मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /मुंबई दर्शन करण्यासाठी आलेल्या इटालियन महिलेवर अज्ञाताकडून बलात्कार, गुन्हा दाखल

मुंबई दर्शन करण्यासाठी आलेल्या इटालियन महिलेवर अज्ञाताकडून बलात्कार, गुन्हा दाखल

परदेशातून मुंबई फिरायला आलेल्या एका 37 वर्षीय महिलेवर स्वतःला गाइड म्हणून घेणाऱ्या एका व्यक्तीने बलात्कार केल्याचं समोर आलं आहे.

परदेशातून मुंबई फिरायला आलेल्या एका 37 वर्षीय महिलेवर स्वतःला गाइड म्हणून घेणाऱ्या एका व्यक्तीने बलात्कार केल्याचं समोर आलं आहे.

परदेशातून मुंबई फिरायला आलेल्या एका 37 वर्षीय महिलेवर स्वतःला गाइड म्हणून घेणाऱ्या एका व्यक्तीने बलात्कार केल्याचं समोर आलं आहे.

    अक्षय कुडकेलवार, प्रतिनीधी

    मुंबई, 01 जुलै : मुंबईत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. परदेशातून मुंबई फिरायला आलेल्या एका 37 वर्षीय महिलेवर स्वतःला गाइड म्हणून घेणाऱ्या एका व्यक्तीने बलात्कार केल्याचं समोर आलं आहे. ही महिला मुळ इटलीची असून 11जून रोजी ही बंगळुरूहुन मुंबई दर्शन करण्यासाठी आली होती.

    त्यानंतर 14 जून रोजी गेट वे इंडिया बघून आल्यानंतर मुंबई दर्शन करण्यासाठी टॅक्सी किंवा बसच्या शोधात असताना स्वतः ला गाइड म्हणवून घेणाऱ्या व्यक्तीच्या ती संपर्कात आली आणि संपूर्ण मुंबई दर्शन करण्याची जबाबदारी त्या व्यक्तीने घेतली.

    प्रवाशांनी गच्च भरलेली बस खोल दरीत कोसळली, 47 जणांचा मृत्यू

    मात्र, त्याच दिवशी रात्री साडे 8च्या सुमारास त्या व्यक्तीने टॅक्सी बुक करून ती टॅक्सी जुहूजवळ एक वाइन शॉप जवळ थांबवलीआणि त्या महिलेस जबरजस्ती करून तिच्या वर अतिप्रसंग केल्याचं महिलेने तिच्या तक्रारीत सांगितलं आहे.

    त्यानंतर त्या महिलेने या व्यक्तीपासून आपली सुटका करून दक्षिण मुंबईत आपलं हॉटेल गाठली आणि दुसऱ्या दिवशी मुंबईहून बंगळुरूला आपण राहत असलेल्या आश्रमात गेली. त्यानंतर सुद्धा त्या व्यक्तीने तिला इंस्टाग्राम वर मेसेजेस करून पत्ता विचारूनत्रास द्यायला सुरु केल्यानंतर तिने दिल्लीला जाऊन इटालियन दुतावासाची संपर्क साधून त्यांच्या मार्गदर्शनाखाली तिने मुंबई पोलिसात तक्रार दाखल केली.

    शुक्रवारी रात्री मुंबईच्या जुहू पोलीस ठाण्यात आयपीसी 376(2)  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई पोलीस सध्या या व्यक्तीचा शोध घेत आहेत.

    हेही वाचा...

    ट्विटर युजर सुषमा स्वराज यांच्या पतीला म्हणाला, 'जेव्हा त्या घरी येतील तेव्हा त्यांना मारा'

    रात्री दुकान बंद करून झोपले, सकाळी 11 मृतदेह लटकलेल्या अवस्थेत शेजाऱ्यांनी पाहिले

    गडचिरोलीत कार आणि प्रवासी वाहनाच्या धडकीत 7 जण ठार, 5 जखमी

    First published:
    top videos

      Tags: Grad, India, Italian lady, Maharashtra, Mumbai, Rape case, Raped