मुंबई, 20 मे : पुणे आणि मुंबईमध्ये कोरोनाच्या (Mumbai pune corona trend) दुसऱ्या लाटेत सर्वाधिक झपाट्यानं कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचं पाहायला मिळालं होतं. मात्र आता दोन्ही ठिकाणी कोरोनाच्या रुग्णसंख्ये दिलासादायक घट दिसत (Decrease in corona figures) असल्याचं पाहायला मिळत आहे. गुरुवारचा विचार करता मुंबई मनपा (Mumbai Corona Update) हद्दीत गुरुवारी कोरोना रुग्णांचा आकडा 1500 च्या आत तर पुणे मनपा हद्दीत (Pune Corona Update) 1000 च्या आत आल्याचं पाहायला मिळालं.
(वाचा-आज राज्यात 47,371 रुग्णांची कोरोनावर मात, रिकव्हरी रेटही 91.43 टक्क्यांवर)
मुंबई महानगर पालिका हद्दीमध्ये गुरुवारी केवळ 1433 नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद झाली आहे. तर दिवसभरात कोरोनावर मात करून घरी परतलेल्या रुग्णांची संख्या 1460 एवढी आहे. कोरोनामुळं होणाऱ्या मृत्यूचा आकडा हीदेखिल चिंतेची बाब होती. मात्र तोही आता कमी होताना दिसत आहे. गुरुवारी 59 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यातही 40 वर्षाखालील रुग्णांच्या मृत्यूच्या प्रमाणातही मोठ्या प्रमाणावर घट झाल्याचं दिसून आलं आहे. कोरोना रुग्णांचा मुंबमधला रिकव्हरी रेट हा 93 टक्क्यांवर पोहोचल्याचं समोर आलं आहे. त्यामुळं मुंबईतील आकडे हे समाधानकारकरित्या घटत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
(ज्या Remdesivir साठी होती धडपड; त्याबाबत आरोग्यमंत्र्यांनी दिली मोठी माहिती)
पुण्याचा विचार करता याठिकाणीदेखिल कोरोनाग्रस्तांच्या रुग्णांच्या वाढीचा आकडा घटून 1000 च्या खाली आला आहे. गुरुवारी 931 नव्याने लागण झालेले रुग्ण आढळून आले. तर दिवसभरात 1076 रुग्णांनी कोरोनावर मात केली. पुण्यात दिवसभरात 66 रुग्णांचा कोरोनामुळं मृत्यू झाला. मात्र त्यापैकी 24 रुग्ण पुण्याबाहेरील असून ते उपचारासाठी पुण्यात आलेले असल्याचं सांगण्यात आलं आहे. विशेष म्हणजे पुण्यात गुरुवारी 12226 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यापैकी फक्त 931 जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळं पॉझिटिव्हिटी रेटही घटला आहे.
एकूणच दुसऱ्या लाटेत कोरोनाचे हॉटस्पॉट बनलेल्या यादोन्ही शहरांनी राज्याच्या चिंता मोठ्या प्रमाणावर वाढवल्या होत्या. पण राज्य सरकार आणि स्थानिक महानगर पालिका प्रशासनाच्या नियोजन आणि काटेरोकर निर्बंधांमुळं ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यात यश आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Coronavirus cases, Mumbai News, Pune news