जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Wardha Corona : आमदार-खासदारपासून ते मोठमोठे अधिकारी पॉझिटिव्ह, वर्धा जिल्हा कोरोनामय

Wardha Corona : आमदार-खासदारपासून ते मोठमोठे अधिकारी पॉझिटिव्ह, वर्धा जिल्हा कोरोनामय

आरोग्य विभागाकडून जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार, वर्धा जिल्ह्यात आज दिवसभरात तब्बल 117 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

वर्धा, 12 डिसेंबर : वर्ध्यात कोरोनाचा (Wardha Corona) हाहा:कार सुरु असल्याची परिस्थिती आहे. विशेष म्हणजे कोरोना संसर्गापासून आता लोकप्रतिनिधी आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकारीदेखील सुटताना दिसत नाहीय. वर्धा जिल्ह्यातील खासदार (MP) आणि आमदारासह (MLA) क्लास वन अधिकारी (class one officer) कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive) आढळले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचं काय? असा प्रश्न उपस्थित होतोय. वर्ध्यात कोरोना संसर्गाचा दररोज आकडा वाढल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. सध्याची कोरोना परिस्थिती (Corona Situation) लवकरात लवकर नियंत्रणात यावी, यासाठी प्रशासन आणि राज्य सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. पण वर्ध्यात कोरोनाबाधितांचा आकडा दररोज वाढताना दिसतोय. प्रशासनातील अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्यात कोरोनाचा विळखा वर्धा जिल्ह्यात भाजप खासदार रामदास तडससह हिंगणघाटचे भाजप आमदार समीर कुणावार यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तसेच जिल्हा शल्यचिकित्सक, निवासी उपजिल्हाधिकारी आणि जिल्हा नियोजन अधिकारी यांनादेखील कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे कोरोना संकटाला परतवण्यासाठी प्रयत्यांची पराकष्ठा करणाऱ्या प्रशासनातील अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्यात कोरोनाचा विळखा वाढताना दिसतोय. हा विळखा जर प्रशासनातील इतर कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोतला तर कोरोना संसर्गाचा धोका आणखी वाढण्याची शक्यत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांनी नियमांचं पालन करणं आणि काळजी घेणं जास्त जरुरीचं आहे. हेही वाचा :  राज्यातील प्रत्येक दुकानाची पाटी आता मराठीतच, राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय दिवसभरातील नव्या रुग्णांची आकडेवारी शंभरी पार आरोग्य विभागाकडून जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार, वर्धा जिल्ह्यात आज दिवसभरात तब्बल 117 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. विशेष म्हणजे जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांपासून कोरोनाबाधितांची आकडेवारी झपाट्याने वाढताना दिसत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सक्रीय कोरोनाबाधितांची आकडेवारी 398 वर पोहोचली आहे. नव्या कोरोनाबाधितांच्या भरमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 49 हजार 783 वर पोहोचला आहे. वर्धा जिल्ह्यातील गेल्या काही महिन्यांमधील आकडेवारी 6 जानेवारी 21 बाधित 7 जानेवारी 42 बाधित 8 जानेवारी 66 बाधित 9 जानेवारी 64 बाधित 10 जानेवारी 22 बाधित 11 जानेवारी 93 बाधित 12 जानेवारी 117 बाधित

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात