Home /News /maharashtra /

कोरोनाचा विळखा आणखी सैल; राज्यातील सक्रिय रुग्णांच्या संख्येत मोठी घसरण, रिकव्हरी रेटही नव्वदी पार

कोरोनाचा विळखा आणखी सैल; राज्यातील सक्रिय रुग्णांच्या संख्येत मोठी घसरण, रिकव्हरी रेटही नव्वदी पार

Coronavirus in Maharashtra: राज्यात कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने घसरण होत असल्याचं दिसत आहे.

    मुंबई, 20 मे: महाराष्ट्रासाठी दिलासा देणारी (relief for Maharashtra) बातमी आहे. कारण, कोरोना (Corona) रुग्णांच्या संख्येत सातत्याने घसरण (Covid cases decreased) होत आहे. यामुळे राज्यातील रिकव्हरी रेटही दिवसेंदिवस वाढत (recovery rate increased) आहे. राज्याचा रिकव्हरी रेट नव्वदी पार गेला असून आता राज्याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे होत असल्याचं दिसत आहे. आज राज्यात 47,371 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण 50,26,308 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील रिकव्हरी रेट हा 91.43 टक्क्यांवर पोहोचला आहे. सक्रिय रुग्णांमध्ये मोठी घसरण राज्यात 19 मे 2021 रोजी एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ही 4 लाखांहून अधिक होती तर आज सक्रिय रुग्णांची संख्या ही 3,83,253 इतकी झाली आहे. यामुळे सक्रिय रुग्णांच्या संख्येत झपाट्याने घसरण होत असल्याचं चित्र पहायला मिळत आहे. सातत्याने रुग्णांच्या संख्येत होणारी घट ही राज्यासाठी निश्चितच दिलासादायक बातमी आहे. आज राज्यात 29,911 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,21,54,275 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 54,97,448 म्हणजेच 17.09 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 29,35,409 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तर 21,648 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. वाचा: ज्या Remdesivir साठी सुरू होती धडपड; त्याबाबत आरोग्यमंत्र्यांनी दिली मोठी माहिती राज्यात आज 738 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यापैकी 429 मृत्यू हे मागील 48 तासांतील तर 309 मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. राज्यातील मृत्यू दर 1.55 टक्के इतका झाला आहे. राज्यात इतर कारणाने मृत्यू झालेल्या रुग्णांच्या संख्येत 33 टक्क्यांनी घट झाली आहे. आज कुठल्या विभागात किती रुग्णांचे निदान? ठाणे - 3767 नाशिक - 4884 पुणे - 7130 कोल्हापूर - 3262 औरंगाबाद - 1640 लातूर - 2245 अकोला - 4364 नागपूर - 2619 एकूण - 29911
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Coronavirus, Maharashtra, Mumbai

    पुढील बातम्या