मराठी बातम्या /बातम्या /देश /सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर, महागाई भत्त्यात 3 महिन्यांसाठी वाढ

सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर, महागाई भत्त्यात 3 महिन्यांसाठी वाढ

सार्वजनिक क्षेत्रातल्या (PSU Sector) बँकांच्या कर्मचाऱ्यांनाही महागाई भत्ता वाढवून देणार असल्याचं जाहीर केलं आहे.

सार्वजनिक क्षेत्रातल्या (PSU Sector) बँकांच्या कर्मचाऱ्यांनाही महागाई भत्ता वाढवून देणार असल्याचं जाहीर केलं आहे.

सार्वजनिक क्षेत्रातल्या (PSU Sector) बँकांच्या कर्मचाऱ्यांनाही महागाई भत्ता वाढवून देणार असल्याचं जाहीर केलं आहे.

    नवी दिल्ली, 13 ऑगस्ट : कोरोनाच्या कठीण काळात केंद्र सरकारची सरकारी कर्मचाऱ्यांवर कृपादृष्टी कायम आहे. केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्सना सातव्या वेतन आयोगाअंतर्गत महागाई भत्ता वाढवल्यानंतर आता सरकारने सार्वजनिक क्षेत्रातल्या (PSU Sector) बँकांच्या कर्मचाऱ्यांनाही महागाई भत्ता वाढवून देणार असल्याचं जाहीर केलं आहे. PSU क्षेत्रातल्या बँकांच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (Dearness Allowance - DA) 2.10 टक्के वाढ करण्यात आली आहे.

    PSU क्षेत्रातल्या बँकांच्या कर्मचाऱ्यांच्या पगारातल्या डीएची ही वाढ ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2021 या तीन महिन्यांसाठी करण्यात आल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. AIACPI (All India Average Consumer Price Index) अर्थात अखिल भारतीय सरासरी ग्राहक मूल्य निर्देशांकाच्या आधारे ही वाढ निश्चित करण्यात आली आहे. 'इंडियन बँक असोसिएशन'च्या (Indian Banks Association) वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या माहितीच्या हवाल्याने 'टीव्ही 9 हिंदी'ने, तसंच 'मनीकंट्रोल डॉट कॉम'ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे. महागाई भत्त्याच्या या टक्केवारीचं गणित खालील सूत्राने काढलं जातं

    महागाई भत्ता टक्केवारी = (मागील तीन महिन्यांच्या ग्राहक मूल्य निर्देशांकाची सरासरी - बेस इयर 2001 = 100)- 126.33)x100

    PSU क्षेत्रातल्या बँक कर्मचाऱ्यांच्या वेतनाच्या वेगवेगळ्या श्रेणी असतात. बँक पीओ अर्थात प्रोबेशनरी ऑफिसरचं (PO) वेतन प्रति महिना 40 ते 42 हजार रुपये असतं. त्यात मूळ वेतन अर्थात बेसिक सॅलरी (Basic Salary) 27,620 रुपये असते. त्यावर डीएमध्ये 2.10 टक्क्यांची वाढ दिली जाणार आहे. पीओसाठीच्या सर्व्हिस हिस्ट्रीच्या नियमांनुसार पूर्ण सेवा काळात संबंधित कर्मचाऱ्याला चार वेळा पगारवाढ दिली जाते. प्रमोशननंतर मूळ वेतन जास्तीत जास्त 42020 रुपये एवढं असतं.

    IND VS ENG : 'तरी हंगामा होणार नाही', रहाणे-पुजाराला गावसकरांचा पाठिंबा

    इंडियन बँक्स असोसिएशनच्या माहितीनुसार, मे, जून, जुलै 2021 साठी डीएचा आकडा 367 स्लॅब होता. ऑगस्ट ते ऑक्टोबर 2021 या कालावधीसाठी त्यात 30 स्लॅबची वाढ झाली आहे. त्या आधारे PSU क्षेत्रातल्या बँक कर्मचाऱ्यांचा डीए 2.10 टक्क्यांनी वाढून आता 27.79 टक्के झाला आहे. याआधी तो 25.69 टक्के होता. एक नोव्हेंबर 2017 नंतर रिटायर झालेल्या पेन्शनर्सनाही 27.79 टक्के महागाई भत्त्याचा लाभ मिळणार आहे.

    लष्करभरतीसाठी या देशात महिलांना द्यावी लागायची कौमार्य चाचणी, कशी थांबवली प्रथा?

    मेट्रो सिटी, शहरी भाग आणि ग्रामीण भाग अशा वेगवेगळ्या क्षेत्रांत काम करणाऱ्या बँकर्सना महागाई भत्त्याचा फायदा वेगवेगळा मिळतो. याआधी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनर्सना मिळत असलेला महागाई भत्ता 17 टक्क्यांवरून वाढवून 28 टक्के वाढवण्याचा निर्णय घेतला होता.

    First published: