मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /ज्या Remdesivir साठी सुरू होती धडपड; त्याबाबत आरोग्यमंत्र्यांनी दिली मोठी माहिती

ज्या Remdesivir साठी सुरू होती धडपड; त्याबाबत आरोग्यमंत्र्यांनी दिली मोठी माहिती

कोरोना रुग्णांसाठी रेमडेसिवीर (Remedesivir) औषधाची मागणी वाढली आणि त्याचा तुटवडाही निर्माण झाला होता.

कोरोना रुग्णांसाठी रेमडेसिवीर (Remedesivir) औषधाची मागणी वाढली आणि त्याचा तुटवडाही निर्माण झाला होता.

कोरोना रुग्णांसाठी रेमडेसिवीर (Remedesivir) औषधाची मागणी वाढली आणि त्याचा तुटवडाही निर्माण झाला होता.

मुंबई, 20 मे : कोरोना रुग्णांवर उपचारासाठी (Corona treatment) सर्वाधिक चर्चेत आलेलं औषध म्हणजे रेमडेसिवीर (Remdesivir). कोरोना रुग्णांसाठी उपयोगाचं ठरणारं हे औषध, त्याची वाढती मागणी आणि तुटवडा, त्यानंतर या औषधाचा काळाबाजार अशा अनेक बातम्या कित्येक दिवस कानांवर पडत आहेत. पण आता याच औषधाबाबत सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे.

कोरोना रुग्णांसाठी ज्या रेमडेसिवीर औषधाचा वापर केला गेला ते औषध कोरोना रुग्णांच्या उपचारातून वगळण्याचा निर्णय लवकरच होणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्णयानंतर आता केंद्र आणि राज्य सरकारही याबाबत निर्णय घेणार आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh tope) यांनी दिली.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं, WHO ने कोरोना उपचारासाठी रेमडेसिवीर वगळण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान देशातील टास्क फोर्स आणि राज्यातील टास्क फोर्सशी याबाबत चर्चा केल्यानंतर राज्यातही कोरोना रुग्णांवर या औषधाचा वापर बंद करण्याबाबत निर्णय घेतला जाईल.

रेमडेसिवीर वगळण्यात आल्यास कोरोना उपचार पद्धती बदलण्याची शक्यता आहे. कोरोना रुग्णांवरील उपचाराच्या प्रोटोकॉलमध्ये या औषधाचा समावेश आहे.

हे वाचा - लस-विक्रीच्या नफ्यातून तब्बल 9 नवे अब्जाधीश, गरीब देशांच्या लसीकरणाऐवढी संपत्ती

रेमडेसिवीर या अँटिव्हायरल औषधाचा (Antiviral Drug) उपयोग पहिल्यांदा 'हिपॅटायटिस सी'वर उपचारांसाठी करण्यात आला होता. पण 2014 साली आफ्रिकी देशांमध्ये एबोला विषाणूने थैमान घातलं, तेव्हा उपचारांसाठी त्याचा प्रभावी उपयोग झाल्यावर हे औषध चर्चेत आलं. मर्स, सार्स यांसारख्या एन्फ्लुएंझा संसर्गांमध्येही त्याचा चांगला उपयोग झाला. कोरोना विषाणूची शरीरात वाढ होण्याला रेमडेसिवीर पायबंद घालतं, असं तज्ज्ञ म्हणतात.

कोणताही विषाणू जेव्हा मानवी शरीरात प्रवेश करतो, तेव्हा तो स्वतःला कणखर बनवण्यासाठी आपल्या प्रती तयार करतो. ही सगळी क्रिया मानवी शरीराच्या पेशींमध्ये घडत असतं. या प्रक्रियेसाठी विषाणूला एका एंझाइमची (Enzyme) गरज असते. रेमडेसिवीर हे औषध या एंझाइमवर हल्ला करतं आणि विषाणूच्या मार्गात अडथळा निर्माण करतं.

हे वाचा - फक्त 250 रुपयांत घरीच करा कोरोना टेस्ट; Home testing आधी वाचा ICMR ची Advisory

कोरोना रुग्णांच्या उपचारातही या औषधाचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात आला. त्याची वाढती मागणी, तुटवडा आणि काळाबाजार लक्षात घेत सरकारने या औषधाचं उत्पादनही वाढवलं होतं आणि त्याच्या किमतीवर नियंत्रण आणलं होतं.

First published:

Tags: Corona, Coronavirus, Rajesh tope