 जानेवारी : मुंबईत दोन दिवसांपासून नव्या कोरोनाबाधितांचा (Mumbai Corona Cases) आकडा कमी झाला होता. त्यामुळे मुंबईकरांनी सुटकेचा श्वास सोडला होता. कोरोनाची तिसरी लहर (Corona Third Wave) थोपविण्यास आपण यशस्वी झालो, असं काहींना वाटत होतो. पण धोका अद्यापही टळलेला नाही. कारण मुंबईतील आजची दिवसभराची नवी आकडेवारी हे तेच सांगताना दिसत आहे. मुंबईत आज दिवसभरात तब्बल 16 हजार 420 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. मुंबईतील नव्या कोरोनाबाधितांचा आजचा आकडा हा गेल्या दिवसांच्या आकडेवारीच्या तुलनेने खूप वाढलेला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणं जास्त आवश्यक आहे. मुंबईतील गेल्या दोन दिवसांची नव्या कोरोनाबाधितांची आकडेवारी 9 जानेवारी - 19 हजार 474 10 जानेवारी - 13 हजार 648 11 जानेवारी - 11 हजार 647 हेही वाचा : बेदम मारहाण करत केलं आगीच्या हवाली, मुलांच्या डोळ्यादेखत बायकोची भयावह हत्या मुंबईत दिवसभरात 14 हजार 649 रुग्णांनी कोरोनावर मात दुसरीकडे, मुंबईत कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या देखील समाधानकार आहे. मुंबईत आज दिवसभरात 14 हजार 649 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. मुंबईत आतापर्यंत 8 लाख 34 हजार 962 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 87 टक्के हा रिकव्हरी रेट आहे. मुंबईतील कोरोना रुग्णवाढीचा डब्लिंग रेट हा सध्या 36 दिवसांचा आहे. तसेच ग्रोथ रेट हा 1.85 टक्के आहे. मुंबईतील सध्या सक्रिय रुग्णांची संख्या ही 1 लाख 2 हजार 282 इतकी आहे. महाराष्ट्र आणि मुंबईत सोमवारी कोरोना बाधितांच्या आकडेवारीत घसरण झाली आहे. मुंबईत कमी रुग्ण आढळून येण्याला तज्ज्ञ ‘संडे इफेक्ट’ म्हणत आहेत तर त्याचवेळी काही तज्ज्ञ याला चांगले संकेत मानत आहेत. सोमवारी कोरोना बाधितांच्या संख्येत 30 टक्क्यांनी घसरण झाली आहे. शहरात रविवारी एकूम 19 हजार 474 बाधितांची नोंद झाली होती आणि पॉझिटिव्हिटी दर हा 23 टक्क्यांवर होता. हेही वाचा : आमदार-खासदारपासून ते मोठमोठे अधिकारी पॉझिटिव्ह, वर्धा जिल्हा कोरोनामय आकडेवारीवर नजर टाकली तर, 7 जानेवारीपासून मुंबईत कोरोना बाधितांच्या आकडेवारीत घसरण होत आहे. शुक्रवाीर मुंबईत 20 हजार 971 बाधितांची नोंद झाली होती. शनिवारी 20 हजार 318 तर रविवारी 19 हजार 474 बाधितांची नोंद झाली होती. त्यानंतर सोमवारी मुंबईत 13 हजार 648 बाधितांची नोंद झाली आहे. मंगळवारी (11 जानेवारी) मुंबईत 11 हजार 647 रुग्ण आढळले आहे. गेल्या पाच दिवसातलीही सर्वात कमी संख्या आहे. मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. रुग्णांची संख्याही 25 हजारांच्या पुढे गेली होती. पण, दोन दिवसांपासून रुग्णांची संख्या ही कमी कमी होत चालली आहे. मंगळवारी मुंबईत 11,647 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. 9667 रग्णांना लक्षण आढळून आलेली नाहीत. तर रूग्णालयातील 14980 रूग्ण बरे होऊन घरी परतले आहे. तर गेल्या 24 तासांमध्ये कोरोनामुळे 2 जणांचा मृत्यू झाला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.