मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /यापुढे 'मी पोलीस आहे' सांगून चालणार नाही, मुंबई पोलीस आयुक्तांचा मोठा निर्णय

यापुढे 'मी पोलीस आहे' सांगून चालणार नाही, मुंबई पोलीस आयुक्तांचा मोठा निर्णय

तोतया पोलिसांच्या घटनांमध्ये वाढ होत असून मुंबई पोलिसांची यामुळे नाहक बदनामी होत आहे. हे लक्षात घेऊन...

तोतया पोलिसांच्या घटनांमध्ये वाढ होत असून मुंबई पोलिसांची यामुळे नाहक बदनामी होत आहे. हे लक्षात घेऊन...

तोतया पोलिसांच्या घटनांमध्ये वाढ होत असून मुंबई पोलिसांची यामुळे नाहक बदनामी होत आहे. हे लक्षात घेऊन...

मुंबई, 14 ऑगस्ट : 'मी पोलीस आहे' (police)  अशी बतावणी करून रोज अनेकांची मुंबईत फसवणूक केली जाते. एवढंच नाही तर बर्‍याचदा अशा घटना समोर आलेले आहेत की, समोरची व्यक्ती खरोखरची पोलीस असते मात्र ती त्या वेळेस ड्युटीवर नसते पण तरी देखील ती व्यक्ती पोलीस असल्याचे सांगून संबंधित व्यक्तीवर कारवाई करते किंवा कारवाई करू अशी भीती दाखवतेपण, आता असं म्हणून चालणार नाही, कारण तोतया पोलिसांना (fake police) आळा घालण्यासाठी मुंबई पोलिसांनी (mumbai police) मोठा निर्णय घेतला आहे.

तोतया पोलिसांच्या घटनांमध्ये वाढ होत असून मुंबई पोलिसांची यामुळे नाहक बदनामी होत आहे. हे लक्षात घेऊन मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे (Mumbai Police Commissioner Hemant Nagarale) यांनी मुंबई पोलिसांच्या क्राईम कॉन्फरन्समध्ये याविषयी सर्व पोलिसांचे लक्ष वेधले आणि अशा प्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी सुरुवातीला पोलिसांना याबाबतीत कठोर पालन करण्याचे आदेश हेमंत नगराळे यांनी जारी केले आहेत.

सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर, महागाई भत्त्यात 3 महिन्यांसाठी वाढ

खरंतर हे अशा प्रकारचे आदेश हे पोलीस घटनात्मक आदेश आहेत. पण बहुतांश ठिकाणी पोलीस ड्युटीवर असताना वर्दी वापरत नाहीत. पण याचा नाद फटका बसतो. तो सामान्य नागरिकांना कारण का पोलीस असल्याची बतावणी करून अनेक वेळा नागरिकांची फसवणूक केली जाते. त्यामुळे हे घटनात्मक आदेशाची आहेत, या आदेशांचे कठोर पालन केले जावे अन्यथा अशा पोलिसांवर कारवाई केली जाईल अशी कठोर भूमिका मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी घेतलेली आहे. यानुसार मुंबई पोलीस दलातील जवानांना ते ड्युटीवर असताना वर्दी घालणं बंधनकारक आहे तर गुन्हे प्रकटीकरण विभागात असलेल्या पोलिसांना मात्र हे आदेश लागू होणार नाहीत, असे देखील स्पष्ट करण्यात आले.

IND vs ENG : ...म्हणून भारत-इंग्लंडचे खेळाडू लाल टोपी घालून मैदानात उतरले

त्यामुळे नागरिकांना एक प्रकारे हा दिलासाच म्हणावा लागेल. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे कोणीही आपण पोलीस असल्याची बतावणी केली तर सामान्य व्यक्तीने तात्काळ सावध होऊन ती व्यक्ती पोलीस असल्याचे पुरावे मागावेत आणि जर ती व्यक्ती पोलीस असून देखील शिवाय गुन्हे प्रकटीकरण विभागातील नसुन देखील जर तुमच्यावर कोणती कारवाई करण्याचा दबाव टाकत असेल किंवा भीती दाखवत असेल तर अशा पोलिसांना तुमच्यावर कोणत्याही प्रकारे कारवाई करण्याचा अधिकार नाहीये असेही या आदेशावरून स्पष्ट होत आहे. याचा अर्थ नागरिकांनी सावध राहणे अत्यंत महत्वाचा आहे.

First published:

Tags: Mumbai police