लंडन, 13 ऑगस्ट : भारत आणि इंग्लंड (India vs England 2nd Test) यांच्यातली दुसरी टेस्ट लॉर्ड्सवर होत आहे. या टेस्टच्या दुसऱ्या दिवशी भारत आणि इंग्लंडचे खेळाडू लाल रंगाची टोपी घालून मैदानात दिसले. लॉर्ड्सचं ऐतिहासिक मैदान लाल रंगाने रंगलं होतं. पहिल्या इनिंगमध्ये टीम इंडियाने 364 रन केल्यानंतर दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडचा स्कोअर 119/3 एवढा झाला होता, त्यामुळे इंग्लंडची टीम अजूनही 245 रनने पिछाडीवर आहे. इंग्लंडचा माजी कर्णधार एन्ड्रयू स्ट्राऊस (Andrew Strauss) याची पत्नी रूथ स्ट्राऊस (Ruth Strauss) यांचं कॅन्सरमुळे निधन झालं होतं. यानंतर एन्ड्रयू स्ट्राऊसने रूथ स्ट्राऊस फाऊंडेशनची स्थापना केली. या संस्थेच्या मदतीसाठी खेळाडूंनी लाल रंगाची टोपी घातली होती. हे फाऊंडेशन लंग कॅन्सरबद्दल (Lung Cancer) जागृती करण्यासाठी सुरू करण्यात आलं आहे. इंग्लंडचा माजी कर्णधार एन्ड्रयू स्ट्राऊस हे फाऊंडेशन चालवतो. 2018 साली स्ट्राऊसच्या पत्नीचं निधन झालं होतं. ही संस्था गरजूंना मदत करण्यासाठी निधी गोळा करते.
💬 A message from Sir Andrew Strauss ahead of tomorrow.
— Lord's Cricket Ground (@HomeOfCricket) August 12, 2021
❤️ Don't forget to wear #RedForRuth on Day Two and help support a fantastic cause.#LoveLords | @RuthStraussFdn
इंग्लंडमध्ये लंग कॅन्सरचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आहेत. तिकडे प्रत्येक वर्षी 18 वर्षांच्या 41 हजार मुलांचे आई किंवा वडील यामुळे प्रभावित होतात. ही संस्था ती मुलं आणि त्यांच्या कुटुंबाना मदत करेल, असं स्ट्राऊसने सांगितलं. अशाप्रकारे टेस्ट मॅचमध्ये फाऊंडेशनचा प्रसार केला तर त्यांना खूप मदत होईल. याआधी ऑस्ट्रेलियाचा माजी फास्ट बॉलर ग्लेन मॅकग्रा यानेही अशाच प्रकारची संस्था सुरू केली. मॅकग्राच्या पत्नीचंही कॅन्सरमुळे निधन झालं होतं.

)







